पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बा विठ्ठला... महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलाचरणी साकडे

इमेज
पंढरपूर, दि. 1 (प्रतिनिधी):          बा विठ्ठला... महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज  श्री  विठ्ठलाच्या चरणी घातले.    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  तेजस ठाकरे उपस्थित होते.   श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्...

पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची नारद टि.व्ही.साठी निवड

इमेज
बीड (प्रतिनिधी) - पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची नारद टि.व्ही.च्या लेखक टीम मध्ये निवड करण्यात आल्याने त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.        याबाबत सविस्तर वृत्त असे की, जगभरातील अनेक देशात नारद टि.व्ही.चे प्रसारण केले जाते. या टि.व्ही.चॅनल ने देशपातळीवर निवड करण्यासाठी भारतात लेखकांची ऑनलाइन स्पर्धा घेतली होती. यामध्ये लेखकांची लेखनाच्या दर्जानुसार अ,ब,क अशा गटात निवड करण्यात आली. यात एस.एम.युसूफ़ यांची अ गटात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशभरातून निवडण्यात आलेल्या अ गटातील लेखकांमध्ये महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व करणारे एस.एम.युसूफ़ हे एकमेव आहेत. २०१४ सालापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत असणारे एस.एम.युसूफ़ यांना आतापर्यंत उत्कृष्ट पत्रकारितेसाठी चंपावतीरत्न, पद्मपाणी, मातृभूमी आणि जिजाऊरत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. नारद टि.व्ही.साठी लेखक म्हणून त्यांची निवड झाल्याने त्यांच्या लेखन कार्यात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्क्यांवर कायम*. *राज्यात कोरोनाच्या ७५ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू*- आरोग्यमंत्री राजेश टोपे

इमेज
  मुंबई, दि.३०: राज्यात आज कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ६६ हजार ७२३ नमुन्यांपैकी  १ लाख ७४ हजार ७६१ नमुने पॉझिटिव्ह (१८.७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७८ हजार  ३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के एवढा आहे.  मागील ४८ तासात झालेले ९५ मृत्यू हे मुंबई मनपा-३६, ठाणे-३, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा- ४, भिवंडी निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-२, नाशिक-२, नाशिक मनपा-१, जळगाव-५, पुणे-१, पुणे मनपा-५, पिंपरी चिंचवड मनपा-३,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृषीदिनाच्या शुभेच्छा!

इमेज
कृषीक्रांती आणि अन्नधान्यासंदर्भातील स्वयंपूर्णतेसाठी वसंतराव नाईक सदैव स्मरणात राहतील, प्रेरणा देतील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन मुंबई, दि. 30 : ‘कृषीक्रांती’ घडवून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब त्यांच्या दूरदृष्टी, व कर्तृत्वामुळे सदैव स्मरणात राहतील, त्यांचे विचार, कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा गौरव करुन अभिवादन केले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी  राज्यातील जनतेला ‘कृषीदिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे. अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन ...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन

इमेज
देवा पांडुरंगा, यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे. बळीराजाच्या शेतात, घरात सुखसमृद्धी नांदू दे; कोरोनाचं संकट दूर कर, कोरोनायोध्यांचे संरक्षण कर, महाराष्ट्राचं भलं कर, आव्हानं पेलण्याची शक्ती आम्हाला दे – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 30 : “देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केलं असून महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त...

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

इमेज
मुंबई, दि 30 :  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात

बीडकरांना दिलासा..

*कोविड 19/बीड/ अपडेट /30/06/2020* *आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 108*  *पॉजिटिव्ह अहवाल---00*  *निगेटिव्ह अहवाल --- 107* *inclusive अहवाल ---- ०१*

कोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची पंढरपूरला भेट

इमेज
पंढरपूर, दि. २८- आषाढी एकादशीची वारी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला काल भेट दिली.    महाव्दार चौकातून  दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला साकडं घातलं "विठू माऊली तू माऊली जगाची आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची संपूर्ण जग भारत व महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशीर्वाद असू द्या. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ.भारत भालके उपस्थित होते.   पांडुरंगाच्या दर्शनानंतर गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले की, पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे. भाविकांनी घरातूनच नामस्मरण व पूजा करावी - आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक ...

