पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीड जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच;आज 50 रुग्ण पॉझिटिव्ह!

इमेज
बीड जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच;आज 50 रुग्ण पॉझिटिव्ह! बीड प्रतिनिधी: रोज रात्री येणाऱ्या धक्कादायक रिपोर्टने बीड प्रशासन,नागरिक हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे बीड जिल्ह्यातील प्रशासनासह नागरिकांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सध्या या वाढत्या रूगणांमुळे  जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. अशा भयाण परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यात एकूण 50 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये -ना.धनंजय मुंडे

इमेज
पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये -ना.धनंजय मुंडे एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. बीड (प्रतिनिधी) - : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीककर्जाच्या संबंधित एक महत्वपुर्ण निर्णय घेतला असून, पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार खरीप हंगाम २०२० - २१ मध्ये पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे कर्ज मिळत नाही , त्यांना तलाठ्यांमार्फत आपली माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे.  संबंधित शेतकऱ्यांनी आपली माहिती आधार कार्ड, पॅन कार्ड, गावचे नाव, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा एकूण लाभक्षेत्र यासह सविस्तर माहिती विहित नमुन्यामध्ये सादर करण्याबाबत आवाहन केले आहे.  ना. मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देशित केल्याप्रमाणे सदर आदेशान्वये, संबंधीत शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन ते तलाठी - मंडळ अधिकारी यांचेमार्फत मार्गी लावून त्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी कारवाई करण्यात येणार अस...

जिल्ह्यात लाॅकडाऊनचा कालावधी वाढ, मनाई जमावबंदी आदेश 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लागू---जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्ह्यात काही नवीन बाबींना अटी व शर्तीसह 5 आॅगस्ट पासून परवानगी

इमेज
* जिल्ह्यात  लाॅकडाऊनचा कालावधी वाढ, मनाई जमावबंदी आदेश  31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लागू---जिल्हाधिकारी राहुल रेखावार* *जिल्ह्यात काही नवीन बाबींना अटी व शर्तीसह 5 आॅगस्ट पासून परवानगी बीड, दि. ३०::-राज्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 (1)(3)अन्वये मनाई , जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असून हे आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच राज्य शासनाचे आदेशानुसार खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.सदर आदेशानुसार  काही बाबींना  पुढील अटी व शर्तीसह दिनांक 05 आॅगस्ट 2020 रोजी पासून जिल्ह्यामध्ये परवानगी देण्यात आली आहे  1. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सस यांना चित्रपटगृह व्यतिरिक्त सकाळी 09.00 वा. ते सायंकाळी 7.00 वा पर्यंत कोवीड -19 विषयक सर्व नियमांचे पालन करणेचे अटीवर दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी पासून चालू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच मॉल्...

विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती, शारिरीक व मानसिक स्वास्थ्य यासाठी योग साधना उपयुक्त--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*

इमेज
* विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती, शारिरीक व मानसिक स्वास्थ्य यासाठी योग साधना उपयुक्त--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार* *जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभागाचा विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम       *१ ते १४ ऑगस्ट या कालावधीत योगा, प्राणायाम व पोषक आहार यांचे तज्ञाव्दारे मार्गदर्शन फेसबुक लाईव्ह*                               बीड, दि. ३०::-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूरु असलेल्या लॉकडाऊनमूळे दिनांक 22 मार्च पासुन राज्यात सर्व आस्थापनाच्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहावी त्यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे व शरीरातील ताणतणाव निघुन जावा यासाठी योग साधना अत्यंत उपयुक्त आहे सर्व शिक्षक, पालकांनी या उपक्रमात आपल्या विद्यार्थ्यासह सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.  स्कुल फ्रॉम होम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन सुरु राहावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु कोरो...

राखी टपालासाठी टपाल कार्यालये रविवारी सुरू राहणार

इमेज
राखी टपालासाठी टपाल कार्यालये रविवारी सुरू  राहणार बीड (प्रतिनिधी) : राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 (सोमवारी) असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट रविवारी रोजी  सर्व वितरण पोस्ट कार्यालयामध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. प्राधान्य क्रमाने व वेळेत राखी टपाल वितरण करण्यासाठी लोक स्पीड पोस्ट सेवा वापरु शकतात, असे आवाहन डाक विभाग बीड यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.           राखी हा सण भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा उत्सव आहे. ज्यात भावनिक  भावनिक असक्ती आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत.         राखी टपालाची प्रधान्य क्रमानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्टऑफीसमध्ये करण्यात आली असून राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरु करण्यात आले आहेत.       यावर्षी हा सण अधिक महत्व गृ...

