पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वडवणीत पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक*२१ झेरॉक्स दुकानांवर कारवाई.

वडवणीत पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक *२१ झेरॉक्स दुकानांवर कारवाई. *परीक्षा वेळेत दुकान सुरु ठेवणे पडले महागात. *झेरॉक्स चालकांचा बेमुदत बंद वडवणी – जिल्हाधिकारी बीड यांनी सध्या सुरु असलेल्या १२ वी व १० वी परिक्षेच्या काळात होणाऱ्या काॅपी रोखण्यासाठी सर्व झेरॉक्स दुकाने परिक्षेच्या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी त्यांचा हा आदेश न पाळल्याने आज दि.२८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी वडवणी शहरातील २१ झेरॉक्स दुकानांवर वडवणी पोलिसांनी अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करत छापे मारून चालकांवर वडवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करुन कारवाई केली. बीड जिल्ह्यात सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. प्रतिवर्षी १२ वी आणि १० वी च्या परीक्षेतजिल्ह्यात काॅपीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असतो.  हा डाग पुसून काढण्यासाठी काॅपी मुक्त बीड जिल्हा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असुन यामध्ये जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन  या परीक्षेच्या  काळात पेपर वेळेच्या एक तास अगोदर व परीक्षा पेपर सुटल्यानंतर एक तास सर्व झेरॉक्स दुकाने  बंद करण्याचे लेखी आदेश दिले होते. तरी हे आदेश डावलून...

प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या ‘त्या’ महाविद्यालयाचा अखेर माफीनामा

प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या ‘त्या’ महाविद्यालयाचा अखेर माफीनामा अमरावती दि.१५ प्रतिनिधी- मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या चांदूर रेल्वे (जि. अमरावती) येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या निर्णयावर दोन दिवस टीकेची झोड उठल्यानंतर अखेर महाविद्यालयाने माफीनामा जारी केला. प्राचार्य राजेंद्र हावरे यांची स्वाक्षरी माफीनाम्यावर आहे. शपथ देण्याची संकल्पना महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रदीप दंदे यांची होती. ‘शपथेमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या. काहींच्या समोर व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला. शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला, असा प्रत्यय त्यातून आला असेल वा येत असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.’ अशा शब्दांत महाविद्यालयाने माफी मागितली आहे. माफीनाम्यातच शपथ का दिली, याबाबतही ऊहापोह करण्यात आला आहे. अल्लड वयातील मुलींना प्रेमाची समज नसते. आपमतलबी तरुणांकडून त्यांची फसगत होते. पालक मुलींच्या भविष्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. वैचारिक अपरिपक्वतेतून ...

पोलीस दलात लवकरच मेगा भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

पोलीस दलात लवकरच मेगा भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती पुणे प्रतिनिधी- गेल्या पाच वर्षात पोलीस भरती झालेली नाही. राज्यातील पोलीस दलात मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे लवकरच राज्यात पोलीस दलात मोठी मेगा भरती होणार असून, तशी माहिती खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात 8 हजार पोलीसांची भरती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्याचा गृहमंत्री पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच पुणे आयुक्तालयाला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, संजय शिंदे, तसेच पोलीस उपआयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यात गेल्या पाच वर्षात राज्यात पोलीस भरती प्रक्रिया झालेली नाही. पोलीस दलात मनुष्यबळाचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या काळात मोठी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे, असे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्यभरात 8 हजार पोलीसांची भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरची त्याबाबत जाहिरा...

राज्यातील शेतकरीच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू- उद्धव ठाकरे

राज्यातील शेतकरीच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू- उद्धव ठाकरे जळगाव दि.१५ प्रतिनिधी: राज्यातील शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडविण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही प्रथमोपचार असून शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि त्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. जैन इरिगेशन लि. तर्फे देण्यात येणारा पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च- तंत्र पुरस्कार वितरण सोहळा आज दुपारी जैन हिल्स येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. नंदापूर, ता. जि. जालना येथील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कामगार कल्याण मंत्री दिलीप वळसे- पाटील, कृ...