आजचे अहवाल निगेटिव्ह

इमेज
*कोविड 19-बीड अपडेट - 28/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 18* *निगेटिव्ह अहवाल - 18* *पॉजिटिव्ह अहवाल - 00*

दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांनी घाबरू नये : खा.डॉ.प्रितमताई मुंडे. *जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना खा.प्रितमताईंनी दिल्या सूचना, बुधवार पर्यंत पंचनामे पूर्ण होणार

इमेज
बीड.दि.२७----यंदा पर्जन्यमान चांगले असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीसह बियाणे खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली व पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे पेरणीची कामे देखील पार पडली.जिल्ह्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये पेरणी झाली आहे.परंतु एका हप्त्याचा कालावधी उलटला तरीही पेरणी केलेले पीक उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत.यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांनी घाबरू नये असे म्हंटले आहे. बोगस बियाणांमुळे परळी,अंबाजोगाई व केज तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात पीक उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या.याबत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रशासनाशी चर्चा केली.तर जिल्ह्यात एकूण एकविसशे तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी चारशे शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत व उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे येत्या बुधवार पर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती त्यांना प्रशा...

प्रशासन आणि बागवान यांच्या मध्ये भरडले जाताहेत ग्राहक - एस.एम.युसूफ़ भाजीपाल्याचे भाव चारपटीने वाढले; सामोपचाराने तिढा सोडविण्याची गरज!

इमेज
बीड (प्रतिनिधी) - शहरातील आडत मार्केटला प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सील लावल्याने या निषेधार्थ बागवानांनी बंद पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक नाहक भरडले जात असून सामोपचाराने तिढा सोडविण्याची गरज असल्याचे मत पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.             पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या लॉक डाऊनने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीतून सर्वसामान्य जनता कसेतरी रडतखडत जीवन जगत आहे. अनेकांचे व्यवहार डबघाईस आले आहे. तर अनेकांचे बंदही झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या मोल मजुरांच्या हातांना काम नाही. आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरतांना नाकी नऊ येत आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव वास्तविक पाहता शासन-प्रशासनासह ज्यांचे उद्योग सुरू करण्‍यात, चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. परंतु याचे प्रशासनासह जीवनावश्यक म्हणून मान्यता असलेल्या भाजीपाला विक्रेते बागवान यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने आडत मार्केटल...

विप्रनगरचा काही भाग सील तर आजचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह ! बीडकरांना दिलासा ...

इमेज
बीड प्रतिनिधी -  शहरातील बामनवाडी , विप्रनगर भागातील एक महिला औरंगाबाद येथे कोरोना बाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने शनिवारी या भागात फवारणी करत पाहणी केली , दुपारी जिल्हाधिकारी यांनी हा भाग कॅन्टोन्मेंट जाहीर केला .दरम्यान आज पाठवलेले सर्वच्या सर्व स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .      शहराच्या  मध्यवस्तीत  असलेल्या बामनवाडी भागातील एका कुटुंबातील महिलेला न्यूमोनिया चा त्रास होऊ लागल्याने सुरवातीला शिवकमल हॉस्पिटलमध्ये आणि नंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले .त्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ नरेश कासट यांनी स्वतः या भागाची नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह पाहणी करत या भागात फवारणी करून घेतली .   दरम्यान दुपारी जिल्हाधिकारी यांनी विप्रनगर भागातील श्रीकिशन जेथलिया यांच्या घरापासून माऊली मुंडे यांच्या घरापर्यंतचा भाग कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे . दरम्यान शनिवारी पाठवलेल्या 24 पैकी 24 स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने     बीडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे . *कोविड 19-बीड अपडेट - 27/जून/२०२०* *आज पाठविल...

