पोस्ट्स

देवडीचे भूमिपुत्र कै. सदाशिव मनोहरराव पुरी उर्फ (बाबा) माणसातील एक देवमाणूस!

इमेज
सदाशिव पुरी  उर्फ (बाबा) माणसातील एक देवमाणूस! *एका मित्राच्या प्रथम* *पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विश्वंभर* *देशमुख यांनी लिहिलेला लेख...!* वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल, चालता बोलता देव तुम्हास नेईन.. माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल.. २१.०८.२०२२ आज बाबाला जाऊन वर्ष झाले. कोरोनानेच  बाबांना मृत्यूच्या दारात ओढून नेले. बाबा म्हणजे सदाशिव मनोहर पुरी. यांना सगळे बाबा म्हणून ओळखायचे. बाबा शासकीय सेवेत कृषी खात्यात होते.  जून २०२१ ला  सेवा निवृत्त झाले होते.सेवा निवृत्तीच्या दोनच महिन्यांनी बाबांनी हे जग सोडले.  तसे पहिले तर बाबा नास्तिक होते. पण त्यांना भजन करणे, तबला वाजवणे प्रचंड आवडायचे  निवृतीच्या काही दिवस आधी बाबा गेवराईला राहायचे. त्या दरम्यान तासनतास तबला वाजवण्यात मग्न असायचे. मी आणी बाबा एकाच गावचे असल्याने खूप लहानपणा पासुन आमची ओळख होती. नंतर मैत्री झाली. बाबा बीडला असताना गावातील गोर गरीब लोक आजारी पडल्यावर  बीडला आल्या नंतर  बाबा त्यांना मदत करत असत. सोबत जाने,...

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली!

इमेज
उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार  विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली! बीड दि.१६( प्रतिनिधी): बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल कधी जाहीर होणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन मार्फत उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्या निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या लिंकवर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड • एज्युकेशन मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ नंतर उपलब्ध होतील, अशी माहिती विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. निकाल असा चेक करता येईल? https://mahresult.nic.in/https...

देवडीत कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

इमेज
देवडीत कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून  आत्महत्या बीड दि.१९(प्रतिनिधी): वडवणी तालुक्यातील देवडी येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आसाराम दत्तू सांगळे वय ४४ असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  या बाबत अधिक माहिती अशी की वडवणी तालुक्यातील देवडी  आसाराम दत्तू सांगळे (वय ४४ ) या  शेतकरी मागील काही दिवसांपासून  कर्जबाजारी झाला होता. दरम्यान चार पाच दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न झाले होते मुलीच्या लग्नाला झालेला खर्च  आणि पुर्वीचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते राहत होते. मागील तीन चार दिवसापूर्वी पासून मी कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू, माझे कसे होणार असे सारखे म्हणत होते. या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून मंगळवार दिनांक 17 रोजी सकाळी आठ वाजता त्यांनी शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध घेतले ते माहीत होताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी ...

"मानेंच्या पत्रात पडळकरांचा राम राम"

इमेज
"मानेंच्या पत्रात पडळकरांचा राम राम"  सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ हे तालुके कायम दुष्काळाच्या परछायेत वसलेले..  जत तालुक्यातील वाशान गांवचे अण्णासाहेब माने हे गावात हाताला काम मिळत नाही म्हणून सांगलीतील वानलेसवाडीत वास्तव करुन मिळेल तिथे हमालीचं काम करु लागले. त्यांचा थोरला मुलगा विष्णू हा शिक्षण घेत-घेत मिळेल ते काम करून दोन पैसे मिळवून वडिलांच्या संसार गाड्याला हातभार लावू लागला. बहुजन समाजातील गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणात आले पाहिजे, असे विष्णू मानेंना वाटु लागले म्हणून विष्णुंनी राजकारणात उडी घेतली आणि जनसेवेला झपाटय़ाने सुरुवात केली. त्यावेळेस सांगलीची वानलेसवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती. त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वडील अण्णासाहेब मानेंना उभे केले, तिथे त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला. मात्र, पराभव झाला म्हणून शांत बसेल तो विष्णू कसला...? काही वर्षांनी म्हणजे २००३ साली वानलेसवाडीचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत समावेश झाला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत विष्णू माने हे स्वतः उभे राहिले आणि यावेळीही ते पराभूत झाले. पण ...

राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

इमेज
राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहीम राबवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले की, ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी/विद्यार्थिनी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील आणि ज्या विद्यार्थी/विद्यार्थिनीने कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख/ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक ...

पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

इमेज
पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 12 :- पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.   पुण्याचे पालकमंत...

मनोजवं मारुततुल्यवेगं*

इमेज
// * मनोजवं मारुततुल्यवेगं* // --------------------------------- ----   *ब्रह्मचर्य, मांगल्य, बल आणि पवित्रता, यांची आदर्श मुर्ती म्हणजे हनुमान. आत्म्याची, ईश्वराची, रामाची प्राप्ती निर्बल करु शकत नाही,  त्याच्या प्राप्तीसाठी शरीरबल, मनोबल, बुद्धीबल यांची गरज असते. हे हनुमंताने स्वत:च्या जीवनाव्दारे दाखवुन दिले. रामदासांनी गावोगावी आखाडे व व्यायामशाळा स्थापन केल्या, परंतु शक्तीने माणुस पशु किंवा  राक्षस बनतो, ही गोष्ट ध्यानात घेऊन प्रत्येक गावात मारुती ची मंदिरे स्थापन केली. भक्तिमुक्त शक्ति माणसाला राक्षस बनवते तर भक्तियुक्त शक्ति माणसाला देवत्व प्राप्त करते.*  --------------------------------------      जगात सात चिरंजीवांपैकी ज्याची गणना आहे, अशा हनुमंतरायाचा चैत्र शुध्द पौर्णिमेला जन्म  झाला. शंकराचे नंदीशिवाय मंदिर असु शकत नाही, तसे श्रीरामाचे देवालय हनुमंताच्या मुर्ती शिवाय असु शकत नाहीत.  भक्ताशिवाय भगवान अपुरा या भावनेचे दर्शन यावरून होते.     विवेकी, विनयी, वाक्चतुर, जितेंद्रीय, स्थिरबुध्दी, समयसूचकता, कर्तव...