इंदुरीकर महाराजांना नोटीस वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून आरोग्य विभागाची कारवाई

इंदुरीकर महाराजांना नोटीस वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून आरोग्य विभागाची कारवाई मुंबई प्रतिनिधी गर्भलिंग चाचणीसंदर्भात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना आरोग्य विभागाने नोटीस दिली आहे. मात्र त्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. वादग्रस्त वक्तव्याचे पुन्हा जाहीर समर्थन सुरू केल्याने त्यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोमवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे. इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. गर्भलिंग चाचणीसंदर्भात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी त्यांना प्रसूतिपूर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल का करू नये, अशी नोटीस बजावली. या कायद्यानुसार स्थापन झालेल्या सल्लागार समितीनेही नोटीस बजावली. अद्याप इंदुरीकर यांनी नोटिशीला उत्तर दिलेले नाही.  इंदुरीकर महाराज यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी पुणे येथील सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे. मला संपवण्याचे कारस्थान – इंदुरीकर सध्याच्या यु...

रिक्षावाल्यानं अश्लील नजरेनं पाहिलं, महिलेनं धावत्या रिक्षेतून मारली उडी

रिक्षावाल्यानं अश्लील नजरेनं पाहिलं, महिलेनं धावत्या रिक्षेतून मारली उडी मुंबई दि.15 प्रतिनिधी चालक आपल्याकडे अश्लील नजरेने पाहत असून त्याने मार्गही बदलल्याचे लक्षात येताच महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. धावत्या रिक्षातून उडी मारल्याने ही महिला जखमी झाली असून, मुलुंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच असा प्रकार घडल्याने मुलुंडमध्ये संताप व्यक्त होत आहे. उल्हासनगरमध्ये रिक्षात तरुणीचा विनयभंग, तरुणीने मारली उडी मोटरमनच्या प्रसंगावधानाने वाचले तरुणीचे प्राण मुलुंडमध्ये वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय महिलेने येथील पंचरत्न परिसरात जाण्यासाठी गुरुवारी रात्री रिक्षा पडकली. रिक्षामध्ये बसल्यापासून रिक्षाचालक आरशामधून एकटक आपल्याकडे पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सुरुवातीला दुर्लक्ष केले; मात्र चालकाची अश्लील नजर हलतच नव्हती. त्यातच काही अंतर पुढे गेल्यानंतर महिलेने सांगितलेल्या ठिकाणच्या मार्गाने न जाता चालकाने विरुद्ध दिशेला रिक्षा वळवली. त्यामुळं ती प्रचंड घाबरली...

महिलेच्या खूनासह दरोडयातील आरोपी जेरबंद

महिलेच्या खूनासह दरोडयातील आरोपी जेरबंद दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरी, 5 गुन्हयाची केली उकल, तीन लाख दोन हाजाराचा मुद्देमाल जप्त- पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांची माहिती बीड प्रतिनिधी: गेवराई येथील मागील काही दिवसात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव यांना गेवराई भागातील गंभीर गुन्हे उघड करण्यासाठी वेगवेगळया टिम तयार करून तपास करण्याच्या कडक सुचना पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी दिल्या होत्या.  त्यानंतर सपोनि गजानन जाधव यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवून मागील काही दिवसापुर्वी पो. स्टे. गेवराई हद्दीतील झालेल्या खूनाचा तपास लावत आरोपी  शेख नदीम शेख लालु (वय.32 रा . नुरानी मस्जीद समोर, चितेश्वर गल्ली , गेवराई) सय्यद मोहम्मद उस्मान अली (वय - 28 रा . तपेश्वर नगर, झोपडपट्टी, घाटनांदुर ता, अंबाजोगाई ह . मु . पदमीनी हॉस्पीटल गल्ली, गांधीनगर, बीड)यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आशा गंभीरस्वरूपाच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली. व तीन लाख दोन हाजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणखी का...

