पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

..तोपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडे

..तोपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडे बीड,(प्रतिनिधी)  जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली आहे. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.  माझ्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे काही नवीन स्व.गोपीनाथ मुंडे असताना देखील सगळे लक्ष लागायचे राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की पंकजा मुंडेना भीती वाटते. मी महाराष्ट्रात प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते मला चिंता महाराष्ट्राची आहे. बीड जिल्ह्यात एकही बंडखोरी नाही. पाच वर्षांत पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात कारभार नाही तर संसार केला, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडेसारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली. माझी निवडणूक काही अवघड नाही. विजय निश्चित आहे...

मोदीच काय, ट्रम्प आणले तरी माझा विजय कुणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे

मोदीच काय, ट्रम्प आणले तरी माझा विजय कुणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत  भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. 17 तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत येतायत. तर दुसरीकडे 18 तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप  उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. “उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवसापासून भाजपने जो धसका घेतलाय, ते आणखी त्यातून बाहेर निघालेले नाहीत. त्यांना वाटलं की मोदी आल्याशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. हे कळाल्यावर मी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला म्हणालो, मोदी मागच्या महिन्यात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराला गेले होते. 17 ला मोदी येत आहेत, 19 ला ट्रम्प जरी आणले तरी विजय कुणीही रोखू शकत नाही अशी परि...

सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत टाकला मिठाचा खडा

सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत टाकला मिठाचा खडा बीड प्रतिनिधी राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यात होणारे पगार याच महिन्यातील २४ ऑक्टोबर पूर्वी करावेत म्हणजे दिवाळीपूर्वी करावे असा शासन आदेश काढण्यात आला होता. परंतु  शासनाने सदर आदेश रद्द करून कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीपूर्वी काढू नये असा नवीन शासनादेश काढला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होणार नाहीत. आजच्या या शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणात मिठाचा खडा टाकण्याचे काम सरकारकडून झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कर्मचारी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.    महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्य सरकारी कर्मचारी कृषी विद्यापीठ कर्मचारी निवृत्तीवेतनधारक जिल्हा परिषद व खाजगी संस्थेतील  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिवाळी गोड करण्याच्या निमित्ताने दिनांक 09 ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक काढून  दिवाळीपूर्वी म्हणजेच दिनांक 24 ऑक्टोबर पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर चे वेतन हे दहा दिवस अगोदर करण्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी वर...

हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचा: शरद पवार

हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचा: शरद पवार बीड - 52 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा जेव्हा विधानसभा निवडणूक लढवत होतो, तेव्हा मला यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिली. त्यावेळेस तरुणांना संधी का देता हा विषय समोर आला होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, मला पुढच्या पंचवीस वर्षांचा कारभार सुरळीत करायचा आहे, म्हणून मी तरुणांना संधी देत आहे. आता मी देखील तोच धागा पकडून पुन्हा वयाच्या या टप्प्यावर सांगू इच्छितो की, मला हा महाराष्ट्र तरुणांच्या हाती द्यायचा आहे. म्हणून मी गेवराई विधानसभा मतदारसंघात तरुण व तडफदार नेतृत्व म्हणून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेवराई येथे आयोजित प्रचार सभेत सांगितले. यावेळी मंचावर माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित, बीडचे उमेदवार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार सलीम सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख, भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले कल्याण आखाडे, अर्जुन राठोड, बाबुराव पोटभर...
इमेज
गर्भवती महिलांचा सर्व खर्च सरकार उचलणार नवी दिल्लीः(प्रतिनिधी) प्रसूती दरम्यान उपचारांच्या आभावामुळे देशात आई अथवा मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहेत. 100 टक्के सुरक्षित मातृत्व मिळवण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सरकारने सुमन (सेफ मॅटरनिटी अ‍ॅश्युरन्स) नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 100 टक्के प्रसूती या रुग्णालयात किंवा प्रशिक्षित नर्स यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. सध्या हा आकडा 80 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेला सुरक्षित मातृत्वंची गॅरिंटी दिली जाणार आहे. त्यानुसार गर्भवती महिलेला प्रसुती आधी पहिले चार वेळा मोफत उपचाराचा आधिकार असेल. त्यामुळे महिलेसोबतच बाळाच्या आरोग्याबाबत समजेल. एवढेच नव्हे तर प्रसूतीपूर्वी महिलेला रुग्णालयात आणण्यासाठी व नंतर घरी परत जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. प्रसुतीचा सर्व खर्च सरकार उचलणार प्रसुतीदरम्यान शस्त्रक्रियेपासून होणारा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. प्रसुतिनंतर सहा महिन्यांसाठी आई व मुलाला मोफत औषधेही पुरवले जातील. नवजात...