कऱ्हा नदीला ५० वर्षांत प्रथमच महापूर; नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पाणी बारामती- पुरंदर तालुक्यामध्ये गुरुवारी (२६) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे क-हा नदीला ५० वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील १५ हजार, बारामतीच्या ७ हजार ५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. क-हा नदीकाठी असणा-या आंबी बु,आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी, जळगाव कडे पठार, जळगाव सुपे आदी गावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री १.३० वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरि...
पोस्ट्स
सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टायगर अभी जिंदा है.. पवार साहेब तुम संघर्ष करो.. हम तुम्हारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शहर कडकडीत बंद परळी वै. (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री. शरद पवार यांच्यावर मोदी व फडणवीस सरकारने केलेल्या सुडबूध्दीच्या कारवाईचा धिक्कार करण्यासाठी परळी शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या परळी बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टायगर अभी जिंदा है... पवार साहेब तुम संघर्ष करो.. हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परळी शहर दणाणून सोडले. शिखर बँकेच्या कल्पोकल्पित भ्रष्टाचाराप्रकरणी कोणताही संबंध नसताना केवळ राजकीय सुडबूध्दीने आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत असलेल्या पाठींब्यामुळे घाबरलेल्या भाजपा सरकारने श्री.शरद पवार साहेबांवर गुन्हा दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे संपूर्ण राज्याप्रमाणेच परळी शहरातही तिव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
...तर राज्यात लवकरच भारनियमन; कोळशाचा पुरवठा ठप्प झाल्यानं वीज संकटाची भीती मुंबई : वेस्टर्न कोल लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. याचा परिणाम वीजनिर्मितीवर होत असून, राज्यातील विजेचे व्यवस्थापन करण्यासाठी महावितरणने खुल्या बाजारातून वीज विकत घेतली आहे. राज्याची दररोजची मागणी १५ हजार मेगावॅट असून, पुरवठाही तेवढाच आहे. मात्र कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याने त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यात महावितरणला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागणार आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशामध्ये वेस्टर्न कोल लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कर्मचाऱ्यांनी संप केल्याने राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती कंपनीची वीजनिर्मितीची क्षमता १० हजार मेगावॅटच्या वर असताना येथून केवळ २८०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. अदानी कंपनीची क्षमता ३ हजार मेगावॅट असताना येथून १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. असे असतानाही ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पावसामुळे जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले पैठण (प्रतिनिधी)- येथील जायकवाडी धरणात नासिक, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणाच्या 27 पैकी एकुण 16 दरवाजे गुरुवारी (ता. 26) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडण्यात आले आहे. या दरवाज्याच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी ता. 25 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यामुळे आधीच शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या धरणाची पातळी पातळीने शंभर टक्के पातळी ओलांडल्यामुळे धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी धरणातुन पाणी सोडण्याचा तातडीने निर्णय घेतला व रात्री साडेनऊ वाजता दहा दरवाजे एक फुट सहा इंचाने उचलुन पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरु केला. यानंतर आज गुरुवारी( ता. 26)पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. सद्यस्थितीत एक फूट सहा इंचाने दरवाजे क्रमांक 10,16,21,14,23,12,25, 11,13,24,15,22,17,20 यातुन पाणी सुरु आहे. धरण व तालुका प्रशासन झाले सतर्क! दरम्यान, अचानक मोठा पाऊस झाल्यामुळे नासिक व नगर जिल्ह्यातून वेगाने जायकवाडी धरणात पाण...
शरद पवार म्हणतात, 'तर तुरूंगात जाण्यास तयार'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शरद पवार म्हणतात, 'तर तुरूंगात जाण्यास तयार' मुंबई वृत्तसेवा मुंबई : मला तुरूंगात पाठवावं असं सरकारला वाटत असेल तर तुरूंगात जाण्याची माझी तयारी आहे.' अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ईडीच्या कारवाई नंतर प्रतिक्रिया दिली. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी आज अंमलबजावणी संचालयाने (ईडी)ने शरद पवार यांच्यासह विविध पक्षाच्या 70 संचालकांवर गुन्हा नोंद केला. अजित पवारांसह ईडीकडून 71 जणांवर गुन्हा दाखल शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'सध्या राज्यभरात माझ्या सभा मेळाव्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद व त्यातल्या त्यात तरूणांचा सहभाग पाहता ही कारवाई झाली नसती तरच आश्चर्य वाटले असते.'अशा शब्दात पवार यांनी या कारवाईवर भाष्य केले. दरम्यान, शरद पवार यांच्यावर ईडी ने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई बाबत अधिक बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मी कधीही या बँकेचा सदस्य अथवा संचालक नव्हतो. तरीही माझ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असेल तर मी या संबधित यंत्रणांचे स्वागत करतो. सध्या राज्यात निवडणूक त...