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा मुंबई - राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. येत्या 29 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांना हा नवीन नियम लागू होणार आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. कामाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आला होता. राज्यातील रिक्त पदे भरणे, मंत्रालयात महिलांसाठी विश्रामकक्ष याशिवाय विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरवण्याबाबतच्या मागण्यादेखील शासनाने मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय- इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता 'बहुजन कल्याण विभाग'- बाल न्याय निधी समिती गठीत कर...

झाडाबद्दल प्रेम वाटतं ही आनंदाची बाब- अभिनेता सयाजी शिंदे

देशातल्या पहिल्या वृक्ष संमेलन दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद उद्या आणि परवा देवराईत वृक्ष संमेलन झाडाबद्दल प्रेम वाटतं ही आनंदाची बाब- अभिनेता सयाजी शिंदे बीड :- वडाच्या नावाने चांगभलं, लिंबाच्या नावाने चांगभलं, अरं येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय दुसरं कोण’ या घोषणांनी आज बीड शहर दणाणून गेले. देशातलं पहिलं वृक्ष संमेलन उद्या आणि परवा पालवण नजीकच्या देवराई माळरान डोंगरावर होत असून त्या संमेलनाच्या निमित्ताने आज सकाळी शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीत दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत वेगवेगळ्या वेशभुषा करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजीत वृक्ष संमेलनास मोठा प्रतिसाद मिळत असून एखाद्या पक्षाबद्दल प्रेम वाटण्यापेक्षा पक्ष्यांबद्दल प्रेम बीड आणि जिल्ह्यातील अबालवृद्धांना वाटतं, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी वृक्षदिंडीच्या समारोपप्रसंगी दिली.  उद्या दि.13 आणि दि.14 फेब्रुवारी रोजी पालवण नजीकच्या देवराई माळरान डोंगरावर देशातलं पहिलं वृक्ष संमेलन अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि वनविभागाच्या म...

आता ग्रा.पं.सदस्यांना पक्षांतर्गत बंदी कायदा

आता ग्रा.पं.सदस्यांना पक्षांतर्गत बंदी कायदा मुंबई प्रतिनिधी:- जनतेतून थेट सरपंचाची निवड रद्द केल्यानंतर आता राज्य सरकार ग्रामपंचायत सदस्यांसाठी पक्षांतर्गत बंदी कायदा करण्याच्या तयारीत असून त्यासाठी न्याय विधी कार्यालयाकडून सरकारने मार्गदर्शन मागवले आहे. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत आणि पंचायत समितीसाठी हा कायदा लागू होता.    जनतेतून थेट सरपंचाची निवड रद्द केल्याने काही सरपंच संघटनांनी याला विरोध केला. सरपंचाची नाराजगी दूर करण्याच्या इराद्याने राज्यातील महाआघाडी सरकार आता ग्रामपंचायत सदस्यांसाठी पक्षांतर्गत बंदी कायदा आणू पाहत आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ऐनवेळेस पक्षांची फोडाफोडी होते. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवरही मोठं आर्थिक राजकारण होऊन फोडाफोडीला बळ मिळतं म्हणून सरकार आता ग्रामपंचायत सदस्यांसाठीही हा कायदा आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठी सरकारने न्याय विधी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवलं आहे.

जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी होणार; राज्य शासनाकडून १० कोटी रुपयांची तरतूद - अजितदादा पवार*

*जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी होणार; राज्य शासनाकडून १० कोटी रुपयांची तरतूद - अजितदादा पवार* *अंमलबजावणीसाठी विशेष राज्यस्तरीय समिती स्थापन; धनंजय मुंडे अध्यक्ष तर श्याम मानव सहअध्यक्ष* मुंबई (दि. १२)----- : राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, त्याचबरोबर जनजागृतीसह त्याचा योग्य प्रचार व प्रसार व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी साठी राज्यस्तरीय समितीची स्थापनाही करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची तर सहअध्यक्ष पदी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांची निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार या निधीमध्ये वाढ करू असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यात विभागीय व जिल्हा स्तरावर यासाठी समन्वय समिती स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमण्यात येणार असल्याचेही आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवा...