कोरोनाचा आज रेकॉर्ड ब्रेक, बीड जिल्ह्यात 58 पॉझिटिव्ह; तर बीड शहरात ३० रूग्ण आढळले

कोरोनाचा आज रेकॉर्ड ब्रेक,  बीड जिल्ह्यात 58 पॉझिटिव्ह; बीड शहरात ३० रूग्ण आढळले बीड : प्रतिनिधी कोरोना आता ग्रामीण भागासह जिल्ह्यात सुसाट वेगाने पसरू लागला आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक 58 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या पैकी बीड शहरातील एकूण ३० रुग्ण आढळले आहेत. बीड ३०  २१ वर्षीय महिला ( रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३८ वर्षीय महिला ( रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ , गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४४ वर्षीय पुरुष ( रा रानुमाता मंदीराच्या मागे , शाहुनगर बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७५ वर्षीय पुरुष ( रा रानुमाता मंदीराच्या मागे , शाहुनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय महिला ( रा जुन्या एसपी ऑफिस जवळ गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४८ वर्षीय महिला ( रा.काशी नगर , बीड शहर ) ६५ वर्षीय महिला ( रा.काझी नगर , बीड शहर ) ३ ९ वर्षीय महिला ( रा.काशी नगर , बीड शहर ) ३८ वर्षीय महिला ( रा.काझी नगर , बीड शहर ) ३० वर्षीय पुरुष ( रा.च - हाटे कॉलनी , दिलीपनगर पाटी जवळ , बीड शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा....

राज्याचा एकूण निकाल ९५.३० टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

इमेज
राज्याचा एकूण निकाल ९५.३० टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर...

ऑटो रिक्षा चालकांना प्रतिमहिनासात हजार पाचशे रुपये मानधन सुरू करा --संतोष निकाळजे

इमेज
ऑटो रिक्षा चालकांना प्रतिमहिना सात हजार पाचशे रुपये मानधन सुरू करा --संतोष निकाळजे बीड जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसची कमिटीची मागणी. बीड (प्रतिनिधी) दि.28 लाॅकडाऊन मुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, या कालावधी मध्ये अनेक उद्योगधंदे तसेच हातावर पोट असणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक यांना उपासमारीची वेळ आली आहे, त्यांना शासनाने 7 हजार 500 रुपये प्रति महिना मानधन देऊन अर्थसहाय्य करावे अशी व इतर मागण्यांचे निवेदन बीड जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष संतोष निकाळजे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोणा च्या जागतिक महामारी मुळे सर्वजण भरडले गेले आहेत. त्यामध्ये ऑटो रिक्षाचालक-मालक यांच्या वर खूप वाईट दिवस आले आहेत. रोजीरोटी व रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील असंघटित कामगार काँग्रेस कमिटीच्या वतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांना आरटीओ द्वारा आकारण्यात येणारे शुल्क नूतनीकरण, प्रवासी वाहतूक, वाहन नोंदणी शुल्क, या शुल्का मध्ये ए...

बीड शहरातील ४ ठिकाणासह एकूण जिल्ह्यातील १० ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित*

* बीड शहरातील ४ ठिकाणासह एकूण जिल्ह्यातील १०  ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित*  बीड, दि, २७::- जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बीड शहरातील ४, गेवराई शहरातील १ ठिकाणांसह बीड, शिरूर व गेवराई तालुक्यातील ५ गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.  याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे .  बीड शहरातील भगवान नगर बालेपीर,, च-हाटे कॉलनी दिलीप नगर पाटीजवळ , बागवान गल्ली पांगरी रोड व गांधी नगर हनुमान मंदिराजवळ (नाळवंडीनाका), गेवराई शहरातील निकम गल्ली यासह बीड तालुक्यातील काळेगाव हवेली, मांडवजाळी, कामखेडा, गेवराई तालुक्यातील रांजणी आणि शिरूर तालुक्यातील बोरगाव  येथे या गावात व वरील संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन ( Containment Zone)...

