पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा (क्रॉप पॅटर्न) लवकरात लवकर तयार करावा-- जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

* जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा (क्रॉप पॅटर्न) लवकरात लवकर तयार करावा-- जिल्हाधिकारी राहुल रेखावार* बीड,  दि. ३० :--जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा (क्रॉप पॅटर्न) लवकरात लवकर तयार केला जावा यासाठी सुरू असलेले सर्वेक्षण गतीने पूर्ण करण्यात यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत कृती आराखडा याबाबत बैठक श्री रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, क्रॉप पॅटर्न तयार करताना सदर गावांमध्ये होणारे कृषी उत्पादन त्यांचे प्रकार एकूण उत्पादन हंगामनिहाय घेण्यात येणारे पीक पद्धती यांची माहिती असावी जिल्ह्यातील हा क्रॉप पॅटर्न तयार झाल्यानंतर याचा उपयोग शेतकऱ्यांना आणि आणि कृषीमाल खरेदी करणाऱ्या कृषी आधारित उद्योगांना होईल आवश्यक दर्जा आणि होणारे पीक उत्पादन याची माहिती मिळाल्यामुळे कृषी मालाला अधिक दर मिळू लागेल या क्रॉप पॅटर्न ची माहिती वेबसाईट द्वारे आणि पुस्तिके द्वारे उपलब्ध करून देता येईल. ते म्हणाले सेंद्रिय शेती ...

*स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कारवाई करा - धनंजय मुंडे*.

इमेज
* स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कारवाई करा - धनंजय मुंडे* *ऊसतोड कामगारांची नोंदणी व अन्य प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्याचे निर्देश* *राज्य शासन स्तरावर बैठका व हालचालींना वेग!* मुंबई दि. २९ (प्रतिनिधी): ---- : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादी आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करावी. प्राथमिक स्तरावर ऊसतोड कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्यात यावी यासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. या बैठकीस आ. संजय दौंड, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टी चे महासंचालक धम्मजित गजभिये, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री. जोशी, कामगार विभागाचे उपसचिव, सहक...

बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह; रूग्णसंख्या 9 हजार 850

इमेज
बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह;  रूग्णसंख्या 9 हजार 850 बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज मंगळवारी दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 14 मिनिटांनी प्राप्त झाले आहेत. एकूण 882 पैकी 146 पॉझिटिव्ह अहवाल तर 746 निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 27, आष्टी 21, बीड 38, धारूर 8, गेवराई 6, केज 19, माजलगाव 6, परळी 7, पाटोदा 5, शिरूर 6 तर वडवणी तालुक्यातील 3 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 9 हजार 850 इतकी झाली आहे.

उषा मंगेशकर यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

इमेज
उषा मंगेशकर यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मुंबई दि. २८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना  जाहीर करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली. पाच लाख रुपये, मानपत्र,  स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित  देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन २०२०-२१ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केली आहे. उषा मंगेशकर यांनी  आतापर्यंत मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत. सांस्कृ...

जोरदार पावसामुळे कुक्कडगाव, चव्हाणवाडी, राक्षसभुवन, खुंड्रसचा संपर्क तुटला ; पिके धोक्यात !

इमेज
जोरदार पावसामुळे कुक्कडगाव, चव्हाणवाडी, राक्षसभुवन, खुंड्रसचा संपर्क तुटला ; पिके धोक्यात ! पिंपळनेर दि. २६ ( शिवप्रसाद सिरसाट )-गेल्या  तीन-चार दिवसांपासून बीड जिल्ह्यासह पिंपळनेर परिसरात  जोरदार  पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वच नद्यांना पाणी आले. काही तलाव ओसंडून वाहत आहेत. रात्री पुन्हा बीड  तालुक्यासह कुक्कडगाव , भाटसागवी , सह इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने  पावसामुळे आज शनिवार  सकाळपर्यंत काही नद्यांना पूर आला होता. सदरील पूराचे पाणी सकाळ पर्यंत वाहत होते. भाटसांगवी येथील नदीला पूर आल्याने या परिसरातील कुक्कडगाव, चव्हाणवाडी, राक्षसभुवन, खुंड्रस या गावांचा संपर्क तुटला आहे.      सध्या परतीच्या पावसाने मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री बीड तालुक्यासह पिंपळनेर परिसरातील  अनेक  ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे शनिवारी  सकाळपर्यंत अनेक नद्या वाहत होत्या. बीड तालुक्यातील भाटसांगवी येथील नदीला पुर आला. या पुराचे पाणी दुपारपर्यंत ओसरलेलं न...