जिल्ह्यात हेअर सलून,स्पा व ब्यूटी पार्लर २८ जून पासून सुरु करण्यास अटी व शर्तीच्या आधारे परवानगी--जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

इमेज
बीड,  दि. २६:- जिल्ह्यात हेअर सलून,स्पा व ब्यूटी पार्लर २८ जून २०२० रोजी पासून सुरु करण्याबाबत अटी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.       हेअर सलून,स्पा व ब्यूटी पार्लर चालू करणे संदर्भात निर्देशानुसार अटी पुढील प्रमाणे आहेत. १. हेअर कट, केसांना रंग लावणे, व्हॅक्सींग,थेड्रींग इत्यादी सारख्या सेवांना परवानगी देण्यात आली असून त्वचेविषयीच्या सर्व सेवांना परवानगी नाही. याबाबत संबंधित दुकानदार यांनी दुकानाबाहेर दर्शनी भागावर फलक लावावा. २. हेअर सलून, स्पा, ब्यूटी पार्लर आदी  दुकानात काम करणाऱ्या व्यक्ती व कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्हाँज,अप्रॉन इत्यादी  परिधान करुनच सेवा देणे बंधनकारक असेल. ३. हेअर सलून, स्पा, व्यूटी पार्लर दुकानदार यांनी प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्या ग्राहकाची खुर्ची सॅनीटाईज करुन घ्यावी. तसेच दर दोन तासाला पूर्ण दुकान सॅनीटाईज करुन घ्यावे. ४. हेअर सलून/स्पा/ब्यूटी पार्लर दुकानदार यांनी एकदाच वापर करण्यायोग्य (Disposable ) टॉवेल, नॅपकीन इत्यादीचा वाप...

चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे गुढ मृत्यू ; चिंतेचा विषय!*

इमेज
* चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे गुढ मृत्यू ; चिंतेचा विषय!* हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलीवूड आणि मायानगरी ही म्हटले जाते. या माया नगरीमध्ये अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या गुढ मृत्यूची छाया दिवसेंदिवस गडद होत चालल्याचे वारंवार दिसून येत आहे.         अलीकडच्या काही वर्षात इथे दिव्या भारती, जिया खान, श्रीदेवी आणि नुकतेच सुशांतसिंग राजपूत यांच्या गुढ मृत्युने ही बाब अधोरेखित होते. कुणाच्या ध्यानीमनी नसताना या सर्व कलाकारांचे अकस्मात मृत्यू झाले.          यापैकी श्रीदेवी या एकट्या वयस्क कलाकार होत्या. मात्र दिव्या भारती, जिया खान आणि सुशांत सिंग राजपूत हे अत्यंत कमी वयाचे होते. त्यांचे वय मरण्याचे नव्हतेच. तरीही त्यांच्या बाबतीत असे काय घडले ? की या तिघांनाही अनैसर्गिक व अकल्पित मृत्यूला सामोरे जावे लागले ? हा प्रश्न चित्रपट रसिकांच्या मनाला भेडसावतो आहे. या तिघांच्या समोर चित्रपट सृष्टीत उज्वल भविष्य होते. तिघंही अल्पावधीतच चर्चित व नामवंत चेहरे बनले होते. त्यांचे चित्रपट हि यशस्वी ठरत होते. चित्रपट रसिका...

भिमसेना महासंघ पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदीसुचिता हरपळे यांची निवड

इमेज
पुणे प्रतिनिधी:  भिमसेना महासंघ या सामाजिक संघटना महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता हरपळे  यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  .महाराष्ट्र राज्यातील , सुशिक्षित बेरोजगार , बेराजगार अभियंता , शासकीय कंत्राटदार , शासकीय / निमशासकीय कर्मचारी , कामगार , माथाडी , रिक्षा / टॅक्सी चालक मालक , हॉकर्स , मजुर , शेतमजुर , इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भिमसेना महासंघ ही सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून शेकडो उपेक्षित , शोषितांना , कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. भिमसेना महासंघाची ध्येय धोरणे नागरिकांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेमध्ये चांगल्या कार्यकर्त्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन पुणे शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ माॅ साहेब, छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, छ.शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर  या महापुरुषांच्या विचारांचा वारसा  घेऊन चळवळीत काम करणाऱ्यांना सामाज...