…तर सलग ५ दिवस मार्चमध्ये बॅंका बंद राहणार

…तर सलग ५ दिवस मार्चमध्ये बॅंका बंद राहणार नवी दिल्ली : प्रतिनिधी नुकतेच 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान बँक कर्मचाऱयांनी संप केला होता. या संपाला केंद्र सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लगेचच पुन्हा एकदा बँक कर्मचाऱयांनी संप ची हाक दिली आहे. बँक कर्मचारी आता 11 ते 13 मार्च असा तीन दिवस संपांची घोषणा करु शकतात. दरम्यान, 13 मार्चला शुक्रवार असल्याने याला जोडून दुसरा शनिवार आणि रविवार आल्याने सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सणासुदीच्या काळात ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दरम्यान, पाच दिवसांचा कायमस्वरूपी आठवडा असावा, 5 वर्षांनी त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात याव्यात आदी मागण्यांचा  सरकारने आता विचार केला नाही तर एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार; एक्झिट पोल्सचा अंदाज

दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार; एक्झिट पोल्सचा अंदाज नवी दिल्ली वृत्तसंस्था दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकारच येईल असं एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलनुसार आपचीच दिल्लीत पुन्हा सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आम आदमी पार्टीला म्हणजेच आपला ५० ते ६३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला ५ ते १९ जागा मिळतील असं हा एक्झिट पोल सांगतो आहे. गेल्यावेळी एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसला ४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया तर पार पडली आहे. मात्र ११ तारखेला निकाल लागणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एबीपी आणि सी व्होटर्सचा एक्झिट पोल समोर आला आहे. ज्यानुसार आपचीच सरशी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला १९ जागा मिळतील असा अंदाज आहे तर काँग्रेसला चार जागा मिळतील असा अंदाज आहे. एवढंच नाही तर अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपाने उभे केलेल्या म...

रॅगिंगने घेतला भावी डॉक्टरचा बळी

रॅगिंगने घेतला भावी डॉक्टरचा बळी बीड प्रतिनिधी : ' महाविद्यालयात रॅगिंगचा होणारा त्रास कोणाला सांगता येत नाही, घरी अथवा महाविद्यालयात कोणाची नावे सांगितली तर पुढे चार वर्ष त्रास होईल ही भीती आणि रॅगिंग सहनही होत नाही हि परिस्थती ' यातूनच बीएएमएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या १८ वर्षीय गणेशने स्वतःच्या गावाकडे येऊन आत्महत्या केली. केवळ रॅगिंग होतच असते, महिना दोन महिन्याने सारे नीट होईल या मानसिकतेने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मात्र यातूनही महाविद्यालय प्रशासन काही शिकायला तयार नसून  स्वतःची कातडी बचावण्यासाठी धडपडताना दिसत आहे. नाळवंडी (ता. बीड ) येथील कैलास म्हेत्रे या शेतकऱ्याचा गणेश हा मुलगा . सारे शिक्षण वडवणीला चुलत्याकडे झाले. चुलते दामोदर शिक्षक  मुळात नाळवंडीचे मेहत्रे कुटुंब गावात अत्यंत पापभिरू , अध्यात्मिक परंपरा जपणारे म्हणून ओळखले जाते . अशा कुटुंबातला गणेश अगदी पहिलीपासूनच हुशार. दहावीत असताना तालुक्यातून पहिला आलेला . त्यामुळे आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे हे पालकांचे स्वप्न . त्याने तसा अभ्यास देखील केला . नीट परीक्षेच्या माध्यमातून त्याला उदगीरच्या धन...

