बीड मध्ये पडत्या पावसात अवघ्या एक तासांत बदलले रोहीत्र
बीड मध्ये पडत्या पावसात अवघ्या एक तासांत बदलले रोहीत्र बीड प्रतिनिधी: शहरातील नगररोड परिसरातील रोहित्र बिघडल्याने नगर रोड भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्याच्या उकाडा आणि ऐन संचार बंदीच्या काळात सर्वच नागरिक घरात असल्याने आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रचंड त्रास जाणवू लागला होता. लहान बालके आणि वयोवृध्दासह नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला. या परिसरातील नागरिकांनी तत्काळ काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष श्री प्रशांत पवार यांच्याशी संपर्क साधून विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. सदैव जनहितासाठी तत्पर असलेले काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष श्री. प्रशांत पवार यांनी तत्काळ संबंधित विद्युत खात्याशी फोनवरून माहिती देऊन रोहित्र बदलण्याची विनंती केली. त्यानंतर श्री. प्रशांत पवार यांच्या एका फोनवरून एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी कसलाही वेळ न दवडता पडत्या पावसामध्ये अवघ्या एका तासात हे रोहीत्र बदलुन नगर रोड परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरळीत केला. बिघडलेले रोहित अवघ्या एका तासात पडत्या पावसात बदलून त्या जागी नवीन रोहित्र ...