आज सर्व निगेटिव्ह

*कोविड 19-बीड अपडेट - 24/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 65* *निगेटिव्ह अहवाल - 63* *रिजेक्टेड - 02* *पॉजिटिव्ह अहवाल - 00*

बीड जिल्हयात आज 65 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले*

बीड प्रतिनिधी:  कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.    जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे. १) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      02 2) CCC बीड      34 3) ग्रामीण रुग्णालय,माजलगाव  4) उपजिल्हा रुग्णालय केज 09 5)उपजिल्हा रुग्णालय परळी 02 6) SRTR आंबोजोगाई 10    *एकूण बीड जिल्हा 65*

बीडकरांना दिलासा आज एकही नाही पॉझिटिव्ह

*कोविड 19-बीड अपडेट - 23/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 17* *निगेटिव्ह अहवाल - 17* *पॉजिटिव्ह अहवाल - 00*

आज 4 पॉझिटिव्ह ; 63 निगेटिव्ह

 बीड दि .22 ( प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधून आज सोमवार रोजी 67 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून 67 पैकी 4 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 63 निगेटिव्ह आले आहेत .  * कोविड 19 - बीड अपडेट - 22 / जून / २०२० * * आज पाठविलेले स्वब -67 * * निगेटिव्ह अहवाल - 63 ** पॉजिटिव्ह अहवाल 04 **  प्रलंबित अहवाल -00 *  * छोटी राज गल्ली , बीड 04- *  * ३० वर्षे स्त्री , 38, 27 व 10 वर्षे पुरूष

बीड शहरातील शहेनशाह नगर येथे कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू--जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

बीड,  दि. 21:- बीड शहरातील शहेनशाह येथे  कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले  रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत . जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी याबाबत अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील शहेनशाह येथील रशीद इंजिनियर यांच्या घरापासून ते खालिद अब्दुल यांचे घरापर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .    राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदे...

कोविड 19-बीड अपडेट - 21/जून/२०२०*. *आज पाठविलेले स्वॅब - 31*. *निगेटिव्ह अहवाल - 23* *पॉजिटिव्ह अहवाल - 05*

* कोविड 19-बीड अपडेट - 21/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 31* *निगेटिव्ह अहवाल - 23* *पॉजिटिव्ह अहवाल - 05* *प्रलंबित अहवाल- 03* *माळी गल्ली, पाटोदा 04 -* ११ व ३० वर्षे स्त्री, ०७ व ३३ वर्षे पुरूष *शहेनशहा नगर, बीड 01 -* २५ वर्षे पुरूष

कोविड १९-बीड अपडेट - २०/जून/२०२०*. *आज पाठविलेले स्वॅब - ७७*. *निगेटिव्ह अहवाल - ६८*. *पॉजिटिव्ह अहवाल - ०९*

*२* - २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला - रा.झमझम कॉलनी, बीड *१* - २६ वर्षे महिला - रा. शहेनशहा नगर, बीड *४* - ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा - रा.बशिरगंज, बीड *२* - ३१ वर्षे महिला,  ८ वर्षे मुलगा -  रा.चिंचपूर ता.धारूर (औरंगाबादहून आलेले)

मृत्यू दर रोखणे महत्वाचे, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको* *मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा* *-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश*

इमेज
मुंबई दि १९ : कोरोनाशी आपण ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.  मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे कारण रुग्ण संख्या वाढत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर...

मॉलिक्युलर आणि आरटीपीसीआर कोविड प्रयोगशाळेचे लोकार्पण सिंधुदुर्गासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालय देणार. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इमेज
सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 19 – सिंधुदुर्गात रेण्वीय निदान ( मॉलिक्युलर) व आरसीपीटीआर कोविड लॅब प्रयोगशाळेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्या चाचण्या जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे याचा जिल्हावासियांना लाभ होणार आहे. सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी देखील आपण  पूर्ण करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  आज सांगितले. जिल्हा रुग्णालयात एकुण 3 कोटी 21 लाख 83 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन  उद्घाटन केले.        निसर्गरम्य कोकणावर माझे नेहमी प्रेम राहिले आहे. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन खंबीरपणे उभे राहील असे सांगून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने अत्यंत कमी कालावधीत या प्रयोगशाळा उभ्या केल्या त्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले तसेच या प्रयोगशाळेतून यापुढे कोरोनाच्या पॉझिटीव्ह चाचण्या येऊ नयेत यासाठी...

*बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसर येथे कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू --जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

इमेज
बीड,  दि. १९:- बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसर येथे  कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले २ रुग्ण आढळून आले  आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .    याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसर येथील संध्या दत्तात्रय वेदपाठक यांच्या घरापासून ते मोहम्मद मुश्ताक बागेपर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .    राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहे...

कोविड-19/बीड अपडेट/19जून 2020*. *बीड जिल्हयातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले *

 कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.    जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे. १) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      21 2) CCC बीड      20 3) स्वाराती ग्रा. वै. महा.आंबाजोगाई।    03 3) ग्रामीणरुग्णालय,आष्टी 02 4) उपजिल्हा रुग्णालय केज 30        *एकूण बीड जिल्हा 76*

विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत सोबत राहील : आ. संदीप क्षीरसागर विनाअनुदानित शिक्षकांचे आ.क्षीरसागरांना निवेदन

इमेज
बीड प्रतिनिधी: मागील चार वर्षापासून फक्त वीस टक्के 20% अनुदान घेत असलेल्या सर्व शाळांना 1 एप्रिल 2019 पासून प्रचलित नियमा प्रमाणे पुढील अनुदानाचा वाढीव टप्पा द्या, अनुदान घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना तत्काळ  20 % अनुदान सुरू करून अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची यादी निधी सह घोषित करा  या प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी आज राज्यभर विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्याच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये सर्वच आमदारांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आले. बीड विधानसभेचे सदस्य संदीप क्षीरसागर यांना बीड तालुका विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन आमच्या मागण्या शासनापुढे मांडून मंजूर करून घ्याव्या असे विनंती यावेळी करण्यात आले.    महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आज  विनाअनुदानित शिक्षकांना 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार वेतनाचे आदेश काढावेत. सध्या 20% अनुदान घ...

मोफत धान्य;शासनाने चालविली आधार कार्ड धारकांची क्रूर चेष्टा - एस. एम.युसूफ़ जाचक अटींमुळे राशन दुकानदार मोफत वाटपाचे धान्य उचलण्यास तयार नाही!

इमेज
बीड (प्रतिनिधी) - शासनाकडून आधार कार्ड धारकांसाठी घोषित करण्यात आलेले मोफत धान्य अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अजून वाटप करण्यात आले नाही. शिवाय यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अटी टाकून शासन मोफत धान्यासाठी आधार कार्ड धारकांची क्रूर चेष्टा करीत असून राशन दुकानदार मोफत वाटपाचे धान्य उचलण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. शासनाचे याबाबतीतले नियोजन आधार कार्ड धारकांना भीक नको पण कुत्रा आवर चा अनुभव देणारे ठरणार असल्याचे मत पत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.          पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारी च्या लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीने बी.पी.एल.(पिवळे) रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारकडून राशन दुकानातून नेहमीप्रमाणे अल्प दर व त्यानंतर प्रति मानसी पाच किलो धान्य दरमहा प्रमाणे तीन महिने मोफत देण्यात आले. त्यानंतर ए.पी.एल.(केशरी) रेशन कार्ड धारकांना ८ रुपये प्रतिकिलो दराने गहू तर १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ देण्यात आले. ज्यांच्याकडे बी.पी.एल. व ए.पी.एल. यापैकी कोणतेही रेशन कार्ड नाही अशा कुटुंबीयांना त्य...

मोफत धान्य;शासनाने चालविली आधार कार्ड धारकांची क्रूर चेष्टा - एस. एम.युसूफ़ जाचक अटींमुळे राशन दुकानदार मोफत वाटपाचे धान्य उचलण्यास तयार नाही!