काही शिक्षकांमुळे ऑनलाइन पद्धतीला खीळ - पत्रकार एस.एम.युसूफ

काही शिक्षकांमुळे ऑनलाइन पद्धतीला खीळ - पत्रकार एस.एम.युसूफ बीड (प्रतिनिधी) - सध्या राज्यातील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना  मोबाईल व्हॉट्सऍप माध्यमातून  ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी इयत्तानिहाय व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. नव्याचे नऊ दिवस ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे चांगले वाटले. परंतु सध्या मात्र काही शिक्षकांमुळे ऑनलाइन पद्धतीला खीळ बसत आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बाबतीत विद्यार्थी संबंधित शिक्षकांना जेंव्हा फोन करतात तेंव्हा बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांचे फोन घेत नाहीत. या बाबतीत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता मुख्याध्यापक ही त्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप पत्रकार  एस.एम.युसूफ यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केला. काही शाळेतील शिक्षक, महिला शिक्षिकांकडून    या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासनाच्या आदेशाबरहुकूम सगळीकडे ऑनलाइन शिक्षण देण्याची सुरुवात १५ जून पासून सुरु झालेली आहे. कोरोना महामारीमुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षण पद्धत...

उद्या दहावीचा निकाल उद्या दहावीचा निकाल, दुपारी एकनंतर ऑनलाइन होणार जाहीर

पुणे (वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (२९ जुलै) रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.    दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणींमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. गेल्या काही दिवसांत आयसीईएसई आणि सीबीएसईचे दहावी-बारावीचे निकाल तसेच राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे पालक-विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.   यंदा दहावीच्या परीक्षेला १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी बसले होते.  www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org,  www.maharashtraeducation.com या वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. तसेच त्यांना निकालाची प्रतही घेता येईल. ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत गुणपडताळणीसाठी, तर ३० जुलै ते १८ ऑगस...

जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. २७:-- जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आणि शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार्‍या बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून  सदर कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी कोणत्या्ही रुग्णालयात दाखल होण्यासाठी काहीही अडचण येत असल्यास याबाबत माहिती साठी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे  त्यासाठी नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जिल्ह्या रुग्णालयाचे डॉ सचिन आंधळकर आहेत. कक्षात नियुक्त शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांचे नाव , शाळेचे नाव आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आज 25 जण कोरोना पॉझिटिव्ह

इमेज
आज 25 जण कोरोना  पॉझिटिव्ह बीड शहर 6 , परळी 12 , गेवराई 6 तर पाटोदा तालुक्यात 1 रुग्ण बीडमध्ये एक डॉक्टर आणि खाजगी रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह..

बकरी ईद सण शांततेत साजरा करावा, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन*

* बकरी ईद सण शांततेत साजरा करावा, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन* *बकरी ईद सण जनावरांची कत्तल,  कुर्बानीच्या पूर्व परवानगीसाठी पशुधन विकास अधिकारी हे सक्षम अधिकारी* बीड, दि. २४::-जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सण शांततेत साजरा करावा व कायद्याचे कोठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन श्री राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे. शासनाने कोरोना संसर्ग (covid-19) मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला आहे.   नागरिकांनी प्रतीकात्मक कुर्बानी करावी व बकरीईद च्या निमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या कायम करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देण्यात आली नाही.  कोरोना  या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन व आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद, न...

आज १६ पॉझिटिव्ह!

इमेज
आज १६ पॉझिटिव्ह !

ऊर्ध्व कुंडलिका धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात

ऊर्ध्व कुंडलिका धरणातून पाणी सोडण्यास आत्ताच  सुरूवात केली आहे.पाणीपातळी 536.55 मी झाल्यामुळे गेट नं.1 आणि 5 ,10 सेमी ने उचलून नदी पात्रात विसर्ग सुरू केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.

उर्ध्व कुंडलिका धरण लगतच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

उर्ध्व कुंडलिका धरण लगतच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा  वडवणी(प्रतिनिधी) वडवणी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून रात्रीच्या वेळी जर जोरात पाऊस किंवा अतिवृष्टी झाली तर वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार असून परिणामी या धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येणार आहे तरी या प्रकल्पाच्या नदीकाठी असणाऱ्या लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशी माहिती माजलगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती.शोभा ठाकूर व वडवणी तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी दिली आहे.                      याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सध्या वडवणी तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच लघु मध्यम प्रकल्प, नदी, नाले, विहीरी, तलाव ओसंडून वाहत आहेत. परिणामी सतत पडणाऱ्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनही योग्य ती दक्षता व खबरदारी घेत असून वडवणी तालुक्यातील मुख्य मध्यम जलप्रकल्प असणाऱ्या सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलि...

जिल्हाधिकारी रेखावार यांच्या सूचना

वङवणी तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात पाऊस पङत असुन रात्रीच्या वेळी जर जोरात पाऊस झाला तर कुंडलीका प्रकल्प सोन्नाखोटा भरेल व धरणातून नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात येतो की, नदीच्या पात्रात कुणी ही जावू नये तसेच कुणीही नदीपात्रात जनावरे सोडू नये असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी कळविले आहे.

