बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न
बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा बीड / प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सकाळी ठीक ८.०० वा. ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार यांसह महत्वाचे अधिकारी व ...