पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आष्टीत सलग तिस-या दिवशी बिबट्याचा थरार. बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू

इमेज
आष्टीत सलग तिस-या दिवशी बिबट्याचा थरार  बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू आष्टी दि.२९ (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरुच असून, रविवारी (दि.29)सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा जीव गेला आहे. यापूर्वी सकाळीच, आष्टीतील बोराडे वस्तीवरील महिलेला बिबट्याने जखमी केले होते. त्या महिलेवर अहमदनगरमध्ये उपचार सुरू असतानाच, त्याच भागात आज सांयकाळी सहाच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याने 55 वर्षीय महिलेवर हल्ला केला. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी झालेल्या पारगांव जोगेश्वरी परिसरातच वनविभागाचे पथक असून सुध्दा ही दुसरी घटना घडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.    आष्टी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. आज सकाळी शालन शहाजी भोसले (वय 61) या महिलेवर बोरोडे वस्ती परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. पण, प्रसंगवधाने तिची बिबट्याच्या जबड्यातून सुटका झाली. याठिकाणी लगेचच वनविभागाने पथके पाठवून पिंजराही लावला. पण, आज सायंकाळी 6 च्या सुमारास याच परिसरातील सुरेखा निळकंठ बळे...

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार*

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार*  औरंगाबाद ,दि.29 (प्रतिनिधी):-  आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त  1) आधार कार्ड  2) वाहन चालक परवाना  3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे....

पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*

* पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार* बीड दि.२९(प्रतिनिधी)::- पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या केंद्रामध्ये निवडणूक मतदानामुळे एक दिवसाचा बदल झाला आहे. यासंदर्भात सर्व संबधितांनी नोंद घ्यावी,  दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजीच्या मतदानामुळे खालील प्रमाणे परीक्षा केंद्रास बदल पुढील प्रमाणे आहे.    1) भगवान विद्यालय, बीड केंद्र क्रमांक २००३ (इ,. १०वी.) ऐवजी भा.वा.सानप प्राथमिक विद्यालय, धानोरा रोड,  बीड. ( भगवान विद्यालय,धानोरा रोड बीड समोर)  2) चंपावती विद्यालय, बीड  केंद्र क्रमांक २००० (इ,. १०वी.) ऐवजी चंपावती इंग्लिश स्कुल, बीड (चंपावती विद्यालय, बीड शेजारी)   3) बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्र क्रमांक २०९ (इ,. १२वी.) ऐवजी मिल्लिया कन्या शाळा,किल्ला मैदान, बीड ( बलभीम महाविद्यालय शेजारी)   4) श्री सिध्देश्‍वर विद्यालय, माजलगाव केंद्र क्रमांक २५०२ (इ,. १०वी.) ऐवजी सिध्देश्‍वर महाविद्यालय, माजलगाव ( श्री सिध्...

बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी सतरा पथके स्थापन

इमेज
बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी सतरा पथके स्थापन बीड दि.२८(प्रतिनिधी) :- सुरुडी व किनी येथे मानवी हल्ला केलेल्या  बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झालेल्या असून त्यामध्ये औरंगाबाद, अमरावती, नांदेड व इतर 1 अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ असणाऱ्या टीमचा ही समावेश असून एकूण ८० कर्मचारी यात सक्रीय आहेत तसेच आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू असून, सहा पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले आहेत. उद्या आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत.  लवकरच यशस्वीपणे जेरबंद करू असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे 0000

गणगेवाडी परिसरात बिबटया दिसला..!!