आज तब्बल 27 जण पॉझिटिव्ह!

इमेज
बीड  (प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा मोठा संसर्ग होत आहे.  कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गाच्या  कहराने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे या कोरोना कहराचा प्रभाव कमी करता करता  प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. कोरोना संक्रमणाची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यावरील मोठ्या संकटाचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या परिस्थितिमध्ये रात्री उशीरा येणारे रिपोर्ट आणखी चिंता वाढवत आहेत.  आज बीड जिल्ह्यामध्ये एकूण “27” पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या पैकी  बीड शहरात 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरू न जाता  काळजी घेऊन वावरले पाहिजे.  मास्क वापरा…सोशल डिस्टेन्स ठेवा… प्रशासनाच्या सुचनेचं पालन करा.. सुरक्षित रहा...

ग्रामपंचायतीवर प्रशासक नको वंचित बहुजन आघाडीची मागणी

इमेज
बीड (प्रतिनिधी) कोरोना रोगामुळे संपूर्ण महाराष्ट्रत व देशात लॉकडाउन चालु आहे याचा बहाना पुढे करून आघाडी सरकार ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे व संपणार आहे अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या तयारी मध्ये आहे. त्यामुळे जवळच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घशात ग्रामपंचायती घाण्याचा डाव आहे, अशा स्वरूपाचे धोरण अवलंबिले आहे, या धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपालांना निवेदन देऊन हा शासनाचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी बीड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासक नेमने हे घटनेच्या विरोधात असून त्याला वंचित बहुजन आघाडीचा कडाडून विरोध आहे, प्रशासक नेमण्या ऐवजी ग्रामपंचायतीला सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी किंवा निवडणुका घेण्यात यावी अशी मागणी  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  अकरा हजार रुपये भरून कोणीही ग्रामपंचायतीचा प्रशासासक होऊ शकतो हे सर्व चुकीच्या पद्धतीने  अंमलबजावणी करण्याचे धोरण सत्ताधारी आघाडी सरकारने अवलंबिले आहे, भ...

प्रशासनाने दिलेल्या बातमी मध्ये चुकून 32 जुलै असा उल्लेख करण्यात आला आहे. तरी 31 जुलै असा वाचावा.

प्रशासनाने दिलेल्या बातमी मध्ये चुकून 32 जुलै असा उल्लेख करण्यात आला आहे. तरी 31 जुलै असा वाचावा.

अंबाजोगाई शहरातील काही ठिकाणी आणि शिरूर कासार, गेवराई, परळी या तालुक्यातील काही गावांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित*

*  बीड, दि, २२: अंबाजोगाई शहरातील गौंड गल्ली, शिरूर तालुक्यातील बारगजवाडी, गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव आणि  परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे  असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. अंबाजोगाई शहरातील गौंड गल्ली येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने दौंड गल्ली येथील अशोक विश्वंभर देशपांडे यांचे घर ते रमेश रंगराव पत्की यांच्या घरापर्यंतचा परिसर  पूर्णवेळ अनिश्‍चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.          शिरूर तालुक्यातील मौजे बारगजवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून  हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे  गेवराई तालुक्यातील मौजे बाग पिंपळगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे  परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे धर्मापुरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे  हे गाव कंटेनमेंट झोन म्हण...

बीड जिल्ह्यात कोरोना ब्लास्ट , आज 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह

इमेज
  बीड जिल्ह्यात कोरोना ब्लास्ट , आज 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह  बीड दि .22 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज बुधवारी दि .22 जुलै रोजी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे .  पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 23 ,परळी 5 , अंबाजोगाई 1 , गेवराई 8 , केज 3 , पाटोदा 1 माजलगाव 1 , शिरूर तालुक्यातील 2 अशा एकूण 44 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे . जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 380 + 44 = 424 झाली आहे . जिल्ह्यातील आजचा सर्वाधिक 44 पॉझिटिव्हचा आकडा आहे .

पन्नास पॉझिटिव्ह , तीन मृत्यू , बिडकरांसाठी सोमवार धक्कादायक ! जिल्ह्यात एकच खळबळ

इमेज
पन्नास पॉझिटिव्ह , तीन मृत्यू , बिडकरांसाठी सोमवार धक्कादायक !  जिल्ह्यात एकच खळबळ  बीड प्रतिनिधी: सोमवारचा दिवस कोरोना बधितांच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरला. सोमवारी सकाळी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री पुन्हा २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात तब्बल ५० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्यामुळे एकीकडे भीतीचे सावट निर्माण झालेले असताना आणि सकाळी २४ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री पुन्हा २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.