आज जिल्ह्यात 192 पॉझिटिव्ह!

आज जिल्ह्यात 192 पॉझिटिव्ह बीड (प्रतिनिधी) :  जिल्ह्यात आज 192 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 9 हजार 387 इतकी झाली आहे.        जिल्हा प्रशासनाला एकूण 870 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 678 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 31, आष्टी 22, बीड 54, धारूर 10, गेवराई 10, केज 14, माजलगाव 17, परळी 18, पाटोदा 6, शिरुर 4, वडवणी 6 असे एकूण 192 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 9 हजार 387 इतकी झाली आहे.

आज 194 कोरोना पॉझिटिव्ह!

आज 194 कोरोना  पॉझिटिव्ह! बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यात आज 194 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 8 हजार 999 इतकी झाली आहे.   जिल्हा प्रशासनाला गुरुवारी एकूण 994 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 800 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 27, आष्टी 26, बीड 37, धारूर 9, गेवराई 13, केज 15, माजलगाव 9, परळी 31, पाटोदा 10, शिरुर 8, वडवणी 9 असे एकूण 194 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 8 हजार 999 इतकी झाली आहे. कोरोना अपडेट एकूण रुग्ण 8999 मृत्यू 256 बरे झालेले 5959 उपचार सुरु 2784

मुकादम मुक्त ऊसतोड कामगार करा - किसान पुत्र श्रीकांत गदळे

इमेज
मुकादम मुक्त ऊसतोड कामगार करा - किसान पुत्र श्रीकांत गदळे बीड : राज्यातील ऊसतोड कामगारांची  हा आर्थिक परिस्थितीने मागास असून कामगारांचा कोणी वाली नाही. यामुळं मुकादम या कामगारांवर आपलं वर्चस्व निर्माण करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यामुळेच या ऊसतोड कामगारांना मुकादम मुक्त करण्यात यावं अशी मागणी किसानपुत्र श्रीकांत गदळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राज्यातील ऊसतोड कामगार सामाजिक दृष्ट्या मागास असून राज्यातील ऊसतोड कामगारांचा नेता नाही. राजकारणा पुरता त्यांचा वापर करून पुन्हा त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. याचाचं फायदा घेऊन मुकादम मंडळी त्यांचं आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप श्री. गदळे यांनी केला आहे.  यामुळे ऊसतोड कामगारांच्या तोडणीचा दर व वाहतुकीचा मोबदला जास्तीत-जास्त देवून प्रत्यक्ष कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळ अंतर्गत प्रशासक नेमून ऊसतोड कामगार मुकादम मुक्त करून राज्यातील मुकादमांच्या संपत्तीची चौकशी करण्यात या...

आज 146 कोरोना पॉझिटिव्ह!

आज 146 कोरोना पॉझिटिव्ह! बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ  होत आहे. आज मंगळवार ( दि .22 ) 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 8 हजार 608 इतका झाला आहे . सोमवारी ( दि .21 ) एकूण 1152 स्वॅबची तपासणी करण्यात आली . त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी 2 वाजता आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यामध्ये 1006 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात 33 रुग्ण आढळले. पाठोपाठ अंबाजोगाई 32 , आष्टी 11 , धारुर 10 , गेवराई 13 , केज 14 , माजलगाव 11 , परळी 9 , पाटोदा 6 , शिरुर 6 आणि वडवणी तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे . 

आज १३३ कोरोना पॉझिटिव्ह

इमेज
  आज १३३ कोरोना पॉझिटिव्ह बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा तपशील आज  सोमवार रोजी १२ वाजून २४ मिनिटांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यात सोमवारी 133 कोरोना पॉझिटिव्ह तर 822 निगेटिव्ह आले आहेत.   आज 955 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यामध्ये अंबाजोगाई 15, आष्टी 8, बीड 33, धारूर 6, गेवराई 11, केज 16, माजलगाव 10, परळी 24, पाटोदा 5, शिरूर कासार 2, वडवणी 3 असे एकूण 133 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आ.मेटे साहेब, तुम्ही तरी खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदी वर पूल बनवून द्या - एस.एम.युसूफ