इमेज
गणगेवाडी परिसरात बिबटया दिसला..!! आष्टी दि.28( प्रतिनिधी): मागील दोन दिवसा पासून जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे. शिवाय त्याने अनेकांवर हरवले केले आहेत. या हल्ल्यात वाढ होत असताना आज संध्याकाळी ८:४५च्या दरम्यान  गणगेवाडी येथील घाडगे वस्ती येथील दादा घाडगे या शेतकऱ्यास बिबटया दिसला. त्यामुळे या ठिकाणच्या शेतक-यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.   गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामुळे  तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहे. सुरडी, किन्ही येथील घटनेमध्ये अनुक्रमे एक राजकीय पदाधिकारी व बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटना ताज्या असतानाच आज मंगळूर येथील माय लेकरावर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये महिला जखमी झाली आहे. ही घटना होऊन काही तासातच गणगेवाडी येथील घाडगे वस्ती येथे संध्याकाळी ८:४५च्या दरम्यान दादा घाडगे या शेतकऱ्यास बिबटया दिसला. घाडगे यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत वस्तीवरील नागरिकांच्या मदतीने आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहे.   नागरिकांनी बिबटया दिसताच ...

आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा महिलेवर हल्ला; सुदैवाने महिला वाचली

इमेज
आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा महिलेवर हल्ला;  सुदैवाने महिला वाचली आष्टी दि 28 (प्रतिनिधी): मागील दोन दिवसा पासून जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळच्या सुमारास आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. या वेळी महिले समवेत असलेल्या मुलाच्या प्रसंगावधाना मुळे सदर महिला बालंबाल बचावली. मुलांनी आरडाओरडा करताच बिबट्याने पळ काढला.   बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मागील दोन दिवसा पासून बिबट्याने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असून सर्वच ठिकाणी हल्ले होत आहेत.आज दुपारी मंगरूळ येथील शिलावती दत्ताञय दिंडे आणि त्यांचा मुलगा अभिषेक दिंडे हे आपल्या शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला केला. यामध्ये ती जखमी झाली.यावेळी जवळच असलेल्या मुलाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.आईवरचा हल्ला मुलामुळे परतून लावता आला. दरम्यान या वेळी मुलावर कोणत्याही हल्ला झाला नाही.   या महिलेने शेतात असताना अंगावर...

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीत आशिष देशमुख यांना छावा जनक्रांती संघटनेचा जाहीर पाठींबा

इमेज
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीत आशिष देशमुख यांना छावा जनक्रांती संघटनेचा जाहीर पाठींबा  औरंगाबाद दि.27 (प्रतिनिधी):- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची 2020 ची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होत आहे. अनेक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. आशिष अशोक देशमुख हे देखील मागील अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरून मतदारांच्या गाठी, भेटी घेवून शिक्षक, युवक, युवती, बेरोजगार आदी पदवीधर मंडळींना आपलेसे करत आहेत. त्यांच्या विविध प्रश्‍नांची जाणीव त्यांना असल्यामुळे लोक त्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता या भावनेने मतदान देण्याचे कबुल करत आहेत.  आशिष देशमुख यांचे सामाजिक कार्य, विविध संघटनांचा आणि चळवळीशी त्यांचा असलेला घनिष्ट संबंध आणि मराठवाड्यातील जनसंपर्क पाहून तसेच पदवीधर युवक, युवती, शिक्षक मंडळी, बेरोजगार मंडळी यांच्या प्रती असलेली तळमळ आणि त्यांच्यासाठी कार्य करण्याची उर्मी पाहून छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद पवार साहेब यांनी औरंगाबाद पदवीधर मतदार संघात छावा संघटनेच्यावतीने त्यांना निवडणूकीत जाहीर पाठींबा दिला आह...

नरभक्षक बिबट्याचा थरार... किन्ही गावात एका बारा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

इमेज
नरभक्षक बिबट्याचा थरार... किन्ही गावात एका बारा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू बीड दि.२७(प्रतिनिधी)-  आष्टी तालुक्यातील किन्ही गावात एका बारा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  बीड जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात मागील काही महिन्यांपासून बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी शेतकरी आणि नागरिक करत होते पैठण तालुक्यातील आपेगाव येथे बापलेकावर हल्ला केल्यानंतर दुसटी घटना आष्टी तालुक्यात घडली होती. पंचायत समिती सदस्य पती गर्जे यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता , दरम्यान आज शुक्रवारी सकाळी आष्टी तालुक्यातील किन्ही गावातील स्वराज सुनील भापकर या १२ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. सदरील मुलगा हा आपल्या शेतात कापूस वेचत असताना बिबट्याने त्याला ओढत  फरफटत नेले. यावेळी नागरिकांनी सदरील बिबट्याचा पाठलाग केला. परंतु बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला. सदरील घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडा -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