सीबीएसई अभ्यासक्रम दहावीच्या परिक्षेत पिंपरखेड येथील कु. सेजल निपटेचे सुयश; माजलगाव येथील सिंदफना शाळेतुन पटकावला द्वितीय क्रमांक

इमेज
सीबीएसई अभ्यासक्रम दहावीच्या परिक्षेत पिंपरखेड येथील कु. सेजल निपटेचे सुयश; माजलगाव येथील सिंदफना शाळेतुन पटकावला द्वितीय क्रमांक बीड- वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांनी कु. सेजल भागवतराव निपटे हिने माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूल  (CBSC) शाळेतून 96 % घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे.    सीबीएसई पॅटर्नचा इयत्ता दहावीचा नुकताच निकाल जाहीर झाला. या मध्ये वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यार्थ्यीनी कु. सेजल भागवतराव निपटे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. कु.सेजल निपटे ही माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार म्हणून तिचे  शाळेत कौतुक होत होते.अभ्यासा बरोबर  इतर उपक्रमात ही सेजल अग्रेसर होती. सतत चिंतन मनन आणि पठण करत होती. तिच्या ठायी जिज्ञासू वृत्ती आहे. अभ्यासात चिकाटी आणि सातत्य ठेवल्यामुळे तिला दहावीच्या परिक्षेत उतुंग यश संपादन करता आले.  सीबीएसई पॅटर्न मधुन दहावी परिक्षेत  96 टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरा क्रमांक पटकावत नावलौकिक मिळविला आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्र...

आज तब्बल 24 नवीन रुग्णांची भर बीड 9 , परळी 2 , पाटोदा 2 , केज 5 , अंबाजोगाई 2 , गेवराई 4 रुग्ण

इमेज
बीड दि .20 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज सोमवार दि .20 जुलै रोजी सकाळी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 25 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे .   पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 9 , परळी 2 , पाटोदा 2 , केज 5 , अंबाजोगाई 2 , गेवराई 4 रुग्णांचा समावेश आहे . जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 330 + 24 354 झाली आहे .  आज तब्बल 24 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .  कोविड - दिनांक २० जुलै 2020 रोजीचा अहवाल वेळ सकाळी 9:45 वा 1  24 पॉझिटिव्ह : बीड 09- २५ वर्षीय पुरुष ( रा.लोहार गल्ली , जुना बाजार बीड ) ४० वर्षीय पुरुष ( रा.जुना बाजार कोरडे गणपती मंदीर , बीड ) ५८ वर्षीय पुरुष ( रा.जुना बाजार , हाफीज गल्ली , कादरीया मस्जीद जवळ ) ३२ वर्षीय पुरुष ( रा . लक्ष्मण नगर , लेंडी रोड , बीड ) १८ वर्षीय महिला ( रा कारंजा रोड खंदक , टिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५४ वर्षीय पुरुष ( रा कागदी दरवाजा बीड ) ४३ वर्षीय पुरुष ( रा बीड शहर राहण्याच्या ठिकाणाची खात्री करणे सुरु आहे ) ४३ वर्षीय महिला ( रा.कबा...

बीडला पुन्हा धक्का.. बीड जिल्ह्यात 14 जणांना कोरोनाची लागण

इमेज
बीडला पुन्हा धक्का : बीड जिल्ह्यात 14 जणांना कोरोनाची लागण  बीड  ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज दि .19 जुलै रोजी रात्री 1 वाजता प्रशासनाला प्राप्त झाले आहेत . आज आणखी 14 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे . पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 6 , परळी 5 , आष्टी 1 , अंबाजोगाई 1 , गेवराई 1 रुग्णांचा समावेश आहे . जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 317 + 14 = 331 झाली आहे . तर 174 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या 133 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत .  बीड मध्ये  46 वर्षीय महिला ( रा विद्यानगर पश्चिम बीड , खाजगी रुग्णालयातील कर्मचारी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) , 78 वर्षीय पुरुष ( रा.सावतामाळी चौक , बीड शहर ) , 60 वर्षीय महिला ( रा शिवनेरी कॉलनी ईमामपुर रोड , बीड ) , 70 वर्षीय पुरुष ( रा.भद्रा मारूति नगर , कॅनॉल रोड , बीड ) , 50 वर्षीय ( रा.गणपती मंदीरा जवळ शाहुनगर , बीड ) , 45 वर्षीय पुरुष ( कारंजा , खंदक बीड )  गेवराई 01 -55 वर्षीय पुरुष (ता.गेवराई )  परळी 05 -  24 वर्षीय पुरुष ( रा गुरुकृपा ...