मनसे’च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

‘मनसे’च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली मुंबई – ‘मनसे’च्यावतीने घुसखोरांविरोधात उद्या रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी सदर मोर्चाला परवानगी नाकारली असून फक्त आझाद मैदानात सभा घ्या, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चे काढण्यास मनाई आहे. संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने दक्षिण मुंबईत मोर्चाकरता मनाई आहे, असे पोलिसांनी सांगितले. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी मनसेच्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र, मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम 143, 144 आणि 149 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत. पोलिसांच्या या भूमिकेनंतर मनसे नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली. रात्रभर चालणाऱ्या आंदोलना...

कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज पुणे : विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटक परिसरावर हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाला आहे. तर पूर्वेकडील बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील अरबी समुद्राकडून वाहणार्‍या वार्‍याचा संगम होत आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. परिणामी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला असल्याची माहिती हवामान विभागाने  दिली. सध्या मध्य भारतात पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणार्‍या वार्‍यांचा संगम होत आहे. त्यामुळे विदर्भासह छत्तीसगड, ओडिशामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागात गारठा वाढला आहे. काल राज्यात महाबळेश्वर येथे नीचांकी 9.9 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली. मागील 24 तासांत रत्नागिरी 15.9, पुणे 10.1, नगर 12.2, कोल्हापूर 15.5, नाशिक 10, सांगली 13.5, सातारा 11.4, सोलापूर 18.8, औरंगाबाद 16.4, नांदेड 14, अकोला 16.5, अमरावती 16., बुलडाणा 16, चंद्रपूर 1...

कांदा स्वस्त तर लसूण झाला महाग

कांदा स्वस्त तर लसूण झाला महाग औरंगाबाद प्रतिनिधी काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेले कांद्याचे भाव कमी झाले आहेत, तर लसूण महाग झाला आहे. पांढरा लसूण २०० ते २१५ रुपये तर गावरान लसूण किलो मागे ४०० रुपयांच्या दराने विक्री होत आहे. दुसरीकडे शहर परिसरात रसवंतीगृह मोठ्या संख्येने थाटले असल्याने लिंबांची मागणी वाढली आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दररोज स्थानिकसह शेजारील जिल्ह्यास परपेठहून शेतीनियमित मालाची आवक होते. मध्यतंरी पालेभाज्याची आवक मोठ्या प्रमाणात होती, परंतु गुरुवारी ती काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र होते. गुरुवारी कोथिंबिरच्या १७ हजार २०० जुड्यांची आवक बाजारात झाली. त्यास १५० रुपये किमान तर कमाल दर हा २५० रुपये प्रती शेकडा मिळाला. तर मेथीच्या १४ हजार जुड्या ठोक बाजारात दाखल झाल्या असून ४०० रुपये प्रती शेकडा असा सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला. दरम्यान, किरकोळ बाजारात पाच रुपये प्रती जुडी या दरात पालेभाज्यांची विक्री होत आहे. कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहेत. बाजारात २० रुपये किलोपासून कांदे उपलब्ध असतील तरी चांगल्या प्रतीच्या कांद्...

राज्यात 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा सरकारचा विचार! -ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

राज्यात 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा सरकारचा विचार! -ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील 100 युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज देण्याचा विचार सध्या सरकारी पातळीवर सुरू असल्यामुळे येणार्‍या आर्थिक भार व अनुषंगिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. ही समिती तीन महिन्यात अहवाल देणार असून त्यानंतर पुढची पावले उचलण्यात येतील, असे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील 100 युनिटपर्यंतच्या वीज ग्राहकांना मोफत वीज देण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मानस आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत. महावितरण तसेच ऊर्जा खात्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे, गळती रोखणे, वसुलीचे नवीन निकष तयार करून सर्वसामान्य जनतेवर याचा भार पडणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. वीज उत्पादन खर्च कमी करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर वीज दरात दिलासा देता येऊ शकतो. महावितरणसह तिन्ही कंपन्यांना...