इमेज
* मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडा -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर*  औरंगाबाद, दि.26 (प्रतिनिधी) :  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ची मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे आयोजित मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. केंद्रेकर बोलत होत. यावेळी निवडणूक निरीक्षक बी. वेणूगोपाल रेड्डी, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपायुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. केंद्रेकर म्हणाले, मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे अचूकपणे मतमोजणी प्रक्रियेत पालन करावे. मतमोजणी प्रक्रियेत अचूकता, गती याचा विचार करावा. प्रशिक्षणात शंकांचे निरसन करून घ्यावे. निवडणूकसंबंधी सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रत्येकाने गांभीर्यपूर्वक व अचूकरित्या...

कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

इमेज
कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पंढरपूर दि 26( प्रतिनिधी) कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक महापूजा करण्यात आली.यावेळी त्यांनी जगावर देशावरचे कोरोनाचे संकट आहे, ते संकट दूर होऊ दे. कोरोनाची लवकर लस मिळू दे असे साकडे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने विठ्ठलाला घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे उपस्थित होते. कोरोणामुळे लोक डाऊन पडले आहे. शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणारे लोक यांनादेखील काम करता येत नाही. यामुळे त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होत आहेत. ही परिस्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे. कोरोनाव...

महाराष्ट्र विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मधील मतदारांना आपल नाव पाहण्यासाठी खालील लिंक पहावी*

* महाराष्ट्र विधानपरिषद  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मधील मतदारांना आपल नाव पाहण्यासाठी  खालील लिंक पहावी* 👆 मतदारांसाठी साठी सर्च लिंक https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र  औरंगाबाद ,दि.25 (प्रतिनिधी) :- येत्या 01 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार असून मतदानासाठी एकूण 813 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. 1) औरंगाबाद-106379 (206) 2) जालना- 29765 (74) 3) परभणी - 32681 (78) 4) हिंगोली - 16764 (39) 5) नांदेड - 49285 (123) 6) बीड- 64349 (131) 7) लातूर - 41190 (88) 8) उस्मानाबाद - 33632 (74). अशी माहिती निवडणूक शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे. ****

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020जिल्हयातील सर्व मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू-जिल्हाधिकारी राहूल रेखावार

इमेज
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020 जिल्हयातील सर्व मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू -जिल्हाधिकारी राहूल रेखावार बीड,दि. 25 (प्रतिनिधी) :भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्हयातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक-2020 ची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हयात निवडणूक कालावधी पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करुन ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यास राहूल रेखावार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,ब...

सचिन कांबळे या विद्यार्थ्यास उच्च शिक्षणासाठी बीड जिल्हा मुप्टा व बामसेफ कडून ५०हजाराची मदत

इमेज
  सचिन कांबळे या विद्यार्थ्यास उच्च शिक्षणासाठी बीड जिल्हा मुप्टा व बामसेफ कडून ५०हजाराची मदत  बीड दि.२५ (प्रतिनिधी)  राष्ट्रीय, राज्य, सामाजिक व व्यक्तिशः पातळीवर  जेव्हा जेव्हा आपत्कालीन संकट निर्माण होतात तेव्हा तेव्हा बीड जिल्ह्याच्या मुप्टा व बामसेफ सामाजिक संघटनांनी आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात पुढे केलेला आहे. सद्यस्थितीत कोरोना संकट काळातही मदत करण्यास बीड जिल्हा मुप्टा व बामसेफ मागे सरले नाहीत.  त्यातच सचिन बाबुराव कांबळे रा. खडकी (देवळा) ता. वडवणी जि. बीड या युवकाची मेलबोर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया येथे उच्चशिक्षणासाठी निवड झाली, परंतु घरची आर्थिक परिस्थिती  जेमतेम असल्याने हा युवक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकत नाही, हे समजतात बीड जिल्हा मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.प्रा. प्रदीप रोडे यांना समजले व त्यांनी आपल्या मुप्टा व बामसेफ संघटना पदाधिकारी व सदस्यांना याबाबत सूचित करून आर्थिक मदतीचे आव्हान केले असता केवळ दोन दिवसात सर्वांच्या वतीने 50 हजार रुपये जमा करून आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सद...

