देवडीचे भूमिपुत्र कै. सदाशिव मनोहरराव पुरी उर्फ (बाबा) माणसातील एक देवमाणूस!

सदाशिव पुरी  उर्फ (बाबा) माणसातील एक देवमाणूस!

*एका मित्राच्या प्रथम* *पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विश्वंभर* *देशमुख यांनी लिहिलेला लेख...!*

वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन..
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..



२१.०८.२०२२ आज बाबाला जाऊन वर्ष झाले. कोरोनानेच  बाबांना मृत्यूच्या दारात ओढून नेले. बाबा म्हणजे सदाशिव मनोहर पुरी. यांना सगळे बाबा म्हणून ओळखायचे. बाबा शासकीय सेवेत कृषी खात्यात होते.  जून २०२१ ला  सेवा निवृत्त झाले होते.सेवा निवृत्तीच्या दोनच महिन्यांनी बाबांनी हे जग सोडले.  तसे पहिले तर बाबा नास्तिक होते. पण त्यांना भजन करणे, तबला वाजवणे प्रचंड आवडायचे  निवृतीच्या काही दिवस आधी बाबा गेवराईला राहायचे. त्या दरम्यान तासनतास तबला वाजवण्यात मग्न असायचे. मी आणी बाबा एकाच गावचे असल्याने खूप लहानपणा पासुन आमची ओळख होती. नंतर मैत्री झाली. बाबा बीडला असताना गावातील गोर गरीब लोक आजारी पडल्यावर  बीडला आल्या नंतर  बाबा त्यांना मदत करत असत. सोबत जाने, डबा पुरवणे. अशा प्रकारचे समाज कार्य त्याना आवडायचे. त्यांनी गावातील बरयाच मुलांना  नोकरी लावण्यासाठी मदत हि केली होती.  बाबा शासकीय सेवेत असताना  पैशाच्या  मोहात कधी अडकले नाहीत. भ्रष्टाचारा पासून ते चार हाथ लांबच असायचे. या मुळेच त्याचे वरिष्ठ त्यांना टरकून असायचे. निवृत्ती नंतर त्यांना आधुनिक शेती करायची होती तसेच एखादा उद्योग हि करायचा होता. तसे त्यांनी त्याचे कामही सुरु केले होते. पण त्यांचे ते स्वप्न  अधुरेच  राहिले. बाबा विभागातील बऱ्याच गोष्ठी मला शेअर करायचे. कोरोना काळात बाबावर  आलेल्या  कठीण प्रसंगाचा मला येथे आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो. नुकताच कोरोना सुरु झाला होता .बातम्या बघून लोक पार घाबरून गेले होते.कोणी कोणाला घरी येऊ देत नव्हते. त्या वेळी बाबा गेवराईला भाड्याच्या घरात रहात असत. गेवराईला पोस्टिंग होती.  शासनाने काही कर्मचार्याच्या नेमणुका शहराच्या हद्दीवर वाहने तपासायला केल्या होत्त्या. त्यात काही दिवस त्यांना तेथे ड्युटी करावी लागली होती . त्या दरम्यान बाबाची गुड्डी नावाची मुलगी पुण्यात UPSC परिक्षेची तयारी करत होती. पुण्यात कोरोना वाढत असल्याच्या बातम्याने बाबाचे कुटुंब पार घाबरून गेले आणी गुड्डीला पुण्याहून बीडला आणायचा निर्णय झाला.जेव्हा गुड्डी गेवराईला आली तेव्हा बाबा रहात असलेल्या घराच्या घरमालकाला समजल्या नंतर  त्त्या घरमालकाने बाबांना घर खाली करायला सांगीतले. कारण काय तर गुड्डी पुण्याहून आली आहे तिला कोरोना झाला असेल त्याची लागण आम्हालाही होईल ही भीती. खर तर तिची कोरोना चाचणी केलेली होती ती  निगेटिव होती. बाबांनी खूप विनंत्या केल्या पण तो घर मालक काही ऐकायच्या मनस्थीतीत नव्हता.अशा वादावादित रात्र झाली. आणि नाईलाजाने बाबानी ट्रक बोलावून सर्व सामान भरून गेवराई तालुक्यातील एका नातेवाईकाच्या शेतात जाऊन रहायचा निर्णय घेतला. त्या  नातेवाईकाने  त्याच्या शेतात येऊन रहायला मोठ्या नाराजीने फोनवर परवानगी दिली.नंतर बाबा सर्व कुटुंब कबिल्यासह रात्री त्या खेडे गावात पाहोचले.त्या वेळी रात्रीचे बारा साडे बाराची वेळ झाली असेल. कोरोनाची लागण झालेलं ऐक कुटुंब आपल्या गावात आलय.ही बातमी वाऱ्याच्या वेगाने  गावभर  पसरली आणि काही मिनिटात सारा गाव बाबाच्या नातेवाईकाच्या घरा समोर जमा झाला.आप आपसात कुजबुज सुरु झाली. वाढली. या कुटुंबाला आपल्या गावात राहू देऊ नका. असा सूर जमलेल्या सर्व लोकांनी काढला. या जमलेल्या माणुसकी शून्य लोकांनी मारन्याचीही भाषा सुरु केली. अजून काही वेळ थांबलो  तर काही अनर्थ घडेल व आपल्याला हे लोक मारून टाकतील या भीतीने बाबानी परत गेवराईला जायचा निर्णय घेतला. आपण कल्पना करा केवढा भीषण हा प्रसंग होता. बाबांचे जावई अनिकेत भारती जे  SP आहेत, जेव्हा त्यांना ही सर्व हकीगत कळली. तेव्हा त्यांनी गेवराई पोलीस स्टेशन मधील इन्स्पेक्टरला फोन केला. मग त्या इन्स्पेक्टरने त्या घरमालकाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून बाबाला दिलेल्या माणुसकी शून्य वागणुकी बद्दल पोलीसी खाक्या दाखवल्या  नंतर  तो घरमालक सरळ झाला. त्याने  सोडायला लावलेल्या  त्याच घरात परत  रहायला परवानगी दिली. परत बाबा त्या घरात रहायला आले.  