शेतकरी कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

शेतकरी कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश मुंबई (प्रतिनिधी) : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करून शेतकर्‍यांना कर्ज आणि चिंतामुक्त करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बँकेच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान येथून जिल्हा यंत्रणेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणार्‍या ‘वर्षा’ या निवासस्थानी आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यावर महिन्याभराच्या आत कर्जमुक्ती योजनेचे धाडसी पाऊल उचलले आहे. 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावेळी केंद्रांवर शेतकर्‍यांची गर्दी होईल. अशा वेळी प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांना चांगली वागणूक द्यावी. त्याच्याशी सौजन्य...

भागवतासाठी आला अन् विवाहित बायको घेऊन पळाला

भागवतासाठी आला अन् विवाहित बायको घेऊन पळाला भंडारा : भागवत सप्ताहासाठी आलेल्या महाराजाने चक्क गावातील तरुण विवाहित महिलेला पळवून नेल्याची घटना नजीकच्या मोहदुरा येथे घडली. तीन बायकांचा दादला असणारा हा दिनेशचंद्र मोहतुरे महाराज सावनेर तालुक्‍यातील कुबाडा येथील निवासी आहे. ही घटना विश्‍वासाला तडा देणारी व समाजाच्या घसरलेल्या नितिमत्तेवर प्रकाश टाकणारी आहे. मोहदुरा येथे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत करण्यासाठी सावनेर तालुक्‍यातील कुबाडा येथील दिनेशचंद्र मोहतुरे या तथाकथित हभप महाराजाला बोलविण्यात आले होते. भागवत सप्ताह आटोपताच दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी (ता.5) त्याने गावातील एका तरुण विवाहित महिलेसह पलायन केले. महाराज निघाला तीन जणींचा दादला विशेष म्हणजे, ही महिलासुद्धा एका पाच वर्षाच्या मुलीची आई आहे. दिनेशचंद्र नामक हा महाराज मागीलवर्षीसुद्धा मोहदुरा येथे भागवत सप्ताह करण्यासाठी आला होता. महाराज अंदाजे 35 च्या वयोगटात आहे. तरुणतुर्क असणाऱ्या महाराजाची देहबोली, गोडगोड बोलण्याने गावकऱ्यांना भुरळ घातली. त्यामुळे त्याल...

पंकजा मुंडे शिक्षकांच्या बदल्यांवरून सरकारविरोधात आक्रमक

पंकजा मुंडे शिक्षकांच्या बदल्यांवरून सरकारविरोधात आक्रमक मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनवरुन ऑफलाईन करण्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच विद्यादानाचे पवित्र काम करणा-या शिक्षकांना कायमचे त्रासातून मुक्त केले आहे, त्यांना परत यात सरकारने ढकलू नये, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या हा विषय डायरेक्ट जनतेतून सरपंच, जलयुक्त शिवार सारखा महत्वाचा आणि लोकप्रिय आहे. जो गरीब आहे.. ज्याचा वशिला नाही.. त्यालाही अधिकार असावेत. यासारखे निर्णय रद्द करण्यापेक्षा सर्व विभागांनी त्यांना रेप्लिकेट करावे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. एकीकडे पंकजा मुंडे हळुहळू सरकारविरोधात आक्रमक होत असताना दुसरीकडे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चाही जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकांना आता काही महिने उलटून गेले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे नंतर मोठे महाभारत राज्यात घडले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स...