इमेज
आ.मेटे साहेब, तुम्ही तरी खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदी वर पूल बनवून द्या - एस.एम.युसूफ बीड (प्रतिनिधी) - नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेला खासबाग-मोमीनपुरा या मोठ्या प्रभागांना जोडणारा बिंदुसरा नदीवर पूल जनतेसाठी बनवून द्यावा असे साकडे पत्रकार एस.एम.युसूफ यांनी  आ. मेटे यांना  घातले आहे.   गेल्या अनेक वर्षांपासून मोमीनपुरा, मुहम्मदीया कॉलनी, बीड मामला, खासबाग, शहेनशहा नगर, गणेश नगर, आसेफ नगर, विद्यानगर (पूर्व-पश्चिम), शिवाजीनगर, मित्र नगर, दत्तनगर, त्रिमूर्ती कॉलनी, राजुरी वेस, धांडे गल्ली, तेरवी लाईन, अज़ीज़पुरा, खंदक, कागदी वेस, हत्तीखाना या प्रभागांसह फ्रूट व आडत मार्केट, जिल्हा रुग्णालय, भाजी मार्केट, बाजारपेठ यासह खासबाग देवी मंदिर, भगवान बाबा प्रतिष्ठान स्मशानभूमी, महानुभाव मंदिर, तकिया मस्जिद कब्रस्तान, जमाअत-ए-महेदविया दर्गाह दायरा कब्रस्तान व दायरा कब्रस्तानकडे जाण्या-येण्यासाठी पुल नसल्याने बिंदुसरा नदीतील हा धोक्याचा मार्ग वापरला जातो. यामुळे येथे पूल निर्माण करावा ही मागणी वर्षानुवर्षांपासून होत आहे. मात्र आतापर्यंत या मागणीला वे...

जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - धनंजय मुंडे

इमेज
*जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश* बीड (दि. २०) ---- : बीड जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या अधिकच्या पावसाने कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. बीड, गेवराई, वडवणी सह अन्य जवळपास सर्वच तालुक्यात गेल्या दोन अधिक दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साठले आहे. कापूस व सोयाबीन या दोन प्रमुख पिकांना यामुळे मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार महसूल मंडळ निहाय गावोगावी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी या भागात गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस आणि येत्या चार दिवसांमध्ये वर्तवलेले पावसाचे अंदाज यावरून नुकसान अधिक होण्य...

आज 159 पॉझिटिव्ह..!

इमेज
आज 159 पॉझिटिव्ह..! बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दरदिवशी वाढताच आहे. आज आणखी 159 कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

इमेज
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते  शासकीय ध्वजारोहण  पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या  हस्ते हुतात्म्यांना श्रध्दांजली ! *जिल्ह्यातील उपविभागीय मुख्यालये व तालुका मुख्यालयाचे ठिकाणी होणार ध्वजारोहण   बीड दि. १५ (प्रतिनिधी):-- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिननिमित्त मुख्य शासकीय समारंभात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  धनजंय मुंडे यांच्या हस्ते हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करणे व  शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवार, दिनांक 17 सप्टेंबर .2020 रोजी  होणार आहे. जिल्हास्तरावरील मुख्य शासकीय समारंभात पोलीस मुख्यालय बीड येथे ध्वजारोहण  सकाळी 9 :00 वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते आयोजित करण्यात आले आहे. तत्पूर्वी मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापनदिन प्रसंगी हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम सकाळी 8.15 वाजता स्मृतिस्तंभ, प्रियदर्शनी उद्यान, राजीव गांधी चौक, बीड येथे आयोजित केला आहे.  जिल्हास्तरावरील शासकीय मुख्य ध्वजारोहण समारंभास सर्व निमंत...

