पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धुनकवाडच्या कुलकर्णी बंधूच्या आत्मनिर्भर शेतीची राज्यात चर्चा सीताफळाला हैद्राबाद बाजारात प्रचंड मागणी

इमेज
धुनकवाडच्या कुलकर्णी बंधूच्या  आत्मनिर्भर शेतीची राज्यात चर्चा  सीताफळाला हैद्राबाद बाजारात मागणी किल्लेधारूर दि.२८ (प्रतिनिधी)- धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील प्रगत शेतकरी कल्याण कुलकर्णी आणि त्यांच्या भावंडांनी काबाडकष्ट करून जिथे कुसळ उगवायत नाही तिथे सीताफळाची  लागवड केली. त्यांच्या सिताफळाला हैद्राबादच्या बाजारपेठेत 120 रूपायाचा भाव मिळत आहे असून सिताफळाला प्रचंड मागणी वाढली आहे. सध्या कुलकर्णी यांच्या सिताफळाच्या उत्पादनाची राज्यात चर्चा सुरू आहे.   या बाबत अधिक माहिती अशी की धारुर तालुक्यातील धुनकवड प्रा.एस.पी., राम आणि कल्याण या  तीन भावंडांनी वडिलोपार्जित शेतीचा वारसा पुढे घेवुन जाताना अत्याधुनिक शेती करण्यावर मागच्या काही वर्षापासुन भर दिला आहे. राम कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या जातीचे उत्पादन घेवुन मराठवाड्यात दुष्काळ असतानाही पंधराशे टनच्या आसपास उत्पादन घेतले तर कल्याण कुलकर्णी यांनी धुनकवाडात काबाडकष्ट करून डोंगरमाथ्यावरच्या शेतीत फळफळावळीची लागवड करून बदलुन टाकली. जिथे कुसळं यायची अगदी खडकाळ शेती  सिंचनाखाली आ...

नाळवंडी सर्कलमधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी घेतली ना. अब्दुल सत्तार यांची भेट

इमेज
नाळवंडी सर्कलमधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी घेतली ना. अब्दुल सत्तार यांची भेट   ढेकणमोहा दि.२० (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील नाळवंडी सर्कल मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्यासाठी राज्याचे महसूल, ग्रामीण विकास, बंदरे, खारजमीन विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री मा. नामदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, राहुल रेखावर  (जिल्हाधिकारी बीड), कुंडलिक खांडे (शिवसेना जिल्हाप्रमुख बीड), अरुणा डाके (माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नागेश शिंदे (माजी सरपंच ढेकनमोहा), नारायण देवकते (चेअरमन ढेकणमोहा), पंजाब काकडे, दिलीप शेळके, भास्कर देवकते, आशोक आखाडे सर, भागवत खाकरे आदींची यावेळी उपस्थिती होती. या भेटीप्रसंगी नामदार अब्दुल सत्तार यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आश्वासन दिले.

ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना पन्नास हजाराची मदत द्यावी-- परमेश्वर वाघमोडे बीडमध्ये रासपाचे धरणे आंदोलन

इमेज
ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना पन्नास हजाराची मदत द्यावी-- परमेश्वर वाघमोडे बीडमध्ये रासपाचे धरणे आंदोलन बीड दि.२०(प्रतिनिधी)  अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपायाची मदत करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांनी केली. परमेश्वर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रासपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.       राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रनायक महादेव जानकर  यांच्या आदेशाने शेतकरी बांधवांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याच प्रमाणे पंचनामे न करता शेतकऱ्याच्या सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी या मागणीसाठी मंगळवार दि.20 रोजी बीड येथे  जिल्हाधिकारी कार्यालया समोर  एक दिवशीय  धरणे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडू नये, अतिवृष्टीची झळ सर्व शेतकर्‍यांना बसली असून, सरकारने तातडीने मदत करावी नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा...

पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख*. *खांडवी येथे शेतात जाऊन केली पाहणी*

इमेज
* पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख* *खांडवी येथे शेतात जाऊन केली पाहणी* बीड दि.२० (प्रतिनिधी):-राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे  शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.  या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करून प्रस्ताव सादर  राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. गेवराई तालुक्यातील खांडवी येथे भेट देऊन मंत्री श्री अमित देशमुख यांनी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे आदी उपस्थित होते.  वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री देशमुख म्हणाले, परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे बराच ठिकाणी 130 ते दोनशे टक्क्यापर्यंत जास्त पाऊस झाल्याने शेत पिकांबरोबरच खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे देखील राज्यात नुकसान झालेले ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही -- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारजिल्हा दौर्‍यात पिक नुकसानीची पाहणी करण्याकरिता बीड व गेवराई तालुक्यात भेट

इमेज
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित  राहणार नाही -- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्हा दौर्‍यात पिक नुकसानीची पाहणी करण्याकरिता बीड व गेवराई तालुक्यात भेट बीड दि.१९( प्रतिनिधी)::-- शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाची कर्ज घेण्याची देखील शासनाची मानसिकता असून नुकसान झालेला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, ग्राम विकास, बंदरे, खार जमीनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. अतिवृष्टीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहणी करण्यासाठी  महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर.  राजा, माजी राज्यमंत्री श्री. बदामराव पंडित, श्...

देवडी गावकऱ्यांच्या प्रेमाने न्यायमूर्ती देशमुख गहिवरले...

इमेज
देवडी गावकऱ्यांच्या प्रेमाने न्यायमूर्ती देशमुख गहिवरले... गावच्या मातीचा सुगंध कधी विसरणार नाही, एक आवाज दिला लगेच धावून येऊ: न्या. दिलीप देशमुख देशमुख बंधु म्हणजे प्रामाणिक माणसाचा कारखाना - राम कुलकर्णी बीड  दि.१९ (प्रतिनिधी) – माझ्या देवडी ग्रामस्थांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. गावचा आशीर्वाद आणि आई वडिलांची पुण्याई यामुळे जीवनात नेहमीच यश मिळाले. मागे वळून पाहताना केलेले कष्ट आणि आमच्यासाठी आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आज आनंद वाटतो. सामाजिक जाणीव ठेवून आम्ही काम करतो. गावासाठी जेवढ चांगलं काम करणे शक्य त्या साठी नेहमीच पुढे राहू. गावच्या मातीचा सुगंध कधी विसरणार नाही, एक आवाज दिला तर लगेच धावून येऊ असा विश्वास वडवणी तालुक्यातील देवडी गावचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश श्री. दिलीप देशमुख यांनी देवडी येथील गावकऱ्यांच्या सत्काराला उत्तर देताना म्हटले. तर देशमुख बंधू खऱ्या अर्थाने प्रामाणिक माणसाचा कारखाना असून, सामाजिक जाणीव ठेवत न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेलं कर्तुत्व उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्ण...

माजी मंञी जयदत्त क्षीरसागरां कडून अतिवृष्टी नुकसानीची पाहणी

इमेज
माजी मंञी जयदत्त क्षीरसागर यांनी केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी  बीड प्रतिनिधी:  परतीच्या पावसाने मराठवाड्यात खूप नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी बांधवाला आतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे. कापूस, तूर व बाजरी ही पिके सडून गेली आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्व बाजूने मदत केली पाहिजे. त्यासाठी सरसकट नुकसान भरपाई दयावी अशी मागणी माजी मंञी जयदत्त क्षीरसागर यांनी केली.   बीड आणि शिरूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची  पाहणी माजी मंञी जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांनी थेट शेतात जाऊन केली.  त्या नंतर त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले कीशेतकऱ्यांना सर्व बाजूने मदत केली पाहिजे. सरसकट नुकसान भरपाई दयावी, पंचनामे होत राहतील, शेतकऱ्यांना तातडीची मदत होणे गरजेचे आहे. परतीच्या पावसाने मराठवाड्यात खूप नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी बांधवाला आतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे. कापूस, तूर व बाजरी ही पिके सडून गेली आहेत. उसाचे पीक ही वादळी वाऱ्याने झोपले आहे. शेत...

अतिवृष्टीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी--- पालकमंत्री धनंजय मुंडे*

इमेज
* अतिवृष्टीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी--- पालकमंत्री धनंजय मुंडे* *गेवराई , माजलगाव आणि वडवणी या ३ तालुक्यातील १० गावातील अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची केली पाहणी* *शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहणार--शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे थेट शेताच्या बांधावर* बीड दि. १८ (प्रतिनिधी):--परतीच्या अतिवृष्टीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत असून पिकविम्याासह नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे यांनी केले    परतीच्या पावसाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील कापूस,  सोयाबीन आदी पिकांची  प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री मुंडे यांनी जिल्ह्यातील ३ तालुक्याच्या ९ गावातील आहेत . यावेळी हिरापूर शिवारातील अंबादास तुकाराम ढेंगळे या अतिवृष...

नीटच्या परिक्षेत साक्षी वीरचे घवघवीत यश

इमेज
नीटच्या परिक्षेत साक्षी वीरचे घवघवीत यश बीड ; दि.१७ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील पाली येथील साक्षी सुभाष वीर हिने नीटच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. नीटच्या परिक्षेत तिला 537 गुण मिळाले आहेत.       कु.साक्षी वीर ही पाली येथील रहिवाशी असून , तीने मार्च 2018 ला चंपावती विद्यालय बीड येथून ssc परीक्षेत 96. 80 टक्के गुण घेऊन लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथून HSC परीक्षेत 89 टक्के गुण घेतले व नीट 2020 या वैद्यकिय प्रवेश परीक्षेत 720 पैकी 537 गुण घेऊन उज्जवल यश संपादन केले . वडील सुभाष वीर हे प्राथमिक शिक्षक असून ते प्रा.शा. खंडाळा येथे कार्यरत आहेत . या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिच्या या यशा बद्दल श्री . गिते सर ,अनिल राऊत सर, श्री . आबासाहेब घायाळ,  भिमराव वीर ,प्रकाश वीर, सचिन नवले, जोगदंड सर, आठवले सर, शिंदे सर, रघुनाथराव महामुनी साहेब, सचिन राऊत सर, फावडे सर, तोंडे सर, धापसे सर, प्रदिप चौरे सर यांनी अभिनंदन केले 

वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेचा इशारा

वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेचा इशारा  शनिवार दि. १७  (प्रतिनिधी) भारतीय हवामान खात्याने दि १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात तसेच विशेषत्वाने मराठवाड्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. विशेषतः १९ आणि २० ऑक्टोबर रोजी जास्त तीव्रतेने पाऊस येण्याचा इशारा प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेतात काढणीस तयार असलेल्या पिकाची पावसाची उघडीप पाहून त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या पिकाची तात्काळ सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पावसाचे पाणी शेतात, उभ्या पिकात, भाजीपाला, फळबागेत साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावा. वाऱ्याच्या वेगात वाढ संभवण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांना काठीचा आधार देण्यात यावा पिकांमध्ये फवारणी, आंतरमशागतीची कामे आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढे ढकलावी. सदर कामे स्थानिक हवामान परिस्थिती व पावसाची उघडीप पाहुन करावी असे आवाहन राजेंद्र निकम,  जिल्हा अधीक्षक कृषी अ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहिदांच्या मुलींसाठी आईसाहेब मंगल कार्यालय पूर्णतः मोफत - महंत राधाताई महाराज

इमेज
आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहिदांच्या मुलींसाठी आईसाहेब मंगल कार्यालय पूर्णतः मोफत  - महंत राधाताई महाराज   बीड दि.१७ (प्रतिनिधी)- संत मीराबाई संस्थान, महासांगवीच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांनी संस्थानचे प्रशस्त मंगल कार्यालय परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व शहीद सैनिकांच्या मुलींसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सैनिक आणि शेतकरी हे खऱ्या अर्थाने देशाचे आधारस्तंभ आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे सैनिक आपले खरे हिरो आहेत. त्यांच्या पश्चात आपण त्यांच्या कुटुंबाला आधार आणि सन्मान देणं गरजेचं आहे याच भावनेतून त्यांना आपण संत मीराबाई संस्थानचे आईसाहेब मंगल कार्यालय हे पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.    पाटोदा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महासांगवी गावात संस्थाचे भव्य मंगल कार्यालय आहे. जिथे पाणी, लाईट, पार्किंगची उत्तम व्यवस्था असून हजारो लोकं बसू शकतील अशी दर्जेदार आसन व्यवस्था आहे. पूर्ण दहा एक्कर च्या जागेत हा परिसर आहे. अत्यंत खेळती...

आज ११७ कोरोना पॉझिटिव्ह !

इमेज
आज ११७ कोरोना पॉझिटिव्ह ! बीड दि.१७ (प्रतिनिधी): गेल्या आठवड्यात कोरोनाचा कहर कमी झाला होता रोज पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी होत होती. मात्र आज  706 अहवालात 117 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पाडली . जिल्ह्यात विविध सर्कलच्या मोठ्या गावात अँटिजें टेस्ट घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणातआढळून आले होते . मात्र आता स्वब आणि अँटिजें टेस्ट घेण्यात येतात. आज दि .17 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाला 706 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 117 जण बाधित निघाले आहेत . तर 581 जण निगेटिव्ह आले आहेत.

केंद्र सरकारने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या पिकनिहाय किमान आधारभूत किमती

*केंद्र सरकारने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या पिकनिहाय किमान आधारभूत किमती खालीलप्रमाणे आहेत.* केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने खरेदी करणे पणन कायदा कलम ३४ आणि ९४ ड नुसार गुन्हा आहे. किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास मा. जिल्हा अधिनिबंधक यांच्याकडे तक्रार करावी. (क्विंटल मध्ये) भात/धान = १८६८ भात/धान(ए ग्रेड) = १८८८ ज्वारी = २६२० ज्वारी मालदांडी = २६४० बाजरी = २१५० नाचणी = ३२९५ मका = १८५० तूर = ६००० मूग = ७१९६ उडीद = ६००० भुईमूग = ५२७५ सूर्यफूल = ५८८५ सोयाबीन = ३८८० तीळ = ६८५५ काराळे =  ६६९५ कपाशी मध्यम धागा = ५५१५ कपाशी लांब धागा = ५८२५ ऊस = २८५० प्रति टन

_प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा- मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश_*

इमेज
* _प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा- मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश_* *अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा* मुंबई, दि. १६:-  राज्यात  काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका.  लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना  विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी   राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी आज  पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला. बैठकीस खासदार अनिल देसाई,  खासदार विनायक राऊत, मुख्यसचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  प्रधान सचिव विकास खारगे,  कृषी विभागाचे सचिव एकनाथ ...

नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा; गरबा, दांडिया यासह नवरात्रातील कार्यक्रमांबाबत शासकीय सूचनांचे पालन करा - धनंजय मुंडे*

इमेज
*नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा; गरबा, दांडिया यासह नवरात्रातील कार्यक्रमांबाबत शासकीय सूचनांचे पालन करा - धनंजय मुंडे* *नवरात्रोत्सवाच्या प्रारंभानिमित्त दिल्या बीड जिल्हावासीयांना शुभेच्छा* बीड (दि. १६) ---- : बीड जिल्ह्यासह राज्य व देशभरात उद्यापासून नवरात्रोत्सव आरंभ होत असून, कोरोनाच्या वाढत्या आकडेवाऱ्या लक्ष्यात घेत या नवरात्रोत्सवात घटस्थापना, देवी आदिशक्तीची स्थापना, गरबा, दांडिया यासह अन्य उपक्रम व सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत. विविध मंडळांनी शासकीय सुचनांचे पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच देवी स्थापना करावी व साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करावा असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे. नवरात्रोत्सव प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. बीड जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत विशेष नियमावली घोषित केली आहे, त्या नियमावलीचे काटेकोर पालन करत, देवी स्थापना तसेच जिल्ह्याती...

राज्यात पावसाचा धोका टळलेला नाही ; लष्करासह सर्व यंत्रणा हाय अलर्टवर

इमेज
धोका टळलेला नाही ; लष्करासह सर्व यंत्रणा हाय अलर्टवर  मुंबई प्रतिनिधी: राज्यात परतीच्या पावसाचा कहर सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला आहे . पावसाचे संकट अजूनही कायम आहे . उस्मानाबाद , सोलापूर , पंढरपूर आणि बारामती या 4 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ( एनडीआरएफ ) तुकड्या तैनात केल्या आहेत . तसेच वायूसेना , नौदल , लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली .  महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे  मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रभर जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसाचा हा धोका महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास राहणार आहे . त्यामुळे शेतकरी , मच्छिमार आणि नागरीकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे. पुढील 48 तासात महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढेल. हा पट्टा पश्चिम- वायव्येकडे सरकत जाऊन तीव्र स्वरूपाचा होईल. त्यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  पुणे शहर , जिल्ह्यात मुसळधार पाऊस  पुणे जिल...

पैठणच्या नाथसागर धरणात मगरींचा मुक्त संचार; पाण्यात उतरण्यास प्रशासनाकडून मनाई

पैठणच्या नाथसागर धरणात मगरींचा मुक्त संचार; पाण्यात  उतरण्यास प्रशासनाकडून मनाई पैठण दिली.१५ (प्रतिनिधी): येथील नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने या पाण्यात मगर व अन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्यामुळे धरणाच्या पाण्यात पर्यटक व नागरिकांनी पाहण्यास व पाण्यात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे.    येथील नाथसागर धरणाच्या नियंत्रण कक्षाच्या पाठीमागे असलेल्या धरणाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 फूट लांबीची मगर या ठिकाणी असलेले पोलीस व सुरक्षारक्षकाला आढळून आले आहे. त्यामुळे धरणामध्ये पाहण्यासाठी व पाण्यामध्ये उतरण्यास नागरिक, शेतकरी, पाणी लाभधारक यांना सुचित करून या परिसरात जानवरे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आले आहे यापूर्वी देखील या नाथ सागर धरणात अशाच पद्धतीने मगर आढळून आली होते. या नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेले असून यातून गोदावरी नदीमध्ये 13 हजार 624 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात अभ्यासिका, पार्क, आठवडी बाजारसह काही बाबींना परवानगी---जिल्हाधिकारी राहूल रेखावार*

* कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात अभ्यासिका, पार्क, आठवडी बाजारसह काही बाबींना परवानगी---जिल्हाधिकारी राहूल रेखावार* बीड,दि. 15 :- (जि.मा.का) जिल्ह्यात कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात अभ्यासिका,पार्क, आठवडी बाजारसह काही बाबीनां अटी व शर्तीसह आजपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय, दुकान, बाबींना रात्री 9 वाजेपर्यंत कामकाज करता येईल. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर इत्यादी कोविड-19 विषयक सर्व बंधने पाळणे आवश्यक आहे,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी राहूल रेखावार यांना दिले आहेत. बीड जिल्हयात दिनांक 31 ऑक्टोबर 2020 राजी रात्री 12.00 वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये मनाई,जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लागू राहतील. तसेच राज्य शासन यांचे प्राप्त आदेशानुसार खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.  *कंटेन्टमेंट झोन क्षेत्राबाहेरील...

आता आठवडी बाजार भरणार; ग्रंथालये, अभ्यासिका उघडणार व्यवसायांना रात्री 9 वाजेपर्यंत मुभा-जिल्हाधिकारी

आता आठवडी बाजार भरणार; ग्रंथालये, अभ्यासिका उघडणार व्यवसायांना रात्री 9 वाजेपर्यंत मुभा-जिल्हाधिकारी बीड (प्रतिनिधी) : कंटेनमेंट झोनबाहेर आठवडी बाजार भरविता येणार आहे. तसेच, ग्रंथालये, अभ्यासिका, संशोधन प्रयोगशाळांसह अन्य बाबींना मुभा देण्यात आली आहे. बीड जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे आदेश बुधवारी रात्री जारी केले आहेत.  या आदेशात पुढे म्हटले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार कंटनेमेंट झोन बाहेर काही बाबींना परवानगी देण्यात येत आहेत. आजपासून (दि.15) आठवडी बाजार भरविता येणार आहेत. यात जनावरांच्या बाजाराचाही समावेश आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे म्हटले आहे. परवानगी असलेल्या व्यवसायांना रात्री 9 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये, क्लासेसला येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार असून ऑनलाईन सुरु शिक्षणासह आयटीआयसारख्या अल्प मुदतीच्या प्रशिक्षण केंद्रांना परवानगी दिली आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयोगशाळा सुरु ठेवता येतील मात्र तांत्रिक शिक्षण विभागाच्या नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. खाजगी व शासकीय वाचनालये, अभ्यासिका उघडता येणार आहेत...

तुमचे प्रेमच याच दादांसाठी शुभेच्छा; भेटण्याचा आग्रह नको..

इमेज
तुमचे प्रेमच याच दादांसाठी शुभेच्छा; भेटण्याचा आग्रह नको *कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शिवछत्र परिवाराकडून आवाहन* गेवराई, दि.०९ (प्रतिनिधी) ः- शिवछत्र परिवाराचे आधारस्तंभ आणि गेवराई विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा शनिवार, दि.१० ऑक्टोबर रोजी ८४ वा वाढदिवस आहे. आई तुळजाभवानीची कृपा आणि सर्वसामान्य जनतेचे आशिर्वाद यामुळे दादांची  प्रकृती उत्तम असून आजही तरुणांना लाजवेल असा उत्साह दादांकडे आहे. दादा आणि शिवछत्र परिवारावर प्रेम करणार्या बीड जिल्ह्यातील सर्व चाहत्यांचे प्रेम याच दादांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर कोणीही त्यांना भेटण्याचा आग्रह धरू नये, दादांच्याप्रती आपणा सर्वांच्या सदिच्छा, प्रार्थना आणि प्रेम त्यांचा उत्साह वाढवेल मात्र प्रत्यक्ष भेटीचा आग्रह नकोच असे आवाहन वाढदिवसाच्या पार्श्‍वभुमीवर शिवछत्र परिवाराकडून करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्म पितामह, गेवराई विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे शिल्पकार माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा शनिवार, दि.१० ऑक्टोबर...

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे*- *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

इमेज
* केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे*- *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* *शेतकरी प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन*  मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी): केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.    शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करणेबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक आज सह्याद्री अतिथिगृह सभागृह येथे झाली. या बैठकीस काही शेतकरी नेते हे ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकार या कृषी कायद्यासंदर्भात विविध शेतकरी संघटनांशी पारदर्शकपणे चर्चा करीत आहे याविषयी शेतकरी नेत्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असलो तरीही एकत्र आलो...

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने गांधी जयंती साजरी

इमेज
मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने गांधी जयंती साजरी बीड दिली.२ (प्रतिनिधी) - आज २ ऑक्टोबर २०२० शुक्रवार रोजी राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.         याबाबत सविस्तर वृत्त असे की, गांधी जयंतीच्या निमित्ताने शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूच्या माने कॉम्प्लेक्स चौकात महात्मा गांधी यांच्या बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो या घोषवाक्याचे प्रतीक असलेल्या तीन माकडांच्या प्रतिकृतीला पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर माकडांच्या प्रतिमेला फुल-हार घालून गांधीजींच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. तसेच प्रतिकृतीच्या चबुतऱ्यासमोर जिनी सायप्रस हे शोभेचे झाड लावण्यात आले. चबुतऱ्याच्या चारही बाजूला झाडू मारुन स्वच्छता करण्यात आली. तसेच जिल्हा कारागृहामागे जिथे रस्त्यावरून ये-जा करणारे लोक लघुशंका करीत होते, तिथे वडाचे झाड लावण्यात आले. यासह अहेमदनगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरामध्ये वड, प...