कौन बनेगा करोडपती विजेत्या सौ.लक्ष्मीताई पारखे यांचा रामलिंग पतसंस्थेकडून गौरव

इमेज
कौन बनेगा करोडपती विजेत्या सौ.लक्ष्मीताई पारखे यांचा रामलिंग पतसंस्थेकडून गौरव  सौ.लक्ष्मीताईंमुळे वडवणी व कोष्टी समाजाचे नाव देशाच्या धवलपटावर गाजले - कचरुसेठ झाडे  वडवणी दि.२४(प्रतिनिधी) मूळच्या वडवणी येथील रहिवासी असलेल्या व सध्या नोकरीनिमित्त भूम जि.उस्मानाबाद या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सौ.लक्ष्मीताई ज्ञानेश्वर पारखे (कवडे) यांना नुकतीच सोनी चॅनलवरील जगप्रसिध्द शो असलेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या संधीचं त्यांनी आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर सोने करीत या शोतून तब्बल १२ लक्ष ५० हजार रुपये एवढी धनराशी जिंकत त्या विजेत्या ठरल्या आहेत. दरम्यान सौ.लक्ष्मीताई यांच्यामुळेच वडवणी शहराचे व कोष्टी समाजाचे नाव देशाच्या व जगाच्या धवलपटावर नावाजले तसेच गाजले आहे. असे अभिमानास्पद उदगार चेअरमन कचरुसेठ झाडे यांनी रामलिंग पतसंस्थेच्या वतीने गौरव सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले.                    याबाबत अधिक माहिती अशी की, मूळच्या वडवणी जि.बीड येथील रहिवासी असलेल्या सौ.लक्ष्मीताई...

आष्टीत पुन्हा बिबट्याच्या थरार सुर्डी शिवारात पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यास बिबट्याने केले ठार

इमेज
आष्टीत पुन्हा बिबट्याच्या थरार सुर्डी शिवारात पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यास बिबट्याने केले ठार कडा दि.२५ (प्रतिनिधी) - सुर्डी गावापासून दुर अंतरावर असलेल्या वाघदरा शिवारातील शेतीत दुपारी तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. नागनाथ गहिनिनाथ गर्जॅ (४० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा थरार अनुभवायला येत असून शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.  आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गहिनिनाथ गर्जॅ हे गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या वाघदरा या शेतात तुरीला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवल्याने. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपार पासून गेलेले गर्जे सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शेतात पाहणी केली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळून आला.  वन अधिकारी मधुकर तेलंग यांनी गर्जे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असल्याचे स्पष्ट केले. बिबट्याला जेरबंद करण्यास...

दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी जाणाऱ्या पित्याचा अपघातात मृत्यु; तेलगाव येथील कारखाना परिसरातील दुर्दैवी घटना*

इमेज
* दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी जाणाऱ्या पित्याचा अपघातात मृत्यु; तेलगाव येथील कारखाना परिसरातील दुर्दैवी घटना* तेलगाव, दि. (प्रतिनिधी)= दिवाळी सणासाठी माहेरी आलेल्या मुलीला धारूर येथे सासरी सोडवण्यासाठी मोटारसायकलवर घेऊन जात असलेल्या पित्याच्या दुचाकीला भरधाव क्रुझर गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडिलाचा मृत्यु झाला. तर मुलगी जखमी झाली. सदर अपघात मंगळवारी दुपारी तेलगाव येथील सोळंके कारखाना परिसरात घडला.             यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील बाबुलतारा येथील रहिवासी असलेले बालासाहेब निवृत्ती घोलप यांची धारूर येथे दिलेली मुलगी दिवाळी सणासाठी माहेरी बाबुलतारा येथे दिवाळी पुर्वी आली होती. दिवाळी सण झाल्यानंतर मंगळवारी आपल्या मुलीला सासरी धारूर येथे सोडण्यासाठी बालासाहेब घोलप हे मोटारसायकल क्र.MH-23 AL6058 ने जात असताना तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात धारूरकडुन  भरधाव वेगात येणाऱ्या क्रुझर जीप क्र.MH- 19 AX9518 या गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्...