पण बाबाची व त्याच्या कुटुंबाची  फजिती यथेच थांबनारी नव्हती. दरम्यान ही घटना गेवराईतील त्या गल्लीत सर्व लोकांना माहित झाली. गल्लीतील लोक बाबाच्या कुटुंबाला वाळीत टाकल्या सारखी वेगळ्या नजरेने बघायला लागले. जसे काही खूप मोठा गुन्हा केलाय . त्यावेळी घर मालकाने जरी नरमाई ची भूमिका घेतली असली तरी त्याचा राग शांत झालेला  नव्हता. त्याने घराच्या  मेन गेटला कुलूप लावून घेतले,गेट वर CC TV कॅमेरे बसवले. यामुळे  बाबाचे व कुटुंबाचे बाहेर जाणे येणे बंद झाले. २१ दिवस बाबाना  आणि त्यांच्या  कुटुंबाना  अक्षरशा घरात कोंडून घ्यावे लागले. अंगाला शहारे आणनारा प्रसंग बाबांनी अनुभवला होता, जगला होता . त्या दरम्यान बाबाला तबल्याच्या  छन्दाने चांगली साथ दिली. बाबाचा बराच वेळ तबला वाजवण्यात गेला.बाबाची पत्नी अतिशय प्रेमळ ( त्यांना सगळे राणी ची आई म्हणतात) स्वभावाची असल्याने बाबाला या कठीण प्रसंगातही खंबीर पणे साथ दिली.  बाबाच्या घरी येणारा प्रत्येक माणूस चहा जेवण केल्या शिवाय जात नाही.यावरून त्यांचा  प्रेमळपणा दिसून येतो. बाबाच्या जीवनात अजून एक माणुसकी शून्य प्रसंग घडला तो म्हणजे, अनेक वर्ष सेवेत सोबत काम केल्या नंतर निवृत्ती वेळी  सहकार्याकडून निरोप समारंभ आयोजित केला जातो असा रिवाज आहे. पण बाबा काम करीत असलेल्या विभागातील भावना शून्य सहकार्यांनी बाबांचा निरोप समारंभ करण्याचे थोडेही औदार्य दाखवले नाही. या वरून त्या सहकाऱ्याची माणुसकीची दिवाळखोरी दिसून येते. याचे बाबांना किती वाईट वाटले. आज बाबा  आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही . बाबाना आठवड्यातून एक दोनदा फोन व्हायचाच. सेवेतून निवृत्ती झाल्या पासून बाबाची बे फिकरी थोडी वाढली होती.मास्क न लावणे कोरोनाचे नियम न पाळणे, तसेच वेळी अवेळी / गावाकडे  जाने वाढले होते. या विषयी त्यांना बोललो होतो. पण काय होतेय म्हणून ते हसन्यावरी न्यायचे. यातच काही दिवसा पूर्वी रात्री गावाकडून बीडला येताना अपघात झाला होता. त्या वेळीही मी बाबाला सागितले होते . पण बाबा ऐकणारे थोडेच होते .... त्यानंतर काही दिवसांनी एका रात्री बाबा बीड हून गावाकडे गेले त्या दिवशीही मी बाबाला फोन केला होता तर म्हणाले बीडला बोअर होत आहे म्हनून गावाकडे भजन करायाला जात आहे... येव्हडया रात्री बाबा गावाकडे भजन करायला जात आहेत हे कळल्यावर मलाही थोडे अजब वाटले...... मला वाटते त्या रात्री पासूनच बाबाच आजारपण सुरु झाल असावे.....दुसऱ्या दिवशी बाबा बीडला आले ते आजार घेऊनच. नंतर बाबाना दवाखान्यात admit केलं गेलं. रिपोर्ट कोरोना पॉझीटीव आला, निमोनिया झाला, इन्फेक्शन वाढत गेले....बाबा  दवाखाण्यात असणाना हि माझे  बोलणे झाले. नंतर नंतर बाबाचा आवाज क्षीण होत गेला... जेव्हा औरगाबादला असताना बाबांना फोन केला तेव्हा बाबा म्हनाले condition critical आहे. तेच माझे शेवटचे बोलणे झाले... शेवटच्या काही दिवासा पूर्वी बाबांना भंडाऱ्याला हलवले गेले. नंतर बाबाच्या प्रकृती विषयी  माहिती गुड्डी कडून होत होती.......आणि एक दिवशी अतिशय वाईट बातमी आली  की बाबा हे जग सोडून गेले......खूप दुख: झाले. आपण एका चांगल्या दिलखुलास मित्राला मुकल्याची जानिव झाली. बाबा कायम स्मरणात  राहतील. बाबाचे असे अकाली जाने  मन मानायला तयार नव्हते ....पण वास्तव ते वास्तव आहे .. आजही गावातील लोकं बाबांची आठवण काढतात. व भाऊक होतात.
आज बाबाच्या पुण्यस्मर्नानिमित्य त्यांच्या कुटुंबीयांनी देवडी गावात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणीला उजाळा मिळेल.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, आणि परिवाराला या दुखातुन सावरण्याचे बळ मिळो हीच देवा जवळ प्रार्थना आहे . आज बाबाच्या पुण्यस्मर्नानिमीत्ताने बाबाला भावपूर्ण श्रद्धांजली.