कोरोना आता दारापर्यंत आला, स्वत:ची अन् कुटुंबाची काळजी घ्या - ना. धनंजय मुंडे*

इमेज
*कोरोना दारापर्यंत आला, स्वत:ची अन् कुटुंबाची काळजी घ्या - ना. धनंजय मुंडे* *'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान यशस्वी करण्याचे मुंडे यांचे आवाहन* परळी (दि. १५) ---- : जागतिक स्तरावर सुरू झालेला कोरोना विषाणूचा हाहाकार पाहता पाहता आपल्या घरापर्यंत येऊन पोचला असून, त्याला रोखण्याची जबाबदारी जितकी शासनाची आहे त्याहून अधिक जबाबदारी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाप्रति आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यासाठी खबरदारी घेत घराघरात जनजागृती करण्यासाठी सुरुवात स्वतः व स्वतःच्या कुटुंबापासून करावी असे आवाहन परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.  परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानांतर्गत शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची ना. मुंडेंच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली होती; त्या बैठकीत ना. मुंडे बोलत होते. कोरोना विषाणूचा कहर मी स्वतः अनुभवला असून, पहिल्या दिवसापासून राज्य सरकार म्हणून नव्हे तर परळीचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी लोकांत ...

बीड जिल्ह्यात कालचे, आजचे 404 कोरोना पॉझिटिव्ह !

इमेज
बीड जिल्ह्यात कालचे, आजचे 404 कोरोना पॉझिटिव्ह ! बीड दि .१५(प्रतिनिधी) जिल्ह्यात आज मंगळवारी एकूण 404 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . विविध रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेल्या स्वॅब आणि सोमवार व मंगळवारी घेण्यात आलेल्या अँटिजेन टेस्टचे अहवाल आज दि .15 सप्टेंबर रोजी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले . 6055 अहवालापैकी 404 पॉझिटिव्ह तर 5651 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामध्ये  बीड तालुक्यातील 74 , अंबाजोगाई  17 , आष्टी 29 , परळी 62 , पाटोदा 34 , वडवणी 20 , धारूर 43 , गेवराई 34 शिरूर 49 माजलगाव 15 , केज तालुक्यातील असे 27 आज एकूण 404 रुग्ण आढळले आहेत . दरम्यान कालच्या टेस्टमध्ये 228 पॉझिटिव्ह आढळले होते. स्वॅब आणि अँटिजेन अशा दोन्ही अहवालात काल आणि आज तब्बल 404 पॉझिटिव्ह आढळले आहेत.  अहवाल खालील प्रमाणे 

*कोरोनाच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात माफी द्यावी*

इमेज
* कोरोनाच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात माफी द्यावी*  *शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस प्रशांत डोरलेंची पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना विनंती*  बीड (प्रतिनिधी) :-  कोरोनामुळे सध्या सर्वांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. पोटापाण्याची सोय लावणे शक्य नसताना आता मुलांच्या प्रवेश फीचे ओझे देखील पालकांच्या खांद्यावर येऊन पडले आहे. शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या अडचणीच्या काळात महाविद्यालयांनी त्या त्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस प्रशांत डोरले यांनी केली आहे.     कोरोनाच्या कठीण काळात सर्वत्र आर्थिक सावट पसरले आहे, अशा काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असणाऱ्या शैक्षणिक शुल्कांमध्ये माफी मिळाल्यास पालकांना दिलासा मिळेल. यासाठी बीड जिल्हाधिकारी, व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्रशांत डोरले यांनी पत्र देत विनंती केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण, तंत्रशिक्षण, संगणक शास्त्...

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; आज 294 कोरोना पॉझिटिव्ह!

इमेज
जिल्ह्यात कोरोनाचा कहर; आज  294 कोरोना पॉझिटिव्ह! बीड,दि.13 (प्रतिनिधी):-  बीड जिल्ह्यात कोरोनाने सलग सहा दिवस शतक पार केले होते. परंतु आज रविवार रोजी जिल्ह्यात कोरोनाने  तब्बल 294 चांगले आकडा पार केला. आज ग्रामीण भागात  कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने एकच धमाका झाला आहे. आज जिल्ह्यात 294 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजचा आकडा पाहता कोरोना संसर्गाने जिल्ह्यात अक्षरश: थैमान घालण्याच्या मार्गावर आसल्याचे दिसत आहे.   मागील सहा दिवसात दररोज 100 पेक्षा अधिक नवीन कोरोना बाधीत सापडल्यानंतर रविवारी मात्र कोरोनाने हद्द पार करताना नाबाद 294 नवीन कोरोना रुग्ण तयार केले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये अंबाजोगाई 42 , आष्टी 19 , बीड 36 , धारुर 26 , गेवराई 18 , केज 21 , माजलगाव 29 , परळी 45 , पाटोदा 20 , शिरुर 12 , वडवणी 26 अशा रुग्णांचा समावेश आहे . शिरुर तालुक्यातील बावी तागडगांव , पाटोदा तालुक्यातील सौताडा , परळी तालुक्यातील टोकवाडी , केजमधील नांदूरघाट आदी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली आहे. दुसरीकडे रविवारी 1121 अहवाल ...