आज नवीन ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; परळीत ५ , बीड ३ , गेवराई २ केज १

इमेज
बीड प्रतिनिधी: बीड जिल्ह्यात कोरोना चे  मोठ्या प्रमाणात वाढल्याचे  सध्या दिसून येत आहे . प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेल्या  चिंतेत भर पडत आहे . आज  ११ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यामध्ये बीडमध्ये ३ गेवराईत 2 केज मध्ये १ तर परळीत ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने रात्री १२:०७ वाजता दिली. या ११ पैकी १० रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झाले आहे .  बीड -3 संत नामदेव नगर माऊली कॉलनी येथील 57 वर्षीय युवक व 52 वर्षीय महिला तसेच खाजगी रुग्णालयातील कर्मचारी असलेला 19 वर्षीय युवक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कामुळे बाधित झाला आहे.  गेवराई -2 वीर लहुजी नगर येथील 27 वर्षीय पुरुष खाजगी रुग्णालयातील कर्मचारी आहे. तसेच केकत पांगरी येथील ६० वर्षीय व्यक्ती खाजगी रुग्णालयामुळेच बाधित झाला आहे . केज -१ तालुक्यातील होळ येथे ५५ वर्षे व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे .  परळी -५ जुने रेल्वे स्टेशन भागात १५ वर्षीय मुलगा ३५ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला तसेच सर्वेश्वर नगर मधील १८ वर्षीय...

बीड शहरातील आरोग्य सर्वेक्षणास गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांच्या दारात*. *कोरोना तपासणीसाठी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्यासाठी थेट प्रयत्न*

इमेज
बीड, दि. १७:--जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वतः बशीर गंज, बलभीम चौक व मिलिया कॉलेज परिसरात पोहोचले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी देखील या प्रयत्नात साथ देत प्रत्यक्ष नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन आरोग्य सर्वेक्षणासाठी आणि तपासणीसाठी सहभाग देण्याचे थेट आवाहन आज केले मागचे तीन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने या क्षेत्रात नागरिकांच्या स्वब नमुने तपासणीचे साठी कार्यवाही करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना अल्प प्रतिसाद मिळाला होता पण आज  जिल्हाधिकारी श्री रेखावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार  यांनी थेट या क्षेत्रात भेट देऊन नागरिकांना आवाहन केल्याने एका दिवसात ६१९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले  जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने  कंटेनमेंट झोन मधील लोकांच्या  व  बाधित रुग्णांच्या  संपर्कात आलेल्या  परिसरातील  व्...

बीड जिल्ह्यातील पिकविम्यासंदर्भात आज राज्य शासनाचा आदेश निघणार - पालकमंत्री धनंजय मुंडे**मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झाला निर्णय* *विम्याचा हफ्ता भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत, मुदत वाढविण्यासाठी केंद्राकडे मागणी - धनंजय मुंडे*

इमेज
परळी (दि. १७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, पुढील तीन वर्षांसाठी पिकविम्याच्या प्रश्न मिटला आहे. शेतकऱ्यांना आपल्या खरीप पिकांचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भरता येणार असून त्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ना. धनंजय मुंडे यांनी दिली. या बैठकीस ना. मुंडे यांच्यासह कृषिमंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी सचिव एकनाथ डवले तसेच कृषी आयुक्त उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० - २१ साठी कोणत्याही पीकविमा कंपनीने निविदा न भरल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ना. धनंजय मुंडे यांनी सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे याबाबत मागणी व पाठपुरावा केल्याने केंद्...

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी २५ पॉझिटिव्ह

इमेज
बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; २५ पॉझिटिव्ह बीड : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे . एका खाजगी दवाखान्यातून १० जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ आता एकाच वेळी सर्वाधिक २५ अहवाल पॉझिटीव्ह आले असून १ अहवाल अनिर्णित आहे . याबाबतची माहिती जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांनी ( दि .१७ ) रोजी मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांनी दिली आहे . प्रशासनाने दिलेली अधिकृत माहिती पुढिलप्रमाणे

आज जिल्ह्यात १५ पॉझिटिव्ह ; बीड मध्ये १०

इमेज

बीड जिल्हा कोव्हीड १९ ची सविस्तर माहिती

इमेज

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार!