जिल्हयातील कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु- जिल्हाधिकारी राहूल रेखावार

इमेज
जिल्हयातील कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु - जिल्हाधिकारी राहूल रेखावार - सुरु राहण्याच्या वेळाबाबत स्थानिक तहसीलदारांच्या संमतीने निर्णय कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक सूचना   बीड,दि. 16 :- (प्रतिनिधी) राज्य शासनाने प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करणेसाठी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. या अनुषंगाने बीड जिल्हयातील केवळ कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 पासून खुली करणेसाठी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस आधीन राहून परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे खुले राहण्याच्या वेळेबाबत संबंधित विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी स्थानिक तहसिलदार यांच्या संमतीने निर्णय घ्यावा. मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्...

तरुणीवर अॅसिड हल्ला प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार: गृहमंत्री अनिल देशमुख

इमेज
तरुणीवर अॅसिड हल्ला प्रकरणाचा खटला  फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार: गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई , दि . १५ - (प्रतिनिधी) तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर तिला जिवंत जाळण्याच्या बीडमधील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे . दोषींना कोणत्याही स्थितीत कडक शिक्षा व्हावी यासाठी ' फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यासंदर्भात सूचना केली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली    संपूर्ण राज्याला हादरून सोडणारी घडना बीड जिल्ह्यात घडली. नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही खळवळजनक घटना घडली. प्रियकरानं प्रेयसिला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळलं . उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेवरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना आहे . ठाकरे सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता राज्यातील महिला सुरक्षेसाठी तात्काळ कृती आराखडा बनवावा , अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने या प्रकर...

प्रेयीसीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या नराधम प्रियकराला देगलुर पोलिसांनी घेतले ताब्यात

इमेज
प्रेयीसीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या नराधम प्रियकराला देगलुर पोलिसांनी घेतले ताब्यात   नांदेड दि.१५ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात येळंबघाट परिसरात पुण्याहून गावी परत येत असताना प्रेयीसीवर ॲसिड हल्ला करण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश रामकिशन राजुरे याला देगलूर तालुक्यातील आदमपूर येथे एका धाब्यावरुन देलगुर पोलिसांनी अटक केली. पुढील तपासासाठी आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.   देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात खडी क्रेशरजवळ मुक्कामासाठी थांबले होते. पहाटेच्या सुमारास अविनाशने तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले. तसेच पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याने गंभीर भाजलेल्या तरुणीला सोडून घटनास्थळावरुन पळ काढला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. अविनाश हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहे. त्यामुळे बीड पोलिसांनी आरोपीबाबत नांदेड पोलिसांनी माहिती दिली ह...

...त्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू

इमेज
...त्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू बीड दि. १५ (प्रतिनिधी)-  पुण्यात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात असलेली तरुणी दिवाळीसाठी गावी आली असता तरुणीच्या प्रियकराने तिच्यावर अॅसिड हल्ला करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न काल लक्ष्मी पुजनाच्या दिवशी केल्याची घटना घडली. या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरून गेला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोल हल्ल्यात जळालेल्या तरुणीवर उपचार चालू असताना तिचा आज सकाळी मृत्यू झाला.  या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.   माणुसकीला आणि प्रेम या शब्दाला काळिमा फासणा-या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.      नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामधील शेळगाव येथील सावित्रा ( वय 22 ) ही गेल्या काही महिन्यांपासून अविनाश राजुरे या तरूणा सोबत पुण्यात रिलेशनशीप मध्ये रहात होती. दि . 13 नोव्हेंबर रोजी हे दोघे पुण्याहून गावी मोटारसायकलवर परतत होते मात्र प्रियकराने सावित्रा हिच्या अंगावर अॅसिड टाकून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घडली . यातील प्...