१३ सप्टेंबर २०१९ शासन निर्णयाचे विनाअनुदानित शिक्षकांनी घातले श्राद्ध

इमेज
१३ सप्टेंबर २०१९ शासन निर्णयाचे विनाअनुदानित शिक्षकांनी घातले श्राद्ध  बीड(प्रतिनिधी):- १३ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन सरकारने विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. या निर्णयानुसार नवीन अनुदान पात्र  शाळांना २०% व पूर्वी २०% अनुदान घेत असणाऱ्या शाळांना वाढीव २०% देण्याचा शासन निर्णय घेतला. परंतु वर्ष झाले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही. शासन निर्णय होऊन एक वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने संपूर्ण राज्यभरात विना अनुदानित शिक्षकांनी या शासन निर्णयाचे वर्ष श्राद्ध घातले.       या बाबत अधिक माहिती अशी की, आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच १३ सप्टेंबर २०१९ ला तत्कालीन सरकारने विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. यात नवीन शाळांना २०% व पूर्वी २०% अनुदान घेत असणाऱ्या शाळांना वाढीव २०% अशा आशयाचा शासन निर्णय झाला. परंतु आज अखेर याची अंमलबजावणी झालीच नाही. शासन निर्णय होऊन एक वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने संपूर्ण राज्यभरात या शासन निर्णयाचे वर्ष श्राद्ध घालण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य (कायम...

मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी कटिबद्ध: उध्दव ठाकरे

इमेज
मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी कटिबद्ध: उध्दव ठाकरे आरक्षण प्रकरणी मोर्चे काढू नका ; मराठा समाजाला न्याय मिळणारच- उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई , दि . १३ ( प्रतिनिधी ) : जर सरकार दाद देत नसेल तर सरकारच्या  विरोधात लढा , आंदोलनं जरुर करा परंतू इथे मात्र आपलं सरकार आहे . मराठा आरक्षणासाठी, न्याय हक्कांसाठी तुमच्या सोबतच आहोत . तेव्हा घाबरण्याचं , काळजीचं काहीही कारण नाही. मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी कटिबद्ध आहोत. मराठा समाजाला न्याय मिळणारच त्यामुळे मराठा समाजाने सरकार विरोधात मोर्चे काढू नयेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे .    गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाचा विषय समोर आला आहे. खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने समोर येण्याची आवश्यकता नव्हती . महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मराठा समाजाचं आरक्षण मान्य केलेलं आहे . विधीमंडळातल्या सगळ्या पक्षांनी एकमताने घेतला. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं ते आपण जिंकलो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं ती लढाईही आपण लढतो आहोत. अन्याया विरोधात लढा , आंदोलनं जर...

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जडलंय मोबाइलचं व्यसन - एस.एम.युसूफ

इमेज
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जडलंय मोबाइलचं व्यसन - एस.एम.युसूफ बीड (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मोबाइलचं व्यसन जडल्याचे नमूद करून पत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून चिंता व्यक्त केली आहे. पत्रकात नमूद केले आहे की, १५ जून पासून शाळा प्रत्यक्षात सुरू न करता शासनाने मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शासनाच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले. ते यासाठी की शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणाविना ठेवण्याऐवजी ऑनलाइन का होईना, शिक्षण तरी मिळेल. परंतु पहिल्या तिमाहीतच या ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांवर होणारे साइड इफेक्ट्स मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. तसे शासनाने सर्वे केलेल्या यंत्रणेकडून अहवाल आलेला आहे की, ऑनलाइन शिक्षण जेमतेम ४० टक्के विद्यार्थी घेत आहेत. ६० टक्के विद्यार्थी अजूनही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. अशा स्थितीत जेव्हा हे शैक्षणिक वर्ष संपत येईल तेव्हा एकूण एक विद्यार्थ्यांची परीक्षा नेमकी कशी घेतली जाईल...

आज जिल्ह्यात 102 रुग्ण पॉझिटिव्ह!