बीड (प्रतिनिधी) - शासनाकडून आधार कार्ड धारकांसाठी घोषित करण्यात आलेले मोफत धान्य अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अजून वाटप करण्यात आले नाही. शिवाय यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अटी टाकून शासन मोफत धान्यासाठी आधार कार्ड धारकांची क्रूर चेष्टा करीत असून राशन दुकानदार मोफत वाटपाचे धान्य उचलण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. शासनाचे याबाबतीतले नियोजन आधार कार्ड धारकांना भीक नको पण कुत्रा आवर चा अनुभव देणारे ठरणार असल्याचे मत पत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.          पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारी च्या लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीने बी.पी.एल.(पिवळे) रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारकडून राशन दुकानातून नेहमीप्रमाणे अल्प दर व त्यानंतर प्रति मानसी पाच किलो धान्य दरमहा प्रमाणे तीन महिने मोफत देण्यात आले. त्यानंतर ए.पी.एल.(केशरी) रेशन कार्ड धारकांना ८ रुपये प्रतिकिलो दराने गहू तर १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ देण्यात आले. ज्यांच्याकडे बी.पी.एल. व ए.पी.एल. यापैकी कोणतेही रेशन कार्ड नाही अशा कुटुंबीयांना त्यांच्या कुटुं...

आज एकूण 57 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले

इमेज
     कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.    जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे. १) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      06 2) CCC बीड      07  3) स्वारातीवै महा आंबा. 2 3) उपजिल्हारुग्णालय,गेवराई 02 4)ग्रामीण रुग्णालय आष्टी 05 5)उपजिल्हा रुग्णालय, केज  28 6)उपजिल्हा रुग्णालय परळी 07        *एकूण बीड जिल्हा 57*

आज पाठविलेले सर्वच अहवाल निगेटिव्ह

*कोविड 19-बीड अपडेट - 16/जून/२०२०* *आज पाठविलेले स्वॅब - 87* *निगेटिव्ह अहवाल - 87* *पॉजिटिव्ह अहवाल - 00*

तीन दिवस महाराष्ट्रात धो धो पाऊस !

इमेज
पुणे : वृत्तसंस्था अरबी समुद्रात चक्रीयस्थिती निर्माण होऊन वार्‍याचा वेग वाढल्याने मंगळवार, 16 जूनपासून गुरुवार 18 जूनपर्यंत तीन दिवस राज्यात धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी दिला. अरबी समुद्र पार करीत मान्सूनचे वारे वेगाने देशाच्या 60 टक्के भागात सोमवारी पोहोचले. केरळपासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणापर्यंत मान्सूनने धडक मारली. अरबी समुद्रात वार्‍यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने 16 ते 18 जून या तीन दिवसांत महाराष्ट्रात  मुसळधार पाऊस बरसणार आहे. कोकण किनारपट्टीला 16 ते 18 जूनदरम्यान वादळी वारे अन् अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. देशात टॉप टेनमध्ये चंद्रपूर गेल्या चोवीस तासांत पावसाच्या सरासरीत देशात टॉप टेनमध्ये केरळमधील कन्‍नूर (64 मि.मी.), तर महाराष्ट्रातील चंद्रपूर (63 मि.मी.) दुसर्‍या स्थानावर, वाशीम (60 मि.मी.) सातव्या स्थानावर आहे, असा अहवाल ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिला आहे. पुणे शहरात...

आज एकूण 85 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले.*

इमेज
*कोविड-19/बीड अपडेट/16जून 2020*   कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.    जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे. १) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      72            2) उपजिल्हारुग्णालय,गेवराई 2 3)उपजिल्हा रुग्णालय, केज  11        *एकूण बीड जिल्हा 85* *टीप :- सदरची माहिती स्वाराती वै महा.आंबाजोगाई वगळुन आहे.*

चाटगाव जोड रस्त्याचे काम त्वरित सुरू करा - आमदार सोळंके यांना प्रतीक देशमाने फाऊंडेशनचे निवेदन

इमेज
दिंद्रुड प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या बीड - परळी महामार्गालगत चाटगाव जोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे प्रतीक देशमाने फाऊंडेशन या संस्थेने सोमवार (१५ जून) रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.  धारूर तालुक्यातील चाटगाव जोड रस्त्याची दुरवस्था झालेली असून या ग्रामस्थ आणि वाहनधारकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाबाबत सामाजिक क्षेत्रात नव्याने उतरलेल्या प्रतीक देशमाने फाऊंडेशन या संस्थेने आमदार प्रकाश सोळंके यांना निवेदन देऊन याबाबत त्वरित लक्ष देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात प्रतीक देशमाने फाऊंडेशनचे अध्यक्ष बालासाहेब हांगे, सचिव बाबा देशमाने, उपाध्यक्ष दीपक गडसिंग यांचा समावेश होता.  ....... आर. टी. देशमुखांनी दिली  केवळ आश्वासने चाटगाव जोड रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या कार्यकाळात केवळ ग्रामस्थांना आश्वासने देण्यात आली. मात्र आता विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे या रस्त्याचे काम मार्गी लावतील, असा ...