महाराष्ट्रात लवकर १३८ ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ महिला अत्याचारासंबंधी खटले निकालात काढणार

महाराष्ट्रात लवकर १३८ ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ महिला अत्याचारासंबंधी खटले निकालात काढणार मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांबाबतच्या खटल्यांसाठी राज्यात १३८ जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. गृहमंत्रालय आणि राज्य सरकारचे यावर एकमत झाले असून लवकरच यावर काम सुरू करणार आहे. या १३८ कोर्टांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे जवळपास २९ हजार प्रलंबित खटले चालणार आहेत. राज्यातील गुन्हेगारीत महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे उघड झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेच्या दोन दिवसानंतरच औरंगाबादच्या सिल्लोडमध्येही अशीच एक घटना समोर आली. एका महिलेच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात पीडितेचा मृत्यू झाला, तर हिंगणघाटमधील पीडितेचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. नवी मुंबईतही एका महिलेला आधी जाळून नंतर फासावर लटकावून मारल्याची घटना ...

महाराष्ट्रात लवकर १३८ ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ महिला अत्याचारासंबंधी खटले निकालात काढणार

महाराष्ट्रात लवकर १३८ ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ महिला अत्याचारासंबंधी खटले निकालात काढणार मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांबाबतच्या खटल्यांसाठी राज्यात १३८ जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. गृहमंत्रालय आणि राज्य सरकारचे यावर एकमत झाले असून लवकरच यावर काम सुरू करणार आहे. या १३८ कोर्टांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे जवळपास २९ हजार प्रलंबित खटले चालणार आहेत. राज्यातील गुन्हेगारीत महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे उघड झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेच्या दोन दिवसानंतरच औरंगाबादच्या सिल्लोडमध्येही अशीच एक घटना समोर आली. एका महिलेच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात पीडितेचा मृत्यू झाला, तर हिंगणघाटमधील पीडितेचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. नवी मुंबईतही एका महिलेला आधी जाळून नंतर फासावर लटकावून मारल्याची घटना ...

हिंगणघाट जळीतकांड: पीडितेची प्रकृती खालावली

हिंगणघाट जळीतकांड: पीडितेची प्रकृती खालावली नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिली आहे. पीडितेचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असून सध्या या तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. पीडितेवर शनिवारी एक अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. मात्र, पीडितेची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया न करता ती रविवारी किंवा योग्य वेळी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेचा गुरुवारी रक्तदाब वाढला होता. त्यानंतर जंतूसंसगार्चा धोका लक्षात घेता ऑरेंज सिटी रुग्णालयाने अतिदक्षता विभागातील सर्व ७ रुग्णांना इतरत्र हलविले होते. या ठिकाणी केवळ एकटय़ा पीडितेलाच ठेवण्यात आले आहे. हा वॉर्ड जळीत प्रकरणातील पीडित तरुणीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी तिचा रक्तदाब स्थिर झाल्याने तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या घडामोडीत भाजलेल्या तिच्या शरीरावरी जखमांचेही र्निजतुकीकरण...
खून करून फरार असलेल्या आरोपीस  दरोडा प्रतिबंधक पथकाने केले जेरबंद बीड प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील नागझरी वस्ती येथील खून करून फरार झालेल्या आरोपीला आज दिनांक ७ रोजी दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की काल गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्हयात ऑल ऑऊट ऑपरेशन राबविण्यासाठी आदेश दिले.  त्या अनुषंगाने दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव हे आपल्या सहका - यासह ऑल ऑऊट ऑपरेशन कामी गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असतांना आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी  00 . 15 वाजता . सपोनि गजानन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की , गेवराई पोलीस स्टेशन मधील गुरनं . 145 / 2019 कलम 302 , 147 , 148 , 149 भादंवि सह 4 / 25 भारतीय हत्यार कायदा हा गुन्हा घडला होता. या गुन्हयातील पोलिसांना हवा असलेला आरोपी भंबळया पाझ - या काळे (वय - 52 वर्षे) रा . नागझरी वस्ती ता . गेवराई जि . बीड हा फरार नागझरी परीसरात अटक टाळण्यासाठी लपून छपून वावरत असल्याची गुप्त खबर मिळाली. या मिळाल...