*निवृतीच्या प्रसंगी सहका-या कडुन बाबांना  माणुसकी  शून्य वागणूक*

बाबांच्या आयुष्यात बाबांनी सर्वांसाठी आपली भूमिका न्यायी ठेवली. सर्वां बाबत चांगली भावना ठेवली परंतु त्यांच्या बाबतीत त्यांच्या सहकार्यानी मात्र आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवली.
कोणत्याही क्षेत्रात सेवेत अनेक वर्ष  सोबत काम केल्या नंतर निवृत्तीच्या वेळी आपल्या सहकार्याकडून निवृत होणाऱ्या अधिकारी कर्मचारी सहकार्याला आपुलकी आणि प्रेमळ भावनेने निरोप समारंभ आयोजित करून त्या सहका-याच्या दुसऱ्या इंनिगसाठी शुभेच्छा दिल्या जातात या वेळी सदरील सहकारी आणि त्याच्या कुटुंबीयांचा सत्कार केला जातो असा रिवाज आहे. पण बाबा काम करीत असलेल्या विभागातील भावना शून्य सहकार्यानी बाबांचा निरोप समारंभ करण्याचे थोडेही औदार्य दाखवले नाही की बाबाला साध्या शुभेच्छा दिल्या नाहीत‌. यावरून बाबांच्या त्या सहकाऱ्याच्या बुध्दीची किव करावी वाटते. या सहकाराच्या माणुसकीची दिवाळखोरी दिसून येते.

विश्वंभर माणिकराव देशमुख,
                                                  देवडीकर मुंबई
__________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन