पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ कायम; आज ’65’ रुग्ण पॉझिटिव्ह!

इमेज
जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ कायम; आज ’65’ रुग्ण पॉझिटिव्ह! बीड (प्रतिनिधी)  :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बीड जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती आकडेवारी नागरिकासह प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे.   कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे गणेश उत्सवातील हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये विरंजन पडले आहे. जिल्हा  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत भर पडली आहे. आज बीड जिल्ह्यात 65 नवे रुग्ण आढळले आहेत.

UNLOCK 4 ची नियमावली जाहीर! सर्वत्र फिरण्यास परवानगी;मात्र शाळा,कॉलेज, थिएटर मॉल बंद*

UNLOCK 4 ची नियमावली जाहीर! सर्वत्र फिरण्यास परवानगी;मात्र शाळा,कॉलेज, थिएटर मॉल बंद*   मुंबई (प्रतिनिधी) :- राज्य सरकारनं अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनं राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारन ई पास रद्द केला आहे. कोरोना व्हायरच्या महासंकटात 1 जूनपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. अनलॉकचा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत विमानांची उड्डाण आणि लँडिंगची संख्या 1 सप्टेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण 100 विमानांच उड्डाण आणि लँडिंग होतं, आताही संख्या दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर आता जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज नसणार आहे. हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे. अनलॉक-4 मध्ये काय सुरू होणार काय बंद राहणार हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार. -शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार. -30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही. -खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभ...

दिवंगत पत्रकार संतोष भोसले यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत

इमेज
दिवंगत पत्रकार संतोष भोसले यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत संकट समयी राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी-वसंत मुंडे बीड (प्रतिनिधी)-करोना कक्षात उपचार सुरू असताना पत्रकार संतोष भोसले यांचे निधन झाले. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिवंगत पत्रकार भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पत्रकार संघाच्या वतीने १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन मानसिक आधार दिला. करोना काळात मृत्यू पावल्यानंतर सरकारने घोषणा केल्याप्रमाणे त्यांच्या कुटुबियांना पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असुन याबाबतचा पाठपुरावा सुरू असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या पुढाकारातून राज्यात अडचणीच्या काळात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतली जाते.  बीड जिल्ह्यातील गेवराई येथील दैनिक सामना वृत्तपत्रात सलग 28 वर्ष कार्यरत असलेले तरुण पत्रकार संतोष भोसले यांना करोना सं...

मुख्यमंत्री साहेब, कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी शासन प्रतिनिधीच्या हातचे बाहुले कुठपर्यंत बनायचे?-डॉ. संजय तांदळे, एस.एम.युसूफ

इमेज
बीड (प्रतिनिधी)ः- नुकतेच नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाकडून तडका-फडकी बदली करण्यात आली. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते, डॉ. संजय तांदळे आणि एस.एम. युसूफ यांनी दि.28 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी शासन प्रतिनिधीच्या हातचे बाहुले कुठपर्यंत बनायचे? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.  निवेदनात म्हटले आहे की,  बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्तपदी असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची काही लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून शासनाने तुलनेने दुय्यम असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव पदी बदली केली. विशेष म्हणजे त्यांच्या पंधरा वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये ही पंधरावी बदली करण्यात आली आहे. असे का? तुकाराम मुंढे नियमानुसार आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत. ते जिथे-जिथे कर्तव्यावर असतात त्याठिकाणी जनतेच्या हितास्तव योग्य त्या सुधारणा करतात. असा आतापर्यंतच्या त्यांच्या प्र...

आज 85 कोरोना पॉझिटिव्ह !

आज 85 कोरोना पॉझिटिव्ह !  बीड - सोमवारी दि.२४ रोजी रात्री  1569 जणांच्या अहवालात 1484 जण निगेटिव्ह आले. तर 85 जणांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला. यात सर्वात अधिक रूग्ण (२०) बीड शहरात आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4हजार 77 इतकी झाली आहे. त्यामध्ये आता पर्यंत 104 रूग्णांचा मृत्यू झाला असून  2131रूग्ण  कोरोना मुक्त झाले  आहेत. तर आता 1842 रूग्णावर उपचार सुरू आहेत. बाधित रूग्ण पुढीलप्रमाणे. अंबाजोगाई -15  एसआरटी परिसरात दोन , ममदापूर पाटोदा तीन , शेपवाडी मध्ये दोन , पिंपळा धायगुडा येथे तीन विद्या कुंज कॉलनी साठे चौक क्रांतीनगर दीनदयाल कॉलनी सावता माळी चौक येथे हे रुग्ण सापडले .  बीड -20  ज्ञानेश्वर नगर मध्ये 2 नगर रोड धोंडीपुरा जुना बाजार काळे गल्ली , मोहम्मदिया कॉलनी मोमिनपुरा , कालिका नगर खडक पुरा माळी गल्ली जालना रोड , धांडे नगर शिवाजीनगर , राजू नगर धानोरा रोड , श्रीनगर पालवण चौक येथे दोन , अंकुश नगर पिंगळे गल्ली कारंजा रोड , बालाघाट शिक्षक कॉलनी येथे दोन कागदी वेस व राणू माता या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला . ...

लॉकडाऊन उघडताच 128 रुग्ण पॉझिटिव्ह!

इमेज
लॉकडाऊन उघडताच 128 रुग्ण पॉझिटिव्ह! बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्हयातील लॉकडाऊन उघडून एक दिवस सुद्धा पूर्ण झाला नाही तोच आज 128 पॉझिटीव्ह रूग्ण आढळले एकंदरीतच कोरोनाने शतकात खेळायला सुरुवात केली आहे.   जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 128 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आज 82 कोरोना पॉझिटिव्ह !

इमेज
आज 82 कोरोना पॉझिटिव्ह ! बीड : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाही. आज पुन्हा एकदा 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून आलेले रिपोर्ट प्रशासनाने आज जाहीर केले.

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

* सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*  बीड,  दि. २२::--जिल्ह्यातील बीड, माजलगांव, परळी , अंबाजोगाई , केज व आष्टी या शहरांमधील सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना  23 आॅगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण कुमार धरमकर यांनी दिले आहेत.  तसेच सर्वांनी कोवीड-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे. तसेच कन्टेनमेंट झोन मधील परिसरातील निर्बध तसेच कायम राहतील. यापूर्वी  बीड, माजलगांव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमध्ये २१ आॅगस्ट २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आले होते.  सुशोभिकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, व इतर सर्व प्रकारच्या सर्व दुकानांना उघडण्याच्या परवानगीबाबत लाॅकडाऊन नंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल असे नमूद केले असल्याने हे स्वतंत्र आदेश दिले आहेत  राज्य ...

वर्षावर 'श्री' ची प्रतिष्ठापना

इमेज
वर्षावर 'श्री' ची प्रतिष्ठापना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.

*श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास

इमेज
*श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास * *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्री गणरायांना वंदन व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा* पुणे, दि. २१ :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केलं असून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर, महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं श्री गणपती बाप्पांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिवबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरंच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.    उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणानं ...

संघर्ष यात्रा परिवाराकडून श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..!

इमेज
आजपासून सुरु होत असलेल्या         *"श्री गणेशोत्सवाच्या"* तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...! *विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती..* तुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना विषाणु, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे..! हीच  त्या *ब्रम्हांड नायकाकडे* प्रार्थना..!  *गणपती बाप्पा मोरया.....*      *मंगलमुर्ती मोरया.....*         *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻* *संपादक, पत्रकार संघर्ष यात्रा परिवार बीड*

पर्यावरणपुरक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करुन, गणेशोत्सव साजरा कराआवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन

इमेज
बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या पत्नी सौ. पूजा रेखावार यांनी बनवलेली ही पर्यावरणपुरक गणेशमुर्ती..!पर्यावरणपुरक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करुन, गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे बस वाहतुकीला अल्प प्रतिसाद

इमेज
जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे बस वाहतुकीला अल्प प्रतिसाद  * तब्बल ६ महिन्याने धावली लालापरी…!* *पहिली बस औरंगाबादला धावली* लालपरीला दे धक्का! बीड (प्रतिनिधी):  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून ६ महिन्यांपूर्वी प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी राज्य परिवाहन महामंडळाच्या बस डेपोत लालपरी अडकून पडली होती. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. गुरुवारी जिल्ह्याबाहेर एसटी बसला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर बीड बस्थानकात प्रवाशी दाखल झाले. यावेळी प्रवाशांना घेवून औरंगाबादला जाण्यासाठी लालपरी सोडण्यात  आली. तसेच जिल्हांतर्गत गेवराईकडे जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या होत्या. बसमध्ये सोशल डिस्टन्स पाळून प्रवाशांची आसण व्यवस्था करण्यात आली होती. एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी बसवण्यात आले होते.   जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे बसेसच्या वाहतुकीला अल्प प्रतिसाद  मार्च महिन्यापासून देशात कोरोना पेशन्ट सापडू लागले. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन करण्याचा निर्णय केेंद्र आणि राज्य सरकारने घेतला. एसटी महामंड...

दिवसातील अॅन्टीजेन टेस्टमध्ये 6 शहरात 690 पॉझिटिव्ह !

3 दिवसातील अॅन्टीजेन टेस्टमध्ये 6 शहरात 690 पॉझिटिव्ह ! बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापाऱ्यांच्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . मंगळवारी 212 , बुधवारी 230 व्यापारी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापाऱ्यांसह आता तीन दिवसातील सहाही शहरातील पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या 690 झाली आहे.    अंबाजोगाई , आष्टी , केज , माजलगाव , परळीत 18 , 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत व्यापारी व इतर सर्व  व्यावसायिकांच्या अॅन्टीजेन टेस्ट करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु होते . त्यात 19 ऑगस्ट रोजी 6189 अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 230 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले .  18 ऑगस्ट रोजी 5769 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात 212 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अँटीजन तपासणीच्या तिसऱ्या दिवशी 20 ऑगस्ट रोजी तब्बल 5877 व्यक्तींची तपासणी करण्यात आली . यात 248 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत . यामध्ये परळीत सर्वाधिक 100 तर माजलगाव 62 , अंबाजोगाई 38 , केज 28 , आणि आष्टीच्या 20 व्यक्तींचा समाव...

कोरोनाचा पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उत्सव साजरा करण्याबाबत निर्देश जारी*

इमेज
* कोरोनाचा पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उत्सव साजरा करण्याबाबत निर्देश जारी*                                                                  बीड (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी  राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव 2020 च्या मार्गदर्शक सूचना 11 जुलै 2020 रोजी निर्गमित केल्या असून जिल्ह्यात या सूचनांचे पालन करून उत्सव साजरा करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी निर्देश जारी केले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने  गणेश मंडळानी कोरोना विषयक नियमांचे तंतोतंत पालन करुन साध्या पद्धतीने साजरा करावा. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक् झाली असून  गणेश मंडळ पदाधिकारी आणि संबंधितांचे याबाबत चर्चा देखील झाली आहे            सर्व गणेश मंडळानी यासाठी 11 जुलै 20...

गणेश मंडळांच्या परवानगीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात एक खिडकी पध्दती*

इमेज
* गणेश मंडळांच्या परवानगीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात एक खिडकी पध्दती* बीड (प्रतिनिधी)--जिल्हयातील सर्व गणेश मंडळ यांचे अर्ज स्विकारुन परवानगी देण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन येथे एक खिडकी पध्दती संबंधित विविध विभागांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती अंतर्गत करण्यात येवून तेथूनच परवानगी देण्यात येणार असून इतर ठिकाणाहून परवानगी देण्यात येवू नये. यासाठी प्रत्येक अर्जदार यांनी प्रत्येक विभागाकडे वेगळे अर्ज करण्याची आवश्यकता नाही, केवळ एकच अर्ज एक खिडकी पध्दती अंतर्गत पोलीस स्टेशन येथे करावा.   श्री गणेशाची प्रतिष्ठापणा होणार असून बीड जिल्हयातील सर्व गणेश मंडळ यांना पोलीस विभाग, नगर परिषद, पंचायत, ग्रामपंचायत, विद्युत विभाग, सह.आयुक्त अन्न व औषध प्रशासन, सा.बा.विभाग ई.विभागांची परवानगी घेणे आवश्यक असल्याने सदर  आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी दिले आहेत . ______

शेकापचा आदर्शवंत सहकार*

इमेज
* शेकापचा आदर्शवंत सहकार* *सहकार कायदा*  ब्रिटीश सत्तेमध्ये १९०४ साली भारतातील पहिला सहकारी कायदा (सहकारी कायदा पतसंस्था १९०४) हा  नावापुरता चर्चेत आणला गेला. त्यातील काही जाचक त्रुटी स्पष्ट झाल्यावर १९१२ मध्ये सहकारी कायदा मंजूर करून अंमलात आणला गेला पुढे १९१९ मध्ये सहकार विषय प्रांतिक शासनाकडे वर्ग केला गेला. त्यामुळे विविध प्रांतांनी ज्यांचे त्यांचे स्वतंत्र सहकार कायदे तयार केले. मुंबई राज्य सहकारी संस्थांचा कायदा १९२५ हा कायद्याला मुंबई राज्याने मंजुरी केला. त्यानंतर १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र संस्थांचा कायदा (१९६०अधिनियम) हा मंजुर होऊन अस्तित्वात आला. सर्व सामान्य जनतेच्या आर्थिक विकास , उन्नती व कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार चळवळीस उत्तेजन व प्रोत्साहन द्यावे हे धोरण तत्कालीन कॉग्रेस (यशवंतराव चव्हाण) सरकारने अवलंबिले. तत्कालीन सत्ताधारी कॉग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांनी "विना सहकार नाही उद्धार" हे घोषवाक्य देत स्वतःसाठी व आप्तेष्ट, नातेवाईक,  सहकाऱ्यांसाठी सहकाराच्या नावाखाली चराऊ कुरणे तयार केली आणि "...

श्री गणेश मूर्ती दुकानासह , हार , फुले , फळे , मेडिकल , किराणा दुकानं उघडण्यास परवानगी

श्री गणेश मूर्ती दुकानासह , हार , फुले , फळे , मेडिकल , किराणा दुकानं उघडण्यास परवानगी  बीड (प्रतिनिधी) -बीड शहरा साहित 6 शहरात 21 ऑगस्ट पर्यंत लावण्यात आलेल्या संचारबंदी मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून गणेश मूर्तीची दुकाने , हार , फुले , फळे , मेडिकल , किराणा दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे .एक प्रकारे प्रशासनाने लॉक डाऊनला काही प्रमाणात ढिल दिली आहे.  जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर बीड , परळी , अंबाजोगाई , माजलगाव , केज आणि आष्टी या सहा शहरात 12 ते 21 ऑगस्ट पर्यंत लॉक डाऊन चा निर्णय जाहीर केला होता. यावेळी सर्व प्रकारची दुकाने , मेडिकल सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते . दरम्यान गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. आजपासून या सहा शहरात दोन फुटाच्या गणपती विक्रीची दुकाने , मेडिकल , फळ , फुल विक्रीची दुकाने , अगरबत्ती , पूजा साहित्य तसेच किराणा इत्यादी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने उघडण्यास परवानगी श्री गणपती मूर्ती , पूजा साहित्य व इतर दुकाने उघडण्यास परवानग...

जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांची कवडगावला भेट:जनावरांच्या आजारावर तत्काळ उपचार करण्याच्या केल्या सूचना*

इमेज
* जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांची कवडगावला भेट* *जनावरांच्या आजारावर तत्काळ उपचार करण्याच्या केल्या सूचना* कवडगाव बु. (शांतिनाथ जैन ) वडवणी तालुक्यातील कवडगाव बु.येथील सुमारे ७०%जनावरांना विविध रोगांनी गेल्या २ महिन्यापासुन पछाडलेले आहे मात्र जि प.च्या पशू वैद्यकीय विभाग यावर उपाययोजना व उपचार करायला तयार नव्हता. याबाबत वृत्त प्रकाशित होताच पशुवैद्यकिय विभाग खडबडुन जागा झाला. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे जिल्हा पशू संवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी आज कवडगावला भेट दिली. यावेळी त्यांनी जनावरांच्या आजाराची स्वतः पाहणी करुन यावर तत्काळ उपचार करण्याच्या सूचना उपस्थित पशुधन अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या .   याबाबत  अधिक माहिती अशी की वडवणी तालुक्यातील कवडगाव बु. येथे गेल्या २ महिन्यापासुन जनावरांना विविध आजाराने ग्रासल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. शेतक-यांना ऐन शेतीच्या कामाच्या वेळेतच हा आजार आल्याने शेती पडीक पडण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या अंगावर चट्टे येणे गळा सुजणे अशा विविध आजाराने जनावरांना पछाडले आहे. त्याचे सावट पोळा या सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या सण...

बीड शहरात गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

इमेज
बीड शहरात गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर बीड (प्रतिनिधी)-गणेशोत्सव हा सण साजरा करण्याची बीड शहरात शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र कोरोना काळात या सणावर काही बंधने आहेत. तरीही नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. बीड शहरात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांची कोणाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे दिनांक 22 रोजी नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उत्सव साजरा करण्यासाठी अनेक मंडळांनी मागणी केली आहे त्यामुळे कोरोना विषयक नियमांचे पालन करून त्यांना परवानगी दिल्यास गणेशोत्सव साजरा करता येईल,असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी अरुण डाके,अॅड. राजेंद्र राऊत हेही उपस्थित होते.

आज अँटीजन तपासणी;२१०रुग्ण पॉंझिटिव्ह!

इमेज
आज अँटीजन तपासणी;२१०रुग्ण पॉंझिटिव्ह! बीड (प्रतिनिधी):   बीड जिल्हयातील कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अनेक युक्त्या लढवून कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून तपासणीला सुरूवात झाली.आणि ५७५६ जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या.    जिल्ह्यातील पाच शहरात आज झालेल्या अँटिजेन टेस्टमध्ये 210 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे . पहिल्याच दिवशी 210 रुग्ण आढळले असून आणखी दोन दिवस या टेस्ट होणार आहेत . माजलगाव शहरात सर्वाधिक 71 तर परळीत 66 रुग्ण आढळून आले .

कोरोनाची शतक पार; काल जिल्ह्यात‘108’ रुग्ण पॉझिटिव्ह!

इमेज
कोरोनाची शतक पार; काल जिल्ह्यात‘108’ रुग्ण पॉझिटिव्ह!  बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाचा वाढता उद्रेक बीड जिल्हा प्रशासनाची आणि नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. दररोज येणाऱ्या धक्कादायक अहवालामुळे बीड जिल्हावासियांचे दैनदिन जीवन पार विस्कळीत होऊन गेले आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागात कोरोनाचे साम्राज्य स्थापित झाले आहे. यामुळे नागरिकांना मुक्त संचार करणे देखील कठीण झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी चिंताजनक वाढत असली तरी बीड जिल्हावासियांकरिता एकमेव दिलासादायक बाब अशी आहे ती म्हणजे बीड जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल बीड जिल्ह्यामध्ये एकूण ‘108’ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हवामान खात्याचा अंदाज पुढील 48 तास धोक्याचे!

इमेज
 हवामान खात्याचा अंदाज पुढील 48 तास धोक्याचे!  नागरिकांनी सतर्क रहावे. बीड (प्रतिनिधी) :-  गेल्या दोन आठवड्या पासून पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने हैराण झालेल्या नागरिकांना या वर्षी ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागते की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे यंदाचे २०२० हे वर्ष मानवी आयुष्यासाठी हानिकारक असल्याचे दिसून येत आहे.   ‌अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.   राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोयना, राधानगरी परिसरात सुरू असलेला पाऊस आणखी दोन दिवस असाच सुरू राहिल अशी माहिती आयएमडीने दिली आहे. तर पुण्यातही घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आ...

श्रमदानातून खज़ाना विहीर स्वच्छ करणाऱ्याचा संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार!

इमेज
श्रमदानातून खज़ाना विहीर स्वच्छ करणाऱ्याचा संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार! स्वछतेनंतर  स्वचछते आधी बीड (प्रतिनिधी) :-  शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या बार्शी रोडवर ऐतिहासिक खजाना विहीर ची अवस्था दरवर्षी अत्यंत बकाल होऊन जाते. वास्तविक पाहता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खजाना विहिरीची स्वच्छता करणे आवश्यक असून सुद्धा ती केली जात नाही. मात्र यावेळी शहरातील हेल्प फाउंडेशन, सेव्ह बर्ड्स, सेव्हनेचर ग्रुप या तीन संस्थांनी संयुक्तरित्या एकत्रित येत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसभर श्रमदान करून खज़ाना विहीर आतून-बाहेरून स्वच्छ केली. तसेच विहिरीच्या पाण्यावर जमलेले शेवाळ चे मोठमोठे थरही संपूर्ण उपसून फेकले. विहिरीच्या संपूर्ण परिसरातील घास काढून फेकले. यामुळे आता ही ऐतिहासिक विहीर घाण मुक्त झाल्याने या तिन्ही संस्थेचे पदाधिकारी शेख अमीर (पक्षीप्रेमी), सय्यद जाहेद, मेहराज खान, आबेद भाई, सोहेल खान,  शंभू लाला, सोहिल, इलयास काजी यांच्या या चांगल्या कार्याची नोंद घेत या सर्वांचा ए.आय.एम.आय.एम.पक्षाचे युवा नेते सय्यद इलयास यांनी पक्षाचे माजी जिल...