... तर निवडणुकीतून माघार, पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
... तर निवडणुकीतून माघार, पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर सातारा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं नव्हतं. मात्र, 21 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे आता निश्चित झालं आहे. साताऱ्याच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच, तेथील उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत....
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता नगर : प्रतिनिधी बंगालच्या खाडीवर असलेले पावसाचे ढग महाराष्ट्राकडे ओढले जात असल्याने आजपासून विदर्भ, मराठवाडा या बाजूने येत परतीचा पाऊस वाढत जाणार असून, मध्य महाराष्ट्रा सह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्याच्या परिस्थितीत पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ प्राध्यापक बी. एन. शिंदे यांनी दिला आहे. शिंदे म्हणाले की, दहा दिवसांपूर्वी बंगालच्या खाडीकडून आलेले सौम्य वादळ सर्व महाराष्ट्रात मध्यम ते चांगला पाऊस देत गुजरातकडे गेले. कोकण व सह्याद्री पर्वताच्या भागातील धरणातही नवीन पाणी जमा झाले आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवस पावसाचा खंड पडला. पण आता त्याच वादळाचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होऊन ते वादळ आज ओमानला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या खाडीचे ढग महाराष्ट्राकडे ओढले जाऊन पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पावसाची होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. आजपासून सुरू होणारा पाऊस हा अधून-मधून खंड पडत दसर्यापर्यंत राहणार असल्याची शक्यता व्यक्त ...
“शरद पवारांचे पाय मराठवाड्याला लागले अन् मराठवाड्यात धो-धो पाऊस बरसला”
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
“शरद पवारांचे पाय मराठवाड्याला लागले अन् मराठवाड्यात धो-धो पाऊस बरसला” हिंगोली प्रतिनिधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मराठवाड्याला पाय लागले आणि मराठवाड्यात धोधो पाऊस बरसला असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. अमित शहांनी पवार साहेबांवर आरोप केला, साहेबांनी जेवढे विमानतळ काढले तेवढे तुम्हाला गुजरातमध्ये बसस्टँड सुद्धा काढता आले नाहीत, अशी टीकाही धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली आहे. गुरुवारी शरद पवार हे हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. उदयनराजे महाराज यांच्या दिल्लीतील भाजप प्रवेशाला किमान पंतप्रधान यायला पाहिजे होते, महाराजांचा प्रवेश कुणाच्या हातून झाला, जनतेतून उत्तर आलं. तडीपाराच्या हातून, हा आमच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. भाजपचे अध्यक्ष म्हणतात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संपवून टाकणार. आमच्यासारखे खमके मावळे पवार साहेबांच्या पाठिशी आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे, पवार साहेबांचे विचार संपणार नाहीत, असंही मुंडे यांनी म्हटलं आह...
धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा, शरद पवारांकडून पहिली यादी जाहीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा, शरद पवारांकडून पहिली यादी जाहीर बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात पवारांनी बीडमधील काही उमेदवारांची घोषणा केली. त्यावेळी, उपस्थित कार्यकर्त्यांनीही या नावांची घोषणा होताच जल्लोष केला. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच संभाव्य उमेदवारांची घोषणा केली. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी पवार यांनी जाहीर केली. बीडमधील कार्यक्रमात बोलताना पवार यांनी मोदी सरकार आणि फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच, मी तरुणांच्या जोरावर मी ही निवडणूक लढवत आहे, असे म्हणत पवार यांनी राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे पवार यांनी तरुण उमेदवारांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. पवार यांनी व्यासपीठावरच उमेदवारांची घोषणा केली, त्यावेळी उमेदवारांनी पवार यांचे आशीर्वाद घेतले. पवार यांनी, पर...
पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकी चोरीला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकी चोरीला पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकी चोरीला बीड प्रतिनिधी पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची स्प्लेंडर प्रो नावाची (एम एच २३एस ९२५५) क्रमांकाची मोटारसायकल सोमवारी रात्री ८ ते ११ या वेळेत सिद्धिविनायक कॉम्पलेक्स येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. बीड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यात पोलीस यंत्रणा दुचाकी चोरांचा शोध लावण्यासाठी कामाला लागली आहे. सध्या दररोज पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करत आहे. नाक्यानाक्यावर पोलीस पथकाकडून गाड्यांची तपासणी होत असताना शहराच्या मध्यवर्ती भागात व सतत नागरिकांची वर्दळ असलेल्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातून काल सोमवार दि. १६ रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकी (एम एच २३एस ९२५५) क्रमांकाची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात दुचाकी चोरी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
. . . हेच विखेंचे संस्कार का ? सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचा संतप्त सवाल अहमदनगर : - गुंडेगाव येथील सभेत बोलताना खासदार सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर बोलताना मला उद्देशून देखणा माणूस आला , तर पहायला जा , असे वक्तव्य केले होते . एखाद्या स्त्रीबद्दल असे बोलणे , हे खासदार सुजय विखे यांचे संस्कार आहेत का , असा सवाल सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. या वेळी दीपाली सय्यद म्हणाल्या की , विखे यांच्या घरी आई बहीण बायको नाही का ? तरी एका स्त्री बद्दल असे शब्द का वापरतात ? हा समस्त स्त्रीयांचा अपमान आहे . त्यांनी माझी माफी मागावी . अन्यथा त्यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात येईल . लोकसभा निवडणुकीपूर्वी मला बहीण म्हणणाऱ्या सुजय विखे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचे संस्कार दाखवले आहेत .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार भडकले मुंबई प्रतिनिधी ज्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली. त्या पक्षात काही लोक सत्तेसाठी जात आहेत अशा शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले. पवारांच्या वर्तुळातील नेत्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी हातातील घड्याळ काढून भाजपाचे कमळ हाती घेतले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भडकले. या वेळी बोलताना शरद पवार यांनी ज्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली. त्या पक्षात काही लोक सत्तेसाठी जात आहेत अशा शब्दात पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना टोला लगावला. शरद पवार म्हणाले,"विरोधी पक्षात बसून जास्त कामे करून घेता येतात. महागाई आणि बेरोजगारीसारखे प्रश्न देशात निर्माण झाले आ...
महाजनादेश यात्रेत एकच वादा अजित दादा चा जय घोष; पोलिसांचा लाठीचार्ज
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाजनादेश यात्रेत एकच वादा अजित दादा चा जय घोष; पोलिसांचा लाठीचार्ज पुणे प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा सुरु असताना अजित दादा जिंदाबाद, एकच वादा अजित दादा च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हुसकावून लावत लाठीचार्चही केला. देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज दुपारी बारामतीमध्ये पोहोचली. दरम्यान, या जनादेश यात्रेपूर्वी बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या डॉल्बी साऊंड सिस्टिमला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध करण्यात आला होता. गणपती दहीहंडीमध्ये साऊंड सिस्टिमला बंदी घालता, मग आता एवढे मोठे साऊंड का लावता, असा आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान, या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. मी बारामतीत येणार असल्याचा राष्ट्रवादीने एवढा धसका घेतला आहे की, त्यांनी येथे लावलेल्या साऊंड सिस्टिम व फलकावर आक्षेप घेत माझा आवाज रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना माहिती नाही की, हम मोदी जी के बाशिंदे है, हमारा आवाज कोई ...
अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ' अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ' अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश नवी दिल्ली - (वृत्तसंस्था) साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती कमळ घेतले. नवी दिल्लीत त्यांचा भाजप प्रवेश झाला. त्यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे चर्चेत होते. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा रंगत होत्या. आज अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत अखेर हाती कमळ घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते उपस्थित होते. शिवरायांचे विचार पुढे घेऊनच भाजपची वाटचाल - उदयनराजे छत्रपती शिवाजी महारांजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला आहे. त्या आदर्शावर आपली लोकशाही चालत आहे. त्य...
राष्ट्रवादीला सावरण्यासाठी शरद पवार उतरणार मैदानात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रवादीला सावरण्यासाठी शरद पवार उतरणार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्याच्या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत. शरद पवार पुढील आठवड्यापासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करतील. यावेळी ते मतदारांशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करतील. पवारांच्या या दौऱ्याचा नेमका तपशील अजून जाहीर झालेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी सध्याच्या घडीला शरद पवार यांच्याइतका समर्थ नेता पक्षात नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून नेत्यांची घाऊक आयात सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला होता. यामध्ये जगजितसिंह राणा, सचिन अहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, अवधुत तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि भाजपचा रस्ता धरला होता. यापैकी मधुकर पिचड आणि भास्कर जाधव र...
गणपती विसर्जनाच्या वेळी खाडीपात्रात दोन शाळकरी मुले बुडाली :शोध सुरु
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गणपती विसर्जनाच्या वेळी खाडीपात्रात दोन शाळकरी मुले बुडाली :शोध सुरु रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील पडवे बंदर येथे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. पडवे बंदर येथील खाडीपात्रात दोन शाळकरी मुले बुडाली आहेत. ऋत्विक भोसले आणि कुलदीप वारंग अशी दोघांची नावे आहेत. दोघेही पडवे गावातील टुकरूल वाडी येथील रहिवासी आहेत. दोघेही अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ही मुले गणपती विसर्जन करण्यासाठी गेली असताना हा प्रकार घडला. पाण्याचा अंदाज न आल्याने सदर दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ऋत्विक आणि कुलदीप दोघेही मुंबईत वास्तव्याला होते. मात्र, गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते. या घटनेमुळे पडवे गावावर शोककळा पसरली आहे.
