कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केस कापणे महागणार *उद्या सोमवार दि.१ जून पासून नवीन दर लागू करणारकेस कापणे १००रु, दाढीसाठी ६० रू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केस कापणे महागणार *उद्या सोमवार दि.१ जून पासून नवीन दर लागू करणार केस कापणे १००रु, दाढीसाठी ६० रू बीड प्रतिनिधी : सलून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कोरोनाची बाधा होऊ नये , यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे . त्यामुळे उद्या १ जूनपासून राज्यासह बीड जिल्ह्यात केस कापण्याच्या व दाढीच्या दरात वाढ केली जाणार असल्याची माहिती वीर जिवा महाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक आरक्षण समिती प्रदेश कार्याध्यक्ष किशोर गाडेकर आणि नाभीक दुकान मालक संघटनेचे बीड शहराध्यक्ष सुनिल दोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन दिली. या पत्रकात किशोर गाडेकर, आणि सुनील दोडके पुढे म्हणतात की, राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकाला कोरोनाची बाधा होऊ नये, सलूनमधील कारागिराला बाधा होऊ नये , यासाठी सलूनमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य निर्जंतुकीकरण करून वापरावे लागणार आहेत. तसेच ग्राहकाला सलुन मध्ये आल्यावर हात हॅन्डवॉशने स्वच्छ करा...