"मानेंच्या पत्रात पडळकरांचा राम राम"
"मानेंच्या पत्रात पडळकरांचा राम राम" सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ हे तालुके कायम दुष्काळाच्या परछायेत वसलेले.. जत तालुक्यातील वाशान गांवचे अण्णासाहेब माने हे गावात हाताला काम मिळत नाही म्हणून सांगलीतील वानलेसवाडीत वास्तव करुन मिळेल तिथे हमालीचं काम करु लागले. त्यांचा थोरला मुलगा विष्णू हा शिक्षण घेत-घेत मिळेल ते काम करून दोन पैसे मिळवून वडिलांच्या संसार गाड्याला हातभार लावू लागला. बहुजन समाजातील गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणात आले पाहिजे, असे विष्णू मानेंना वाटु लागले म्हणून विष्णुंनी राजकारणात उडी घेतली आणि जनसेवेला झपाटय़ाने सुरुवात केली. त्यावेळेस सांगलीची वानलेसवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती. त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वडील अण्णासाहेब मानेंना उभे केले, तिथे त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला. मात्र, पराभव झाला म्हणून शांत बसेल तो विष्णू कसला...? काही वर्षांनी म्हणजे २००३ साली वानलेसवाडीचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत समावेश झाला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत विष्णू माने हे स्वतः उभे राहिले आणि यावेळीही ते पराभूत झाले. पण ...