इमेज
मुंबई प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेला बारावीचा निकाल उद्या गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी जाहीर होणार आहे .विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर हा निकाल पहावा असे मंडळाने सूचित केले आहे .    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या गुरुवार, 16 जुलै 2020 रोजी जाहीर होणार आहे . दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर हा निकाल विद्यार्थी - पालकांना पाहता येईल . याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली आहे . महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे . कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२ वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं . अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे 

*पॉवरफुल मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या 'सामाजिक न्याय मंत्रिपदाचे वलय' हे जनतेच्या विकासासाठी*

इमेज
*पॉवरफुल मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या 'सामाजिक न्याय मंत्रिपदाचे वलय' हे जनतेच्या विकासासाठी* आज ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर लिहिलेला हा लेख.. लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांना ज्या पंडित अण्णांनी घडविले अशा पंडित अण्णांच्या पोटी जन्मलेले आणि स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या मुशीत घडलेले नेतृत्व म्हणून ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. राजसकुमार राजबिंड व्यक्तीमत्व असलेल्या धनंजय मुंडे यांच्याठायी स्व. प्रमोद महाजन यांच्या सारखी वक्तृत्व शैली, मधुर अन् आपलेपणाची वाणी आणि संवाद कौशल्य तर काका स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे राजकीय कसब, पिता स्व. पंडित अण्णा मुंडेंचा धाडसीपणा ठासून भरलेला आहे. त्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश‌ केला त्या दिवसा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांचा मुरब्बीपणा, आणि अजित पवारांची प्रशासकीय असणारी पकड ना. धनंजय मुंडे यांच्या ठायी असलेली जाणवत आहे. या शिवाय अतिउच्च बुद्धिमत्ता, प्रचंड आत्मविश्वास, खंबीर निर्णय घेतल्याची क्षमता आणि मेहनत करण्या...

पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

इमेज
मुंबई, दि. १५ : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली व विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या सुनावणीवर ते बोलत होते. श्री.चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर २७ जुलैपासून नियमित सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या सुनावणीत राज्य शासन भक्कमपणे बाजू मांडेल. शासनाच्या वतीने मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया युक्तीवाद करणार असून, प्रख्यात वकिल कपिल सिब्बल व रफिक दादा हे मराठा आरक्षणाच्या बाजूने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणार आहेत. आजच्या सुनावणीत वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास अंतरिम  स...

आज 19 पॉझिटिव्ह

इमेज

आज ५ पॉझिटिव्ह... परळी शहरात चार तर बीडमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळला

इमेज
बीड - कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे परळी शहरातील चार महिलांना कोरोणाची बाधा झाली आहे . तर बीड शहरात एक रुग्ण सापडला आहे .  परळी शहरात एसबीआय बँक कर्मचारी संक्रमित झाल्यानंतर रुग्णसंख्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे . 296 संशयित रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसले तरी पाच जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत . यामध्ये चार रुग्ण परळी शहरात सापडले आहेत . तर एक रुग्ण बीड शहरात सापडला आहे . परळी शहरातील आझाद नगर भागामध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे अठरा वर्षाच्या दोन मुलींना , वीस वर्षीय महिलेस तसेच तीस वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे. बीड शहरातील त्रिमूर्ती कॉलनी नंबर 3 , दत्तनगर भागात गुजरातहून आलेल्या 54 वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. एकूणच जिल्ह्यात आता नागरिकांनी काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे उर्वरित प्रलंबित असलेल्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आज रिपोर्ट यायला उशीर होणार

आपल्या माहितीस्तव काल आणि आज बीड जिल्ह्यातून कोवीड - 19 संशयीत म्हणून घेतलेल्या थोट स्वॅबचे अहवाल येण्यास रात्री उशिर होण्याची शक्यता आहे. अहवाल येताच आपणास माहिती कळविली जाईल. *धन्यवाद*

बीड शहरात शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू वडील, मुलगी अन काका चा दुर्दैवी अंत