सोमवार रोजी राज्यातील निवडणूक जाहीर होणार!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सोमवार रोजी राज्यातील निवडणूक जाहीर होणार! नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणूक पूर्व रणधुमाळी जोरात सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राज्यात राजकीय पक्षांच्या यात्रांनी त्यामध्ये आणखी भर घातली आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला समाप्त होत आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यावधीमध्ये विधानसभा निवडणूक होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (ता.१२) रोजी आढावा बैठक होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी ही शेवटची बैठक असणार आहे. या बैठकीनंतर तिन्ही राज्यातील तिन्ही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी आजच्या आढावा बैठकीपूर्वी राज्यांचा दौरा केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी विधानसभा निवडणुक कार्यक्रमल जाहीर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होण्याचे जवळपास निश्चित झाले असले, तरी झारखंड निवडणूक तारखा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याच...
आ. संगीता ठोंबरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. ठोंबरेंना न्यायालयाचा दणका
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आ. संगीता ठोंबरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. ठोंबरेंना न्यायालयाचा दणका बीड प्रतिनिधी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागसवर्गीय सहकारी सूतगिरणीचे कथित संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी केज न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ.विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केज तालुक्यातील लाडेगाव येथील गणपती सोनाप्पा कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे कि, २०१५ साली आ. संगीता ठोंबरे यांनी स्वतः मुख्य प्रवर्तक होऊन नियोजित लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागसवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रस्तावित केली होती. आ. ठोंबरे आणि त्यांचे पती तथा सूतगिरणीचे अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे यांनी गणपती कांबळे यांची पूर्वसंमती न घेता त्यांना अंधारात ठेऊन आणि त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांना सूतगिरणीच्या संचालकपदी नेमणूक केली. याच पद्धतीने या दांपत्याने सचिन भीमराव चव्हाण आणि अशो...
विधानसभा निवडणूक 2019 पाच वर्षे वाट पाहिली; आता त्यांनाच उमेदवारी- मुख्यमंत्री
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विधानसभा निवडणूक 2019 पाच वर्षे वाट पाहिली; आता त्यांनाच उमेदवारी- मुख्यमंत्री मुंबई : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पाच वर्षे वाट पाहिली. आता त्यांनाच इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.11) म्हटले आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हर्षवर्धन यांचा प्रवेश झाला ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा प्रवेश हा योग्य वेळी झाला आहे. मोठा नेता पक्षात आल्याने बळकटी मिळणार असून विरोधात असतानाही आमचा हर्षवर्धन यांच्याशी संबंध होता. राज्यात त्यांनी जबाबदारीने काम केले असल्याचा निर्वाळाही यावेळी दिला. भाजप शिवसेना आणि मित्रपक्षाचे सरकार नक्कीच पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यामुळे इंदापूरवासियांच्या पाण्यापासून सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम; अण्णा हजारे पवारांवर बरसले
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम; अण्णा हजारे पवारांवर बरसले मुंबई प्रतिनिधी : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. अनेत्क नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यावरून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे अण्णा हजारे यांनी पक्षांतरावरून शरद पवारांना टोला लगावला आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून अनेक लोक सोडून जात आहेत. याचं कारण म्हणजे शरद पवारांचं काम आहे. साखर कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून ‘जैसी करनी वैसी भरनी’ असल्याचे अण्णा हजारे म्हणाले आहेत. त्यामुळे अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. त्यांनी सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोकं पक्षात घ्यावी लागतात. तशी मंडळी भाजप घेत आहे. जनतेने यांचा निकाल लावावा, असं विधान अण्णा हजारे यांनी केले आहे. पुढे बोलताना त्यांनी भाजपची सुद्धा काही वर्षात अशीच अवस्था होईल. हे लोक य...
विधानसभेच्या निवडणुकीबाबत पवार-सोनिया यांच्यात चर्चा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विधानसभेच्या निवडणुकीबाबत पवार-सोनिया यांच्यात चर्चा नवीदिल्ली वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील 10 जनपथ या निवासस्थानी भेटीसाठी पोहचले आहेत. या दोघांमध्ये पाऊण तासांहून अधिक काळ चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. त्याच संदर्भात सोनिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी पवार दिल्ली येथे गेले होते. या दोघांमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काय करायचे, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना भाजपने आस्मान दाखवले. आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला कशी टक्कर द्यायची, याबाबत या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.