देवडीचे भूमिपुत्र कै. सदाशिव मनोहरराव पुरी उर्फ (बाबा) माणसातील एक देवमाणूस!
सदाशिव पुरी उर्फ (बाबा) माणसातील एक देवमाणूस! *एका मित्राच्या प्रथम* *पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विश्वंभर* *देशमुख यांनी लिहिलेला लेख...!* वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल, चालता बोलता देव तुम्हास नेईन.. माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल.. २१.०८.२०२२ आज बाबाला जाऊन वर्ष झाले. कोरोनानेच बाबांना मृत्यूच्या दारात ओढून नेले. बाबा म्हणजे सदाशिव मनोहर पुरी. यांना सगळे बाबा म्हणून ओळखायचे. बाबा शासकीय सेवेत कृषी खात्यात होते. जून २०२१ ला सेवा निवृत्त झाले होते.सेवा निवृत्तीच्या दोनच महिन्यांनी बाबांनी हे जग सोडले. तसे पहिले तर बाबा नास्तिक होते. पण त्यांना भजन करणे, तबला वाजवणे प्रचंड आवडायचे निवृतीच्या काही दिवस आधी बाबा गेवराईला राहायचे. त्या दरम्यान तासनतास तबला वाजवण्यात मग्न असायचे. मी आणी बाबा एकाच गावचे असल्याने खूप लहानपणा पासुन आमची ओळख होती. नंतर मैत्री झाली. बाबा बीडला असताना गावातील गोर गरीब लोक आजारी पडल्यावर बीडला आल्या नंतर बाबा त्यांना मदत करत असत. सोबत जाने,...