इमेज
  बीड (प्रतिनिधी) : घरावर जाण्यासाठी असणा-या लोखंडी सीडीमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने एक सात वर्षीय चिमुकलीला करंट बसला. तिला वाचवण्यसाठी गेलेल्या बापासह चुलत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड शहरातील गोविंदनगर भागात सोमवारी ( दि .13 ) सकाळी ११वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेया वडमारे तुळशीराम वडमारे ( वय 7 ) , तुळशीराम बापुजी वडमारे , बाळू उर्फ रमेश बापूजी वडमारे अशी मयतांची नावे आहेत .  श्रेया ही लोखंडी सीडीवर जात होती. या सीडीमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने तिला करंट बसला. हे निदर्शनास येताच बाजुला असलेले वडील तुळशीराम व चुलते बाळु उर्फ रमेश  यांनी वाचविण्यासाठी तिच्याकडे धाव घेतली. यावेळी तिघेही चिटकले, यामध्ये तिघांचा मृत्यु झाला. सदरील मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे . दरम्यान या घटनेमुळे वडमारे परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे . घटनास्थळी महावितरण कर्मचाऱ्यांनी  धाव घेत विद्युत पुरवठा बंद केला. या घटनेनी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बीड शहरासह चौसाळ्यात रुग्ण वाढले, 9 बाधित, 195 स्वॅबचा रिपोर्ट आला आणखी 433 बाकीच

इमेज
बीड । प्रतिनिधी:  बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे . शनिवार आणि रविवारचे 628 अहवाल प्रलंबित होते . त्यातील 195 अहवाल प्राप्त झाले असून यातील 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर 184 अहवाल निगेटिव्ह आले आहेत . दरम्यान आता 433 अहवालांची प्रतिक्षा कायम आहे . बाधित रुग्णांमध्ये चौसाळा ( ता.बीड ) येथील यापूर्वीच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील 35 पुरुष , 16 वर्षीय मुलगा व 37 वर्षीय महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .  बीड शहरातील संत तुकारामनगर येथील यापूर्वीच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या सहवासित 37 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . याशिवाय रानुमाता मंदिराच्या मागे , शाहूनगर , बीड येथील 40 वर्षीय पुरुष , तुळजाईनगर , बीड येथील यापूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील 52 वर्षीय पुरुष , तसेच अक्षय प्लाझा , व्यंकटेश शाळेच्या जवळ , भक्ती कंन्स्ट्रक्शन येथील 46 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे .  शिरुकासार तालुक्यातील तागडगाव येथील 45 वर्षीय पुरुष तसेच आष्टी येथील दत्तमंदिर गल्लीतील 42 वर्षीय पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. रविव...

बीड मध्ये बालविवाह रोखला!

इमेज
बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील काठोडा येथील एका 26 वर्षीय तरुणा सोबत एका अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचे नियोजीत आसल्याची अधिकृत माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा बाल हक्क समितीचे सदस्य  तत्वशिल कांबळे यांना मिळाली. तत्काळ त्यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या प्रशासनाला सोबत घेऊन कोळगावात जाऊन सदरील बालविवाह रविवार दि.१२ रोजी दुपारी रोखला. या वेळी सदरील मुलागा आणि त्या अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना समजावून सांगितले. शिवाय बालविवाह न करण्या बाबत लेखी लिहून घेतले.    या बाबत अधिक माहिती अशी की आज रविवार दि १२ जुलै रोजी दुपारी 2 वाजता कोळवाडी ता.जि.बीड येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा कठोडा येथील २६ वर्षीय मुलासोबत विवाह होणार आसल्याची खात्रीशीर माहिती बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य बेटी बचाव बेटी पढाव तत्वशिल कांबळे यांना मिळाली. तत्वशील कांबळे  यांनी ग्रामसेवक सखाराम काशीद , सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे बीड ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे , सहायक फौजदार वैष्णव , आनंद मस्के , येळे आदींना सोबत घेऊन कोळवाडी येथे जाऊन ...

आज 5 जण पॉझिटिव्ह!

इमेज
आज 5 जण पॉझिटिव्ह; अंबाजोगाई मधील 1 तर परळीत स्टेट बँकेचे 4 ग्राहक पॉझिटिव्ह ' बीड प्रतिनिधी:   बीड जिल्ह्यातील पाठविलेल्या स्वबचे अहवाल आज प्राप्त झाले त्यामध्ये 5 जण पॉझिटिव्ह आले असून त्यातील 4 व्यक्ती ह्या स्टेट बँकेच्या संपर्कातील आहेत.तर एक पॉझिटिव्ह हा अंबाजोगाई शहरातील आहे . आलेल्या अहवालात परळी येथील ब्रह्मवाडी , टोकवाडी येथील ग्राहक , विद्यानगर येथील ग्राहक , इंद्रा नगर येथील ग्राहक , न्यु पेठ मोहल्ला नेहा क्लिनिक जवळ येथील ग्राहकांचा समावेश आहे.तर अंबाजोगाई सिराज कॉलनी येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील महिलेचा समावेश आहे .  प्राप्त अहवाल : 345  पॉझिटिव्ह : 5  निगेटिव्ह : 340  कालचे आणि आजचे मिळून प्रलंबित : 628