अन्नभेसळ प्रशासनाने गोडतेल, खवा, दूध यांमधील भेसळ समाजासमोर आणून धडक कारवाया कराव्यात;उंटावरून शेळ्या हाकू नयेत! भेसळ ओळखण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित कराव्यात - एस.एम.युसूफ
अन्नभेसळ प्रशासनाने गोडतेल, खवा, दूध यांमधील भेसळ समाजासमोर आणून धडक कारवाया कराव्यात;उंटावरून शेळ्या हाकू नयेत! भेसळ ओळखण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित कराव्यात - एस.एम.युसूफ बीड (प्रतिनिधी) - दररोज खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे गोडतेल, खवा आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु असलेली भेसळ समाजासमोर आणून भेसळ करणाऱ्यांवर अन्नभेसळ प्रशासनाने धडक कारवाया करण्याची मोहीम सुरू करावी. उंटावरून शेळ्या हाकू नयेत तसेच भेसळ ओळखण्यासाठी जिल्हाभरात प्रात्यक्षिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून केली आहे. याविषयी दिलेल्या पत्रकात सविस्तर नमूद केले आहे की, महागाईच्या या काळात गोडतेल, खवा आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे समाजातील जागरूक नागरिक उघड-उघड बोलून दाखवत आहेत. तसेच याविषयी अनेकदा अन्नभेसळ प्रशासनाकडे तक्रारीही केल्या जातात. या पदार्थांत करण्यात येत असलेल्या भेसळीचा पर्दाफाश करावा आणि सत्य समाजासमोर आणावे. असे आवाहन अनेकदा केले जाते. परंतु अन्न...