शिरूर कासार तालुक्यातील नागरिकांना सिंदफणा प्रकल्पाच्या वरील भागामध्ये असलेले प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असल्याने सावधगिरीचा इशारा

शिरूर कासार तालुक्यातील नागरिकांना सिंदफणा प्रकल्पाच्या वरील भागामध्ये असलेले प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असल्याने  सावधगिरीचा इशारा बीड, दि. 16 :- सिंदफणा प्रकल्पाच्या वरील भागामध्ये असलेले प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असल्या कारणाने शिरूर कासार तालुक्यातील सिंदफना नदीवरील सिंदफणा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे.  सिंदफणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे तसेच वरील प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तालुका प्रशासनातर्फे तालुक्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावेत. नदी,ओढे व नाल्याकाठच्या लोकांनी दक्ष रहावे. तसेच पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओल...

जिल्ह्यात पोळा सण सार्वजनिक उत्सव करण्यास प्रतिबंध--जिल्हाधिकारी राहूल रेखावार*

इमेज
* जिल्ह्यात पोळा सण सार्वजनिक उत्सव करण्यास प्रतिबंध-जिल्हाधिकारी राहूल रेखावार* बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यात पोळा हा सण सार्वजनिक उत्सव  करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.    पोळा हा सण सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास राज्य शासनाने विशेष परवानगी दिली नसल्याने या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला.  महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक 32 अन्वये दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी  पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम 144 (1( (3) लागू करण्यात आले आहे या कालावधीमध्ये सार्वजनिक स्थळी सामान्य नागरिकांसाठी  मोठया प्रमाणात जमाव तसेच सार्वजनिक  कार्यक्रमांवर संदर्भिय आदेशान्वये यापूर्वी प्रतिबंध केला आहे .  त्यामुळे  बीड जिल्ह्यात श्रावणामध्ये या सणासह गणेश उत्सव, ऋषी पंचिमी यासारखे सार्वजनिक सण उत्सव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सण  करण्यात  प्रतिब...

संकटाशी सामना करण्याचे धैर्य विद्यार्थ्यांत निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी करावे: श्री गणेश वाघ*

इमेज
* संकटाशी सामना करण्याचे धैर्य विद्यार्थ्यांत निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी करावे: श्री गणेश वाघ* *श्री महालक्ष्मी  विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न* बीड (प्रतिनिधी):   कोरोनाचं संकट हे आता पर्यंतच्या संकटात सर्वात मोठं संकट असून  प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवून देशसेवा करूया असे सांगत कोरोनाच्या काळात मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना दिलेल्या जाणाऱ्या शिक्षणातून संकटाशी सामना करण्याचे धैर्य निर्माण करण्याचे काम शिक्षकच करू शकतात ते शिक्षकांनी करावे असे अवाहन शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा आदर्श मुख्याध्यापक श्री गणेश वाघ यांनी  शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणा नंतर शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले.       बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे संचालक तथा आदर्श मुख्याध्यापक श्री गणेश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  ध्वजार...

बीड जिल्ह्यात आज 83 पॉझिटिव्ह!

इमेज
बीड जिल्ह्यात आज 83 पॉझिटिव्ह!  बीड दि .15 ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . जिल्हा प्रशासनाला आज शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या 450 अहवालापैकी 83 पॉझिटिव्ह तर 357 निगेटिव्ह आणि 10 अनिर्णित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे . बीड 20 , अंबाजोगाई 12 , धारूर 7 , गेवराई 1 , केज 6 , माजलगाव 9 परळी 7 , शिरूर 2 , वडवणी 3 , आष्टी 14 , पाटोदा 2 असे 83 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत 

यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

इमेज
शासन आणि प्रशासन एकाच  नाण्याच्या दोन बाजू, संविधानाने प्रत्येकाला दिलेले स्थान महत्त्वाचे--पालकमंत्री धनंजय मुंडे यूपीएससी, एमपीएससी तील परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव बीड, दि,१५ ::--शासन आणि प्रशासन एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानाने प्रत्येकाला दिलेले स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना प्रश्नांवर कुणाच्या प्रभावाखाली न येता योग्य काम करणे महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी केले  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री  धनंजय मुंडे यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोग ( यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी आमदार विनायक मेटे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्तेे पोलीस मुख्यालय बीड येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन*

इमेज
* पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्तेे पोलीस मुख्यालय बीड येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन* बीड, दि. १५::-- पोलीस मुख्यालय बीड येथे  पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वैद्यकीय देखभाली साठी उभारण्यात आलेल्या कोविंड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले  याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे,  जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कोरमा कालावधीत जिल्ह्यातील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि कर्तव्यासाठी जनतेच्या संपर्कात यावे लागते. या कोरोना योद्ध्यांची  देखभाल व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी या कोविड विलगीकरण कक्षाचा कक्षाचा उपयोग होणार आहे  ०००००