बीड मध्ये पुन्हा दोन पॉजिटिव्ह

इमेज
बीड प्रतिनिधी: बीड शहरात पुन्हा दोन पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पूर्वी मिळून आलेल्या झमझम कॉलनी आणि मासरत नगर येथील भागातील असल्याचे समजते. काल पाठविलेले स्वॅब – 68 निगेटिव्ह अहवाल – 66 पॉजिटिव्ह अहवाल – 02 यात झमझम कॉलनी, बीड (पुरूष वय 34 वर्षे) तसेच मसरत नगर, बीड (मुलगा वय १३ वर्षे) आज तपासात आढलून आले

*बीड जिल्हयातील आज 63 स्वॅब तपासणीसाठी पाठविले.*

कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.    जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे. १) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड21          २) सी. सी. सी. बीड 41    3) उपजिल्हारुग्णालय,परळी 01        *एकूण बीड जिल्हा 63* *टीप :- सदरची माहिती स्वाराती वै महा.आंबाजोगाई वगळुन आहे.*

जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह अधिकार-यांचे अहवाल निगेटिव्ह

इमेज
जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह अधिकार-यांचे अहवाल निगेटिव्ह बीड प्रतिनिधी:  जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . यासंदर्भात स्वतः बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे .     बीडच्या  जिल्हाधिका-यांसह अन्य अधिका-यांचा अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा उदघाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आला होता . त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते . आज पहाटे जिल्हाधिकारी यांच्यासह वैद्यकीय अधिष्ठाता आणि एसडीओ , अंबाजोगाई यांच्या स्वॅब चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे . यामुळे प्रशासनासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे . 

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात आज होतील १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

इमेज
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात आज होतील १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या मुंबई दि १४:  महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर आज सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होणार आहेत. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई , उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचीही उपस्थिती राहील. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका , चीन , दक्षिण कोरिया , सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली  असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक, प्रमुख देशांचे राजदूत व देशातील मोहिमा आणि द्विपक्षीय गुंतवणूक संस्था यांच्यासमवेत संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या  उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सत्राचे आयोजन केले आहे. थेट परदेशी गुंतवणुकीसाठी शेर्पा म्हणून प्रधान सचिव  भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि राज्याच्...

माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला बरा वाटणार नाही - अन्नत्याग, नवस, पायी वारी करणाऱ्या समर्थकांना धनंजय मुंडेंचे कोरोना वॉर्डातून आवाहन!*

इमेज
* माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला बरा वाटणार नाही - अन्नत्याग, नवस, पायी वारी करणाऱ्या समर्थकांना धनंजय मुंडेंचे कोरोना वॉर्डातून आवाहन!* मुंबई (दि. 14) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यभरातुन त्यांचे समर्थक प्रार्थना, नवस, अन्नत्याग, पायी वाऱ्या करत आहेत; धनंजय मुंडे यांनी थेट कोरोना वॉर्डातून आपल्या या समर्थकांना असे काहीही न करण्याचे आवाहन केले आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून याबाबत अत्यंत भावनिक व संवेदनशील आवाहन करणारी पोस्ट केली असून, कोरोनातून लवकरात लवकर मुंडेंनी मुक्त व्हावे यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे काही समर्थक उपवास, नवस, पायी वाऱ्या आदी करत आहेत; काहीजण मुंबई कडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांचे हे प्रेम पाहून त्यांचे आपल्यावरील ऋण वाढतच जात असल्याचे ना. मुंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन येणार असून कोणीही पायी चालत वारी करणे, अन्नत्याग - उपवास...