पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकी चोरीला

पत्रकार आत्माराम वाव्हळ
यांची दुचाकी चोरीला


पत्रकार आत्माराम वाव्हळ
यांची दुचाकी चोरीला

बीड प्रतिनिधी
पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची स्प्लेंडर प्रो नावाची  (एम एच २३एस ९२५५) क्रमांकाची मोटारसायकल  सोमवारी रात्री ८ ते ११ या वेळेत सिद्धिविनायक कॉम्पलेक्स येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
    बीड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यात पोलीस यंत्रणा दुचाकी चोरांचा शोध लावण्यासाठी कामाला लागली आहे. सध्या दररोज पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करत आहे.
नाक्यानाक्यावर पोलीस पथकाकडून गाड्यांची तपासणी होत असताना शहराच्या मध्यवर्ती भागात  व सतत नागरिकांची वर्दळ असलेल्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातून  काल सोमवार दि. १६ रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकी
(एम एच २३एस ९२५५) क्रमांकाची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात दुचाकी चोरी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टिप्पण्या