भररस्त्यात प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा

भररस्त्यात प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा बीड (प्रतिनिधी) : पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात उघडकीस आली आहे . या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदरील पीडिता तब्बल 12 तास रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती.       नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा ( वय 22 ) असं पीडित तरूणीचं नाव आहे . ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती . दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब ( घाट ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा - केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले . हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही , काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले . तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी...

महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही: चित्रा वाघ

इमेज
* महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही: चित्रा वाघ मुंबई दि 15 प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील येळंबघाट येथे एका तरुणीवर ॲसिड हल्ला करून पेटवून दिल्याची घटना घडल्यानंतर राज्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की या राज्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कोणी वाली आहे की नाही? का महिलांची सुरक्षा ही फक्त भाषण आणि घोषणा यामध्येच अडकून पडली आहे काय?असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. युवतींवर होणाऱ्या ॲसिड हल्ल्यात यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री आणि अनिल देशमुख आंध्र प्रदेशामध्ये दिशा कायद्याचा अभ्यास संदर्भात गेले होते.मात्र त्यानंतर काय झालं. फेब्रुवारी महिन्यामध्ये सात अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि आताही घडलेली आठवी घटना असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आतापर्यंत दिशा हा कायदा आलेला नाही. मला राज्य सरकारला विचारायचं आहे की कधी हा का...

पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इमेज
पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि.१४ (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर  मागील सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद आसलेली राज्यातील मंदिरे आणि सर्वधर्मीयांची  प्रार्थनास्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . कोरोना संकटात राज्यातील जनतेने शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही . महाराष्ट्रावर साधू - संतांची, देव - देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त पाळत सावधगिरी राखत होळी , गणेशोत्सव, नवरात्र हे सण साधेपणाने साजरे करण्यात आले. यंदा पंढरीची वारीही झाली नाही . इतकेच नाही. तसेच इतर धर्मीयांनीही ईद , म...

ऊसतोड कामगारांचे नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनी ऊसतोड कामगारांना सुट्टी द्या - डॉ. संजय तांदळे

इमेज
ऊसतोड कामगारांचे नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनी ऊसतोड कामगारांना सुट्टी द्या - डॉ. संजय तांदळे बीड (प्रतिनिधी - राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी संपूर्ण हयात खर्च करणारे ऊसतोड कामगारांचे दैवत स्व. गोपीनाथराव मुंडे  साहेब यांच्या जयंती दिनी राज्यभरातील ऊसतोड कामगारांना सुट्टी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी, वाहतुक मुकादम कागार युनीयनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, पुणे येथील साखर आयुक्त चेतन गायकवाड यांना दि. 9 नोव्हेंबर 2020 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात तांदळे म्हणतात की, 27 ऑक्टोबर 2020 रोजी वसंतदादा पाटील, शुगर इन्स्टिट्युट मांजरी पुणे येथे खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर संघ व नोंदणीकृत ऊसतोड मजुरांच्या संघटनांमध्ये झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत ऊसतोड मजुरांच्या दरात 14 टक्के दर वाढ करण्यात आल्यानंतर ऊसतोड कामगारांचा दोन मह...

राज्यातील शाळा सुरक्षित पद्धतीने होणार सुरु!पालकांची संमती आवश्यक

इमेज
राज्यातील शाळा सुरक्षित पद्धतीने होणार सुरु! पालकांची संमती आवश्यक बीड दि.१०( प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळांची दार उघण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिली आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत सुरक्षितपणे शाळा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून घसरणीला लागला आहे. शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य  आणि शिक्षणाला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.   23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करत असताना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे.40 मिनिटांचे चार तासच शाळा होणार आहे. ही शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सुचनाही शिक्षण विभागाने या पुर्वीच जाहीर केल्या आहेत व या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शा...