इमेज
आज जिल्ह्यात  102 रुग्ण पॉझिटिव्ह!   बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे. आज जिल्ह्यात 102 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

*सर्वांना विश्वास घेऊन ही न्यायालयीन लढाई जिंकणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

इमेज
* मराठा समाजाच्या विविध संघटनांनाही विश्वासात घेऊन संवाद* *मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही* *सर्वांना विश्वास घेऊन ही  न्यायालयीन लढाई जिंकणारच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* -------------------- *मात्र कुणी राजकारण करून समाजाचे माथे भडकावू नये* मुंबई दि ११: मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम  कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील,अभ्यासक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी...

जिल्ह्यातील ४ शहरांसह मोठ्या ४० गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टसाठी तपासणी अभियान-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*

* जिल्ह्यातील ४ शहरांसह मोठ्या ४० गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टसाठी तपासणी अभियान-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार* *व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी व कंटेनमेंट झोनमधील नागरिक यांची होणार तपासणी* *दिनांक 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत होणार अभियानाची अंबलबजावणी* बीड,  दि. ११::--जिल्ह्यातील पाटोदा , शिरूर कासार, धारूर वडवणी या ४ शहरात व सर्व तालुक्यातील लोकसंख्येने मोठा असलेल्या ४० गावात कोरोना संसर्ग ( covid-19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी आणि कन्टेनमेंट झोन मधील नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे, याबाबत कार्यवाहीचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत  सदर अभियान या ४ शहरांमध्ये व ४० गावांमध्ये 14 ते 16 सप्टेंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्ह्य...

मुंबईत राबविल्या जाणाऱ्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्या**-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश*

* मुंबईत राबविल्या जाणाऱ्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्या* *-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश*             मुंबई,दि. 11- ‍ कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. यासाठी येत्या 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.             मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबई महानगरपालिकेमार्फत येत्या 15 तारखेपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.    ...

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना केज आदर्श पत्रकार समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

इमेज
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना केज आदर्श पत्रकार समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केज (दशरथ चवरे): राज्यातील कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना आदर्श पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बाबतची माहिती अशी की, जोखमीचे वृत्त संकलन करताना राज्यातील अनेक पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात पत्रकार संतोष पवार, पांडुरंग रायकर आणि अनेक पत्रकार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना बातम्यांचे संकलन करताना करोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना आदर्श पत्रकार समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदर्श पत्रकार समिती केजचे अध्यक्ष विजयराज आरकडे यांनी शासकीय विश्रामगृहावर शोकसभा आयोजित केली होती. त्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराज आरकडे, सतिश केजकर, गौतम बचुटे, दशरथ चवरे, धनंजय कुलकर्णी, अशोक सोनवणे, प्रकाश मुंडे,अनिल गलांडे, रमेश इतापे, चंद्रकांत पाटील, बळीराम भोसले यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

कालच्या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश*

इमेज
* कालच्या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश* अंबाजोगाई (दि. ०८) -- : सोमवारी (दि. ०७) दिवसभर व रात्रीतून जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात व जिल्ह्यातील अन्य ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने ऊस व अन्य शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी व संबंधितांना दिले आहेत. रविवारी व सोमवारी पावसाने जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना झोडपून काढले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बु., पाटोदा, देवळा, अकोला, तडोळा, ममदापुर, यांसह जिल्ह्यातील अन्य काही गावांमध्ये प्रामुख्याने ऊस व अन्य काही पिकांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत संभाव्य नुकसान टाळून संबंधित शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये यासाठी तातडीने जास्त पाऊस होऊन शेती पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पंचनामे करण्यात यावेत व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश जिल्हा प्...

अनेक वर्षांच्या मागणीला यश आल्याचा आनंद - ७०:३० च्या निर्णयावरून धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार!*

* अनेक वर्षांच्या मागणीला यश आल्याचा आनंद - ७०:३० च्या निर्णयावरून धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार!* *वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० फॉर्म्युला रद्द - अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा* मुंबई (दि. ०८) ---- : राज्यातील एमबीबीएस सह अन्य वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्ग निहाय आरक्षण असताना प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पद्धत रद्द केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत करताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अनेक वर्षांपासूनच्या मागणीला, लढ्याला यश आल्याचा आनंद व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. राज्य शासनाने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० फॉर्म्युला रद्द केला आहे. काल (दि.०७) रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीनंतर आज अमित देशमुख यांनी विधानसभेत ही घोषणा केली.  मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून विरोधीपक्षात असताना सतत अनेक वर्षे दिलेल्या लढ्याला यश आल्याचा आनंद वाटतो आहे. असे यावेळी धनंजय मुं...

महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वडवणी तालुका उपाध्यक्षपदी सचिन मुंडे महाराज यांची निवड

इमेज
महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वडवणी तालुका उपाध्यक्षपदी सचिन मुंडे महाराज यांची निवड वडवणी दि .६ ( प्रतिनिधी ) महाराष्ट वारकरी महामंडळ महाराष्ट राज्य यांच्या वडवणी तालुका युवा उपाध्यक्षपदी वडवणी  तालुक्यातील देवडी येथील  ह.भ.प.सचिन महाराज मुंडे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .  याबाबत अधिक माहिती अशी की , आजचा समाज शारिरीक , मानसिक व सामाजिक दृष्ट्या  सक्षम व्हावा तसेच सुसंस्कारी , सदाचारी , व्यसनमुक्त व्हावा .  समाजामध्ये संत साहित्याची ओळख , जागृती व आवड निर्माण व्हावी यासाठी अध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या विचारांचा प्रचार प्रसार व प्रबोधनाच्या माध्यमातून गावोगावी लोकांचे संघटन करून समाजातील हिताच्या गोष्टींसाठी संघर्ष करून समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख , आनंद , समाधान आणि शांतता प्राप्त व्हावी आणि समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी , प्रेम , बंधुभाव , प्रेरित करून समृध्द बलशाली भारत निर्माण व्हावा व प्रत्येक व्यक्ती देशभक्तीने प्रेरित होऊन समाज कार्य करेल असा आदर्श वारकरी तुमच्या ...

राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अशोक जाधव धनगांवकर यांची निवड करा - रामराजे गव्हाणे

इमेज
राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अशोक जाधव धनगांवकर यांची निवड करा - रामराजे गव्हाणे बीड (प्रतिनिधी): भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भटक्या विमुक्त जाती-जमाती मधील गोपाळ समाज सत्तेपासून व विकासापासून वंचित राहिला आहे. या समाजाला विकासाच्या संधी मिळवण्यासाठी अहोरात्र समाजासाठी धडपडणारे गोपाळ समाजाचे नेते तथा भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष अशोक जाधव धनगांवकर यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे अशी मागणी कानिफनाथ गोपाळ समाज संघाचे बीड शहराध्यक्ष रामराजे गव्हाणे यांनी केली आहे.   भारत देश स्वतंत्र झाल्यापासून भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये गणल्या जाणाऱ्या गोपाळ समाजातील एक व्यक्ती शासनाचा प्रतिनिधी झाला नाही त्यामुळे  या समाजाच्या समस्या  अडीअडचणी  सरकारच्या  पर्यंत पोहोचल्या नाही. त्यामुळे या समाजाला सत्तेचा वाटा मिळाला नाही या समाजाची शैक्षणिक क्रांती झाली नाही. शिवाय या समाजातील व्यक्तीला गावातील ग्रामपंचायत पासून राज्यासह देशात कोणत्याही पदावर राहून प्रतिनिधित्व करण्याचे संधी प्राप्त झाली नाही. त्यामुळे इतर समाजाच्या त...

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, 21 मंत्री, कर्मचा-यांना कोरोनाची लागण!

इमेज
पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, 21 मंत्री, कर्मचा-यांना कोरोनाची लागण!   मुंबई (प्रतिनिधी)– आजपासून 2 दिवस होत असलेल्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट पहायला मिळत आहे.  ठाकरे सरकार मधील जवळपास 21 मंत्री आणि बहुतांश कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. महाराष्ट्र राज्यसह इतर काही राज्यातील विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आजपासून सुरू होत असलेले अधिवेशन हे 2 दिवस होणार आहे.परंतू या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट पहायला मिळत आहे. ठाकरे सरकार मधील जवळपास 21 मंत्री आणि बहुतांश कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते.  दरम्यान अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून प्रत्येक जणांची स्वॅब टेस्ट घेतली गेली. यामध्ये तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आहे. यामध्ये सचिव मंत्री, विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जण असल्याची माहिती आहे. उर्वरित कारी मंत्री, मंत्रालय अधिकारी, कर्मचारी, विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील कोरोना झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान ज्या...