मनोजवं मारुततुल्यवेगं*
// * मनोजवं मारुततुल्यवेगं* // --------------------------------- ---- *ब्रह्मचर्य, मांगल्य, बल आणि पवित्रता, यांची आदर्श मुर्ती म्हणजे हनुमान. आत्म्याची, ईश्वराची, रामाची प्राप्ती निर्बल करु शकत नाही, त्याच्या प्राप्तीसाठी शरीरबल, मनोबल, बुद्धीबल यांची गरज असते. हे हनुमंताने स्वत:च्या जीवनाव्दारे दाखवुन दिले. रामदासांनी गावोगावी आखाडे व व्यायामशाळा स्थापन केल्या, परंतु शक्तीने माणुस पशु किंवा राक्षस बनतो, ही गोष्ट ध्यानात घेऊन प्रत्येक गावात मारुती ची मंदिरे स्थापन केली. भक्तिमुक्त शक्ति माणसाला राक्षस बनवते तर भक्तियुक्त शक्ति माणसाला देवत्व प्राप्त करते.* -------------------------------------- जगात सात चिरंजीवांपैकी ज्याची गणना आहे, अशा हनुमंतरायाचा चैत्र शुध्द पौर्णिमेला जन्म झाला. शंकराचे नंदीशिवाय मंदिर असु शकत नाही, तसे श्रीरामाचे देवालय हनुमंताच्या मुर्ती शिवाय असु शकत नाहीत. भक्ताशिवाय भगवान अपुरा या भावनेचे दर्शन यावरून होते. विवेकी, विनयी, वाक्चतुर, जितेंद्रीय, स्थिरबुध्दी, समयसूचकता, कर्तव...