रोषणाई करा , फराळ बनवा , पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका- उद्धव ठाकरे

इमेज
रोषणाई करा , फराळ बनवा , पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका- उद्धव ठाकरे  मुंबई दि.८(प्रतिनिधी):  रोषणाई करा , फराळ बनवा , पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका , असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र , बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचं का , याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा , असं उद्धव ठाकरे म्हणाले. पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र , अलीकडच्या काळात लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत: वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे . त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं 

कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम यांना मातृशोक

इमेज
कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम यांना मातृशोक  बीड दि.८ (प्रतिनिधी): कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री दिनकरराव कदम यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई बळवंतराव कदम यांचे आज दिनांक ८ नोव्हेंबर रोज रविवारी सकाळी ११.४५ वा वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष स्व. बळवंतरावजी कदम यांच्या त्या पत्नी होत्या. बळवंतराव कदम यांच्या  राजकीय, सामाजिक, शैक्षणिक  कार्यात त्यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पश्चात एक मुलगा सभापती दिनकरराव, आणि दोन मुली, जावयी, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी आज सायंकाळी ४.०० वा. त्यांच्या बलगुजार येथील शेतात  होणार आहे.

माध्यमिक शिक्षकांचा दसरा व दिवाळी पगाराविना - एस.एम.युसूफ

इमेज
माध्यमिक शिक्षकांचा दसरा व दिवाळी पगाराविना - एस.एम.युसूफ सहाय्यक बाईंनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राला दाखवली केराची टोपली बीड (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील जि.प.च्या माध्यमिक शिक्षकांचा पगार ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत देण्यात आलेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून माध्यमिक शाळेचे शिक्षक पगारापासून वंचित आहेत. म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शिक्षण संचालक कार्यालयाला याबाबत पत्र व्यवहार केला असता  सहाय्यक असलेल्या बाईंनी पत्राला केराची टोपली दाखविली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून कळाल्याचे पत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून कळविले आहे. पत्रकात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यातील  खाजगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक च्या सर्व शिक्षकांसह माध्यमिक शिक्षकांचे वेतन ही दरमहा नियमानुसार काढण्यात येत आहे असे असताना माध्यमिक विभागात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील माध्यमिक शाळेतील जेमतेम २६५ शिक्षकांचे वेतन का काढण्यात येत नाही? असा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे माध्यम...

झुंजार शिक्षणाचे वारसदार आदर्शाचे महामेरू आदर्श संस्थाचालक श्री गणेशरावजी वाघ साहेब !'*

इमेज
* झुंजार शिक्षणाचे वारसदार आदर्शाचे महामेरू आदर्श संस्थाचालक श्री गणेशरावजी वाघ साहेब!'* * आदर्शाचे महामेरू*    *'जशी खाण तशी माती याच मातीतून उगवती हिरे मोती* आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक साधुसंतांनी म्हटले आहे की 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या म्हणीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून देत काम करणारे बीड जिल्ह्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा 'वाघ परिवार' आहे. ज्यांचं नाव जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक चळवळीमध्ये आपुलकी प्रेमाने आणि आदराने घेतले जाते ते म्हणजे माननीय श्री गोविंदरावजी वाघ साहेब उर्फ नाना आणि मोठ्याबाई  या नावाने ओळखल्या जाणाऱ्या  आमच्या आईसाहेब सौ. सुदामतीताई वाघ या दोन महान व्यक्ती आजच्या आधुनिक काळातील 'फुले दांपत्य' म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे त्यांचे कर्तृत्व आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात एक सुवर्ण पान म्हणून ओळखले जाणारे 'वाघ कुटूंबीय' आहे. या वाघ परिवारात जन्मलेले आणि यांच्या नावात सर्व काही आहे असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय श्री गणेशरावजी वाघ सर  यांचा आज  ...

* औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातुन राणीताई घाडगे यांच्या नावांची चर्चा सुरू.*

* औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातुन  राणीताई घाडगे यांच्या नावांची चर्चा सुरू.* बीड प्रतिनिधी:  महाराष्ट्र विधान परिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक जाहीर झाली आहे. या मतदासंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार राणीताई रवींद्र घाडगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. औरंगाबाद पदवीधर मतदासंघाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार आता पदवीधर मतदारसंघासाठी 5 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहेत. 12 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सदरील निवडणूकित सर्व पक्षाच्या उमेदवारानी कंबर कसली असली तरी प्रचलित आमदार यांनी आत्ता पर्यंत पदवीधरांचे कोणतेही प्रश्न मार्गी न लावल्यामुळे अपक्ष उमेदवार राणीताई रवींद्र घाडगे  यांचे नाव सर्व सामान्य पदविधारकांच्या चर्चेत आहे.

बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे अकाली निधन

इमेज
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे अकाली निधन *राष्ट्रपती पदकाचे मानकरी* *सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान..!* *दहशतवादी कसाबची जेलमध्ये निगराणी करण्याची यशस्वी जबाबदारी पार पाडली बीड दि.५ (प्रतिनिधी) बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे बुधवार दिनांक ४ रोजी पहाटे निधन झाले. निधना समयी ते ४५ वर्ष होते. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या निधनामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी दुःख व्यक्त केले. दहशतवादी कसाबची जेलमध्ये निगराणी करण्याची जबाबदारी पार पाडल्यामुळे कांबळे यांना राष्ट्रपती  पदक देऊन गौरविण्यात आले होते.     बीड येथील कारागृहाचे सहाय्यक तुरूंगाधिकारी संजय कांबळे  हे गेल्या दोन वर्षापूर्वी बीड येथे बदलून आले होते. अतिशय कर्तव्य दक्ष आणि प्रमाणीक अधिकारी अशी त्यांची ओळख होती. बीड जिल्ह्यात आल्यानंतर सामाजिक कामाची आवड असलेल्या कांबळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा, त्यांच्यातील दोष...

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

* औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर* *दि. 1 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी* *विभागात आचारसंहिता लागू* औरंगाबाद, दि. 2 (विमाका) -  मा. भारत निवडणूक आयोगाने 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी मतदान हे मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी तर मतमोजणी गुरुवार, दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबाद विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. केंद्रेकर यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे.  दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहील. दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल.  दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अं...

ऊसतोडणी कामगारांसाठी सुरेश धस यांनी उभारलेला लढा कौतुकास्पद- माजीमंत्री बबनराव ढाकणे

इमेज
ऊसतोडणी कामगारांसाठी सुरेश धस यांनी उभारलेला लढा  कौतुकास्पद- माजीमंत्री बबनराव ढाकणे आष्टी (प्रतिनिधी): कोरोना काळात साखर कारखान्यावर अडकून पडलेल्या मजुरांना घरी सुखरूप आणण्या पासून ते भाव वाढीसाठी सुरू केलेला आ. सुरेश धस यांचा लढा ऊसतोड मजुरांच्या न्याय्यहक्कासाठी आहे. तो निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच बरोबर स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या जाण्याने ऊसतोड मजुरांच्या बाबतीत जी पोकळी निर्माण झालेली होती ती पोकळी आ.धस यांच्या माध्यमातून निश्चितपणे भरुन निघेल असा विश्वास व्यक्त करीत माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी आ.सुरेश धस यांचे कौतुक केले.     ऊसतोड कामगारांसाठी ज्यांनी महाराष्ट्र राज्यात पहिला कामगार लढा उभा करून शिरूर कासार तालुक्यात ऊसतोड कामगारांसाठी आंदोलन केले, असे ऊसतोड कामगारांचे प्रणेते माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे यांची ऊसतोड कामगारांच्या विविध मुद्द्यावर रविवारी पाथर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी आ.सुरेश धस यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून अनेक जुन्या आठवडींना उजाळा दिला. ऊसतोड कामगारांच्या अनेक प्रश्नांना हात घातला. यावेळी बबनराव ढाकणे यांनी ऊसतोड...